Free invitation cards making in marathi: लग्न, वाढदिवस, गृहप्रवेश निमंत्रण पत्रिका तयार करा अगदी मोफत; हे ऍप करा डाऊनलोड

Free invitation cards making in marathi भारत हा संस्कृती आणि परंपरा जपणारा देश आहे. येथे प्रत्येक धर्मात विविध सोहळे किंवा धार्मिक कार्यक्रम असतात. अगदीच नाही तर लग्नसोहळा किंवा नामकरण विधी तर असतोच असतो. मग अशावेळी पाहुण्यांना निमंत्रण देण्यासाठी निमंत्रण पत्रिका तयार करायची असते. बाहेर डिझायनरकडे गेल्यास अशा डिजिटल निमंत्रण पत्रिका तयार करण्यासाठी ते भरपूर पैसे चार्ज करतात. म्हणूनच आम्ही तुमच्या सेयीसाठी काही असे ऍप्स आणि वेबसाईट्स घेऊन आलो आलो आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही अगदी मोफत मराठी निमंत्रणपत्रिका बनवू शकता. चला तर मग पाहूया कोणकोणते आहेत हे ऍप आणि वेबसाईट्स.

कोणकोणत्या कार्यक्रमांसाठी निमंत्रणपत्रिका आपल्याला बनवाव्या लागतात

वर्षभर आपण कौटुंबिक आणि सार्वजनिक असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतो. मग हे कार्यक्रम लग्नापासून ते सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंत सगळेच असतात. या कार्यक्रमांना पाहुणांना बोलावण्यासाठी आपण निमंत्रण पत्रिका छापून घेतो. या निमंत्रणपत्रिका विविध प्रकारच्या असू शकतात

  • लग्नपत्रिका
  • साखरपुडा निमंत्रण
  • हळदिचे निमंत्रण
  • वास्तुशांती निमंत्रण
  • गृहप्रवेश निमंत्रण
  • मुलाचे जावळ
  • नवशिशूचा नामकरण विधी
  • ओटभरणी निमंत्रण
  • सत्यनारायणाची पुजा

डिजिटल निमंत्रण पत्रिकांचा जमाना

सध्या कागदी निमंत्रण पत्रिका खूप कमी छापल्या जातात त्यामागे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये हे देखील कारण असतेच. परंतु डिजिटल निमंत्रण पत्रिका जास्त प्रमाणात पाठवल्या जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या डिजिटल निमंत्रण पत्रिका पाठवणे अत्यंत सोपे असते आणि ते बनवण्याची प्रोसेस देखील सोपी असते. तसेच आपल्या नातेवाईकांना व्हॉट्सॅप, ईमेल आणि टेलिग्रामच्या माध्यमातून या निमंत्रण पत्रिका पाठवतात येतात. Free invitation cards making in marathi/

मोफत बनवा निमंत्रण पत्रिका

तुमच्या घरातील प्रत्येक सोहळ्यासाठी लागणारी निमंत्रण पत्रिका तुम्ही मोफत बनवू शकता. पुढे देण्यात आलेल्या सर्व वेबसाईटवर मोफत किंवा पैसे पे करुन निमंत्रण पत्रिका बनविण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला त्या वेबासईटवर लॉगीन करावे लागणार आहेत. तुमचा इमेल आयडी आणि मोबाईल नंबरच्या मदतीने तुम्ही हे लॉगीन करु शकता.

कॅन्वा – Canva

https://www.canva.com/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही Canva या डिझायनिंग वेबसाईटवर जाऊ शकता. या वेबसाईटवर तुम्ही तुमच्या घरातील विविध कार्यक्रमांच्या निमंत्रणपत्रिका बनवू शकता तसेच सोशल ग्राफिक्स देखील बनवू शकता. काही निमंत्रण पत्रिकांचे आऊटलेट मोफत असून काहींसाठी ग्राहकांना पैसे पे करावे लागणार आहेत. तुम्ही अश्या निमंत्रण पत्रिकेचा फॉर्मॅट निवडला जो फ्री आहे तर त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार नाहीत. Free invitation cards making in marathi

 मराठी इन्विटेशन कार्ड्स

https://play.google.com/store/apps/details?id=com.urva.allinvitationcards या लिंकवर तुम्हाला लग्नापासून ते जावळ, मुंज आणि सत्यनारायणाची महापूजा या सर्व घरगुती सोहळ्यांसाठी मराठी पद्धतीच्या निमंत्रण पत्रिका बनवता येणार आहेत. अत्यंत सोप्या आणि सहज पद्धतीने त्यांनी वेबसाईटवर दिलेले निमंत्रण पत्रिकांचे फॉर्मॅट तुम्ही एडिट करु शकणार आहात. आणि ते एडिट करुन तुमची माहिती त्यामध्ये भरुन तुमची स्वतःची अशी निमंत्रण पत्रिका तयार करता येणार आहे. Free invitation cards making in marathi

ग्रिटिंग इस्लॅँड –  Greetings Island

https://www.greetingsisland.com/ या लिंकवर क्लिक करून तुम्ही Greetings Island या वेबसाईटला भेट देऊ शकता. ही एक इंग्रजी वेबसाईट असून यावर तुम्ही तुम्हा हव्या त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार करु शकता. रिंग सेरेमनी म्हणजेच साखरपुडा, रिसेप्शन, लग्न अशा एक नाही अनेक कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकांचे फॉर्मॅट येथे देण्यात आले आहेत. त्यांचा वापर करुन तुम्ही तुमच्या निमंत्रण पत्रिका बनवू शकता. तसेच येथे पेसे देऊन देखील छान छान फॉर्मॅट निवडता येतील आणि सहज सोप्या पद्धतीने तुमची स्वतःची अशी निमंत्रण पत्रिका तयार करता येईल अशी सोय करण्यात आली आहे.

पेपरलेस पोस्ट – Paperless Post

https://www.paperlesspost.com/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही पेपरलेस पोस्ट या वेबसाईटला भेट दऊ शकता. इतर सर्व वेबसाईटप्रमाणेच या वेबसाईटवर देखील तुम्ही सुंदर सुंदर निमंत्रण पत्रिका बनवू शकता त्याही अगदी मोफत. परंतु काही सर्वोत्तम डिझाईन्ससाठी मात्र वेबसाईट मालकाने ग्राहकांना पैसे लावले आहेत.

मोफत निमंत्रण पत्रिका बनविण्यासाठी आज असे अनेक ऍप उपलब्ध आहेत. परंतु आपल्या काही मित्रांना किंवा नातेवाईकांना माहितीच नसते. परंतु आता या लेखाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांचे आणि नातेवाईकांचे पैसे वाचवू शकता आणि त्यांना मोफत निमंत्रणपत्रिका बनवण्यासाठी मार्गदर्शन करु शकता. अशाच अधिक पोस्ट वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला पुन्हा नक्की भेट द्या. Free invitation cards making in marathi