Air India Recruitment Process: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आता एक मोठी संधी समोर आली आहे. विशेष म्हणजे या भरतीची नोटीस ही काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अर्जदारांनी अजिबात वेळ न दवडता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा असे सांगण्यात येत आहे. ही खरोखरच एक उत्तम संधी असल्याचं समजलं जातं आहे. ही भरती एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडद्वारे आयोजित केली गेली असून नोकरी शोधणाऱ्यांनी या भरती साठी लगेचच अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी वय आणि शिक्षण यासाठीच्या अटी लागू केल्या गेलेल्या आहेत. चला तर मग या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
तुमच्यासाठी Air India Air Transport Services Limited सह थेट काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी आयोजित केली जात असल्याने, प्रत्येक वैयक्तिक पदासाठी वय आणि शैक्षणिक आवश्यकता विचारात घेतल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 500 रुपयाची अर्ज फी भरावे लागणार आहे. विशेष म्हणजे उमेदवाराला कोणतीही परीक्षा देण्याबद्दलची काळजी करावी लागणार नाही.
मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार असून, मुलाखतीसाठी उमेदवारांनी मध्यवर्त एव्हिएशन ॲकॅडमी, 102 विनायक प्लाझा, बुद्ध सिंग पुरा, सांगानेर, जयपूर येथे संपर्क साधायला हवा. या भरती प्रक्रियेसाठी मुलाखती 8 मे ते 11 मे 2024 या कालावधीत घेतल्या जातील. https://www.aiasl.in/ या लिंकद्वारे तुम्ही भरती प्रक्रियेबद्दल अधिक डिटेल माहिती सहज मिळवू शकणार आहात. Air India Recruitment Process
भरतीची जाहिरात:
https://www.aiasl.in/resources/Recruitment%20Advertisement%20for%20%20Jaipur%20Station.pdf
उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी आणि त्यानंतरच भरतीची तयारी सुरू करावी असे सांगण्यात येत आहे. नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही खरोखरच एक उत्तम आणि सुवर्णसंधी असल्याचंच म्हणावं लागेल.
Air India Recruitment Process
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक, कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, कारागीर आणि ग्राहक सेवा कार्यकारी अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. विशेषत: दहावी ते पदवीपर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी सहज अर्ज करू शकणार आहेत. तर मग आजच अर्ज करा आणि Air India Air Transport Services Limited सोबत थेट काम करण्याची संधी गमावू नका.