Free Flour Mill Scheme महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात. त्यांचा लाभ घेऊन आजतागायत अनेक महिलांनी स्वतःचा रोजगार निर्माण केला आहे आणि त्या आत्मनिर्भर देखील झाल्या आहेत. केंद्र आणि राज्य स्तरावर सध्या विविध योजना दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी राबवण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन “मोफत पिठाची गिरणी” (Free Flour Mill) ही योजना महिलांसाठी राबवत आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना 100% अनुदानावर पिठाची गिरणी देण्याच येणार आगे.
“मोफत पिठाची गिरणी” योजनेचा उद्देश
महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या “मोफत पिठाची गिरणी” या योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे, महिलांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे. सध्या या योजनेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मोफत पिठाच्या गिरण्या आणि मिनी डाळ गिरण्यांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, महिला अर्जदारांनी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता निकषांसह खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी पात्रता निकष आणि बरेच तपशील काळजीपूर्वक वाचा आणि लगेच अर्ज करा.
शासनातर्फे पिठाची गिरणी मोफत मिळविण्यासाठी अर्जदार महिलेची पात्रता. Free Flour Mill Scheme पात्रता
- ही योजना 18 ते 60 वयोगटातील मुली आणि महिलांसाठी उपलब्ध आहे
- अर्जदार महिलेने किमान 12 पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- महिला ग्रामिण किंवा शहरी भागात राहणारी असली तरी तिला या योजनेचा लाभ घेता येईल.
शासनातर्फे पिठाची गिरणी मोफत मिळविण्यासाठी अर्जदार महिलेकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे
Free Flour Mill Scheme Important Document
- आधारकार्ड, मतदारकार्ड, पॅनकार्ड
- रेशन कार्ड प्रत
- 12 वी पास प्रमाणपत्र
- अर्जदाराच्या आधार कार्डाची छायाप्रत.
- निवासाचा 8A” उतारा
- उत्पन्न प्रमाणपत्र, तलाठी किंवा तहसीलदाराने सही, शिक्क्याने संमत केलेले,
- महिला विधवा, निराधार असल्यास त्यासंबंधीचा दाखला आवश्यक
- वार्षिक उत्पन्न रु. 1,20,000 पेक्षा कमी असल्याता उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स.
- वीज बिलाची झेरॉक्स
मोफत पिठाची गिरणी योजनेसंबंधई नियम व अटी (Free Flour Mill Yojana):
- अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त किंवा 60 वर्षांपेक्षा कमी असावे.
- वरील सर्व निकष पूर्ण केल्यानंतरच अर्ज सादर करावा;
- अपात्र अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- सध्याच्या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड हा समाज कल्याण विषय समितीचा विशेषाधिकार असेल.
- अर्जदाराने यापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अखत्यारीतील या योजनेचा लाभ मागील ३ वर्षात प्राप्त केलेला नसावा.
“मोफत पिठाची गिरणी” योजनेसाठीअर्ज करण्याची पद्धत
https://drive.google.com/file/d/1AUc03fGgb1jjLL7HO-5sZPhBUnL-lFpZ/view
- या लिंकवर जाऊन अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन घ्यावा
- त्यामध्ये विचारलेली माहिती योग्य पद्धतीने भरावी. सोबत लेखात दिलेल्या आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी
- गावच्या ग्रामपंचायतीत किंवा तलाठी कार्यालयात हा अर्ज सबमीट करायचा आहे.
- तुमची कागदपत्रे तपासून योजनेसंबंधीत जिल्हापातळीवरील अधिकारी तुम्हाला लाभार्थी घोषीत करतील आणि तुम्हाला संपर्क करतील.
मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ
याआधी देखील शासनाने महिलांसाठी शिलाई मशीन, सायकल, आटा चक्की सारखी उपकरणे देण्याच्या योजना आखल्या होत्या. भारतातील त्या त्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यांमध्ये या योजना विविध पातळीवर राबवल्या जातात. यांपैकीच एक म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना. शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या या योजनेचे लाभ पुढीलप्रमाणे.
- या योजनांमुळे महिलांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत होते.
- विधवा महिलांना पती निधनानंतर मुलांच्या शिक्षणासाठी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना या योजनेचा मोठा फायदा झाल्याचे दिसून येते.
- निराधार महिलांना या योजनेचा अत्यंत लाभ झाल्याचे समाजात दिसून येते.
- ही योजना ग्रामिण महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे.
- ग्रामिण भागात ज्या महिलांची शेती नाही अशांना या पिठाच्या गिरणी व्यवसायातून मिळणारा रोजगार अत्यंत महत्त्वाचा वाटू लागला आहे.