Free cylinder scheme in Maharashtra मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत महिलांना मिळणार वर्षाला 3 सिलेंडर मोफत; कोणाला होणार लाभ जाणून घ्या

Free cylinder scheme in Maharashtra महाराष्ट्र राज्य सरकार नेहमीच महिलांसाठी विविध योजना राबवताना दिसून येते. यावर्षीच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य सरकारने जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमांतून आर्थिक दुर्बल गटातील महिलांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना गॅसचे दर जास्त असल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून अर्थसंकल्पात या योजनेची तरतूद करण्यात आली आहे. Free cylinder scheme in Maharashtra

आर्थिक दुर्बल घटकांचे जीवन सुधारण्यासाठी अन्नपूर्णा योजना

आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु करण्यात आली आहे. आजही महाराष्ट्रात असे जिल्हे आहेत जेथील महिलांना महिना एक गॅस सिलेंडर आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. अशा महिलांना एकतर कमी जेवणात कुटुंबाचे पोट भरावे लागते किंवा लाडके किंवा कोळसा जाळून जेवण तयार करावे लागते, म्हणूनच मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबातील महिलेला वर्षाला मोफत तीन गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या 2024-25 अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांपैकी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. Free cylinder scheme in Maharashtra

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी या महिला असतील पात्र

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला आर्थिक दुर्बल घटकातील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलेकडे रेशनकार्ड असणे आवश्यक आहे.  
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा कमी असावे.  
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबात 5 पेक्षा जास्त सदस्य असू नयेत. Free cylinder scheme in Maharashtra

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम शासनाला अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना पुढील कागदपत्रे देखील सोबत जोडणे आवश्यक आहे. Free cylinder scheme in Maharashtra

  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचे उद्दिष्ट

आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना वाढत्या महागाईमुळे महिन्याला 1 सिलेंडर विकत घेणे शक्य होत नाही. या महिलांना चुलीवर जेवण बनवावे लागते आणि त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर देखील त्याचा परिणाम होतो. म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलेला वर्षातून 3 सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. Free cylinder scheme in Maharashtra

महिलांसाठी  महाराष्ट्र सरकारच्या इतर योजना

यावर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने महिलांना विविध योजनांची भेट दिली आहे. गेल्या दोन वर्षात सुरु असलेल्या योजना आणि यावर्षी नव्याने सुरु झालेल्या महिलांसाठीच्या महाराष्ट्र राज्य सरकारने सुरु केलेल्या योजना जाणून घेऊ.

  • 2023-24 पासून सुरु असलेल्या लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेताना आर्थिक मदत.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी महिलेला दर महिना 1500 रुपये मिळणार.
  • 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाच्या  नोंदीमध्ये आईचे नांव बंधनकारक करण्यात आले आहे.
  • पिंक ई रिक्षा योजनेच्या माध्यमातून 17 शहरांमधील 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी 80 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे.
  • राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे आणि साहित्यासाठी ७८ कोटी रुपये
  • पाण्यासाठी होणारी महिलांची पायपीट थांबावी म्हणून जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1 कोटी 25 लाख 66 हजार 986 घरांना नळजोडणी करण्यात आली.
  • मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेमध्ये लाभार्थी महिलेला वर्षाकाठी 3  सिलेंडर मोफत देण्याची घोषणा.
  • लखपती दिदी योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांच्या माध्यमातून 7 लाख नवीन गटांची स्थापना
  • तसेच महाराष्ट्रातील बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ करण्यात आली आहे.  Free cylinder scheme in Maharashtra