शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. बरेचदा खूप खोलवर खोदून देखील पाणी लागत नाही. आणि कधी कधी तर अगदी 100 ते 200 मीटरवर खोदल्यावर देखील लगेच पाणी मिळून जाते. त्यामुळे पाणी शोधण्याच्या पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या पद्धती आहेत. या पद्धतींचा आज आपण या लेखाच्या माध्यमातून अधिक अभ्यस करणार आहोत. जमिनीखालील पाणी शोधताना ज्या पद्धती अवलंबल्या जातात त्यामागे अनेकदा वैज्ञानिक सत्या असल्याचे देखील दिसून येते. Underground Water Searching Method
जमिनीखालील पाण्याचे स्रोत कसे शोधतात?
ग्रामिण भागात आजही विहिर खोदताना पाणी कुठे लागेल याचा अंदाज काढण्यासाठी पारंपरिक पद्धती अवलंबल्या जातात. माहीत असलेल्या काही पद्धतींच्या मदतीने जमिनीतील पाण्याच्या प्रवाहांचा शोध घेतला जातो. त्यामध्ये पुढील पारंपरिक पद्धतींचा समावेश आहे.
नारळ हातात घेऊन भूगर्भातील पाण्याचा शोध घेणे
भूगर्भाखालील पाणी शोधण्यासाठी नारळ तळहातावर ठेऊन शेंडीकडचा भाग हा बोटांच्या दिशेला केला जातो. अशापद्धतीने नारळ हातावर घेऊन एक व्यक्ती संपूर्ण शेतात फिरते. एखाद्या जागी नारळ सरळ झाला तर तिथे जमिनीत पाणी आहे असा अंदाज लावला जातो. नारळ किती सरळ होतो, यावरून किती फूट खणल्यावर पाणी लागेल हेही सांगता येत,नारळ फिरवून पाणी शोधणाऱ्यापासून ते भूगर्भशास्त्रज्ञांपर्यंत सर्वांकडून जागेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सहमती झाल्यावरच खोदकामाला सुरुवात होते. Underground Water Searching Method
कडुनिंबाच्या काठीने जमिनीखालील पाण्याचा शोध घेणे
कडुलिंबाची झाडे ही पाण्याच्या नैसर्गिक साठ्यांची जैविक निर्देशक मानली जातात.जर का कडुलिंबाचे झाडं निरोगीपणे वाढत असतील आणि त्यांच्या फांद्या आणि पाने एका बाजूला वाकलेली असतील तर जवळच कुठेतरी पाणी आहे असं मानलं जातं. विहिर खोदण्य़ासाठी किंवा बोअरवेल खोदण्यासाठी कुठे पाणी लागेल हे शोधतान आजही ग्रामिण भागात Y-आकाराची कडुनिंबाची काठी हातावर ठेवून फिरतात. जिथे पाणी आहे, तिथे काठी सरळ राहते आणि तेथील लोकांना समजते की त्या भागातच पाणी आहे. Underground Water Searching Method
हातावर पाण्याचा तांब्या ठेवून जमिनीखालील पाण्याचा शोध घेणे
हातावर पाण्याचा तांब्या घेऊन फिरताना ज्या ठिकाणी तांब्यातलं पाणी सांडतं तिथे विहीर खोदता येते. असे अनेक गावांमध्ये आजही केले जाते.
रेझिस्टिव्हिटी मीटर म्हणजेच विद्युत प्रतिरोधक सर्वेक्षण
भूगर्भातील पाणी शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धती उपयुक्त आहेत. यासाठी रेझिस्टिव्हिटी मीटर ज्याला विद्युत प्रतिरोधक सर्वेक्षण असेही म्हटले जाते, ही संपुर्ण जगभरात वापरल्या जाणाऱ्या पद्धतींपैकी एक महत्त्वाची वैज्ञानिक पद्धत आहे. Underground Water Searching Method रेझिस्टिव्हिटी मीटरचा वापर करून पृथ्वीच्या थरांतील विद्युतीय प्रतिकारशक्तीचा अंदाज लावला जातो. यावर आधारित आलेख काढला जातो. परिणाम सकारात्मक आहेत की नाही हे तपासून भूगर्भातील पाणी शोधून काढले जाते. भूगर्भातील पाणी किती खोलवर आहे हे ठरवण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. या पद्धतींमध्ये पृथ्वीचा पहिला थर किती खोल आहे आणि दुसरा थर किती खोल आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरते. तसेच या पद्धतीच्या मदतीने कठीण खडक जिथे आहे तिथे न खोदता शास्त्रोक्त पद्धतीने खोदण्याचे काम केले जाते.
कडुलिंबाची झाडे आणि वैज्ञानिक पद्धत
कडुलिंबाची झाडे ही पाण्याच्या नैसर्गिक साठ्यांची जैविक निर्देशक मानली जातात.जर का कडुलिंबाचे झाडं निरोगीपणे वाढत असतील आणि त्यांच्या फांद्या आणि पाने एका बाजूला वाकलेली असतील तर जवळच कुठेतरी पाणी आहे असं मानलं जातं. Underground Water Searching Method
भूगर्भातील पाण्याचा प्रवाह शोधण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो
1910 सालापासून भूजल सर्वेक्षण तंत्रज्ञान विकसित झाले आणि त्यानंतर भूगर्भातील पाण्याचा प्रवाह शोधण्यासाठी भूभौतिकीय पद्धत, चुंबकीय पद्धत, प्रतिरोधक पद्धतींचा वापर केला जाऊ लागला.