Free wedding card making website लग्नाचा सीझन जवळ आला की घाई होते ती लग्नपत्रिता तयार करण्याची. मग ग्राफिक डिझायनरकडे जाऊन या लग्नपत्रिका तयार करायच्या हा सगळा वेळखाऊ कारभार सुरु होते. पैसे जास्तीचे लागतात ते वेगळे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी अशी एक वेबसाईट घेऊन आलो आहोत जेथे तुम्ही तुमच्या घरातील लग्नासाठी स्वताःच लग्नपत्रिका तयार करु शकाल. तेही अगदी मोफत. चला तर मग बघूया नक्की कोणती आहे ती वेबसाईट.
घरबसल्या मोफत लग्नपत्रिका बनवा
आता तुम्ही घरबसल्या तुम्हाला हवी तशी आणि हव्या त्या प्रकारची लग्नपत्रिका बनवू शकणार आहात. त्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे पैसे देखील वाचणार आहेत. मग ऑनलाईन पद्धतीने बनवता येणारी ही लग्नपत्रिका नेमकी कशी तयार करायची हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही बरोबर लेख वाचत आहात. या लेखाच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन आम्ही करणार आहोत. आणि फक्त लग्न पत्रिकाच नाही तर घरातील विविध सोहळ्यांसाठी देखील तुम्ही अगदी मोफत निमंत्रण पत्रिका बनवून शकणार आहात. चला तर मग पाहूया ते कसं? Free wedding card making website
प्रत्येक सोहळ्यासाठी निमंत्रण पत्रिका बनवता येईल
I love invite या वेबसाईटवर तुम्ही तुम्हाला हव्या त्या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका बनवू शकता. त्याचे फॉर्मॅट देण्यात आले असून तुम्हाला फक्त एडिट करुन त्यामध्ये माहिती आणि फोटो अपलोड करायचा आहे. या वेबसाईटवर तुम्हाला बर्थडे कार्ड, गृहप्रवेश निमंत्रण पत्रिका, वास्तू शांती, सत्यनारायण पुजा, रिटायर्मेंट निमंत्रण पत्रिका असे एक नाही अनेक प्रकारच्या निमंत्रण पत्रिका तुम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून बनवू शकता. येथे तुम्ही स्वतःच या निमंत्रण पत्रिका बनविणार आहात आणि तुम्हाला हवे ते रंग संगती देखील मिळवू शकणार आहात. Free wedding card making website
अशी बनवा लग्नपत्रिका
I love invite या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही मोफत लग्नपत्रिता तयार करु शकता. ही लग्नपत्रिका ऑनलाईन पद्धतीने तयार करायची पद्धत आपण पुढे पाहणार आहोत
- लग्नपत्रिका बनविण्यासाठी तुम्हाला I love invite या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. https://iloveinvite.com/ या लिंकवर क्लिक करुन देखील तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता.
- वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला पुढीलप्रमाणे स्क्रिन दिसेल
- त्यावर विविध प्रकारचे निमंत्रण पत्रिका बनवण्याचे पर्याय तुम्हाला दिसतील. त्यापैकी Marathi Wedding या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर मराठी लग्नपत्रिकांचे विविध नमुने तुमच्यासमोर येतील. त्यावर जिथे Edit असे म्हटले आहे तिथे क्लिक करा.
- तुमच्यासमोर तुम्ही निवडलेल्या लग्नपत्रिकेचा फॉर्मॅट एडिट करण्याचा तक्ता येईल.
- त्यामध्ये तुमची सर्व माहिती भरा, नवरा नवरीचे फोटो देखील अपलोड करण्याची सोय तेथे देण्यात आली आहे. जेणेकरून लग्नपत्रिकेवर हे फोटो येतील.
- माहिती भरुन झाल्यानंतर Preview या पर्यायावर क्लिक करा. म्हणजे तुम्ही भरलेली माहिती आणि अपलोड केलेल्या फोटो प्रमाणे तुम्हाला हवी असलेली लग्नपत्रिता तयार झालेला नमुना तुम्हाला पाहता येईल.
- Preview पाहून तुम्हाला जे बदल करायचे असतील ते तुम्ही करु शकता. त्यानंतर तुम्ही तयार केलेली लग्नपत्रिका डाऊनलोड करु शकता. Free wedding card making website
पुर्वी लग्नपत्रिका या घरोघरी वाटण्यासाठी कागदी स्वरुपात बनवल्या जात असत. आजही त्या बनवल्या जातात परंतू त्यांची संख्या कमी झाली आहे. कारण आज डिजिटल निमंत्रण पत्रिकांना जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या सगळ्यांकडे मोबाईल असतो. या मोबाईलवरच घरातील एखाद्या सोहळयाची किंवा कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका इमेज पाठवली जाते. ते जास्त सोयीचे होते. अशी एखादी डिजिटल निमंत्रण पत्रिका तुम्ही I love invite या वेबासाईटच्या मदतीने बनवू शकणार आहात. मग वाट कसली बघताय आजच तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन तुम्हाला हव्या त्या फॉर्मॅटमध्ये हव्या त्या कार्यक्रमासाठीची पत्रिका बनवू शकता. अगदी काहीच नाही तर वाढदिवसाचे निमंत्रण देण्यासाठी birthday invitation card बनवू शकता आणि तेही मराठीमध्ये. Free wedding card making website