Mudra Card Yojana 2023 मृदा आरोग्य कार्ड योजना 2023

Mudra Card Yojana 2023

Mudra Card Yojana 2023 भारत हा शेतीप्रधान देश आहे. येथील विविध पिके परदेशात निर्यात केली जातात. पावसाच्या बदलत्या धोरणामुळे मातीचा कस बदलतो. आणि शेतकऱ्यांना त्याचे नुकसान होते. म्हणूनच शासनाने शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परिक्षण करुन त्यांना कोणते पीक घ्यावे, कधी घ्यावे, त्यांच्या मातीत कोणती पोषक घटक आहेत यासर्वांबद्दल मार्गदर्शन करण्याचे ठरवले. फेब्रुवारी २०१५ पासून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मृदा आरोग्य कार्ड योजनेची सुरुवात केली. दिनांक १९ फेब्रुवारी २०१५ सुरतगड राजस्थान येथून या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत शासनामार्फत शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड सर्वांना देण्याची योजना राबविण्यात आली. यामध्ये पिकानुसार शिफारस आवश्यक पोषक तत्वे व त्या शेती नुसार आवश्यक असणारी खते याचा गोषवारा दिला जातो. जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य ते पीक निवडण्यास व उत्पादन वाढविण्यास मदत होऊ शकेल. सुमारे १४ करोड शेतकऱ्यांना अशा प्रकारचे कार्ड वितरित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

 नेमकी काय आहे मृदा आरोग्य कार्ड योजना?

मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिलेल्या कार्डमध्ये शेतजमिनीच्या मातीच्या प्रकाराची माहिती मिळते. त्यामुळे शेतकरी त्यांच्या जमिनीच्या गुणवत्तेच्या आधारे पिकांची लागवड करून चांगली शेती करू शकतात. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीच्या गुणवत्तेनुसार तीन वर्षांतून एकदा मृदा आरोग्य कार्ड दिले जातात.

Mudra Card Yojana 2023 काय आहेत मृदा आरोग्य कार्ड योजनेची उद्दिष्टे?

भारत सरकार नेहमीच शेतकऱ्यांना पिक घेण्यास मदत होईल आणि उत्पन्न वाढेल या हेतूने विविध योजनांची आखणी करीत असते. तसेच सरकराने 2015 मध्ये मातीच्या गुणवत्तेनुसार पिके घेऊन उत्पादन क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली आहे. या कार्डमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास तसेच खताच्या वापरामुळे जमिनीचा कस आणि समतोल राखण्यास चालना देण्याची सरकारची योजना आहे. या कार्डच्या माध्यमातून शेतकरी कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊ शकतात.

मृदा आरोग्य कार्ड  योजने अंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करून मृदा आरोग्य कार्ड देण्याबरोबरच  मातीच्या प्रकारानुसार पिकांची लागवड करण्याची सूचना शेतकऱ्यांना केली जाते. तसेच जमिनीत कोणत्या गोष्टींचे प्रमाण किती आहे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. शेतकऱ्यांनी कोणत्या पिकासाठी किती आणि कोणते खत वापरावे याबाबत  देखील शासन मार्गदर्शन करीत असते.

मृदा आरोग्य कार्ड योजनेसंबंधी शासनाची अधिकृत वेबसाईट

https://soilhealth.dac.gov.in/home

 ही आहे मृदा आरोग्य कार्ड योजनेसंबंधीत वेबसाईट. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची माहीत भरून तुमच्या शेतीसाठी लागणारे मातीचे परिक्षण करण्यासाठीचे मृदा आरोग्य कार्ड बनवून घेऊ शकता. ही संपूर्णपणे शासनातर्फे राबवली जाणारी सेवा योजना आहे.

असा करा मृदा आरोग्य कार्डसाठी अर्ज

  • सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइटला (soilhealth.dac.gov.in) भेट द्या.
  • यानंतर होम पेजवर दिलेल्या लॉगिनच्या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन पेज उघडल्यावर तुमचे राज्य निवडून Continue वर क्लिक करा.
  • लॉगिन पेज उघडल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन न्यू युजरच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • मागितलेले सर्व तपशील भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
  • नोंदणी केल्यानंतर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • मृदा हेल्थ कार्ड कराल डाउनलोड?
  • अधिकृत वेबसाइटच्या (soilhealth.dac.gov.in) होम पेजवर, फार्मर कॉर्नरमध्ये मृदा हेल्थ कार्ड प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करा.
  • तुमचे राज्य निवडल्यानंतर जिल्हा, गाव, शेतकऱ्यांचे नाव यासंबंधीची माहिती भरा.
  • विचारण्यात आलेला सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर सर्च बटणावर क्लिक करून मृदा हेल्थ कार्ड ओपन होईल. जे तुम्ही प्रिंट करू शकता.

मृदा आरोग्य कार्ड मार्फत कशापद्धतीने काम केले जाते.

  • सर्वात आधी योजनेसंबंधीत काम करणारे अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने गोळा करतात.
  •  त्यानंतर माती प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवली जाते.
  • मातीच्या नमुन्याची माहिती घेतल्यानंतर तपास पथक त्याचा दर्जा सांगतो.
  • जमिनीत काही कमतरता असल्यास ती सुधारण्यासाठी सूचना दिल्या जातात.
  • त्यानंतर हा अहवाल शेतकऱ्याच्या नावासह  वेबसाईटवर ऑनलाइन अपलोड केला जातो.