Gai Mhashi Vatap Yojana: दुधाचा व्यवसाय करताय? सरकार अनुदानावर देणार दुभत्या गायी आणि म्हशी! अधिक जाणून घ्या…

Gai Mhashi Vatap Yojana

Gai Mhashi Vatap Yojana: नमस्कार मंडळी, आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे आणि देशातील तब्बल 70 टक्के नागरिक शेती व्यवसायात गुंतलेले आहेत. शेतीमध्ये गुंतलेले असताना, शेतीला अतिरिक्त जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत म्हणून ओळखला जात आहे. पण या व्यवसायासाठी आर्थिक भांडवल सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे आणि सर्वच शेतकरी त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे हे करू शकत नसल्यामुळे, या संदर्भात, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दुधाळ गाई म्हशी वितरण योजना 2023 राबविण्यात येत आहे. या योजनेची संपूर्ण माहिती तुम्ही या लेखामध्ये जाणून घेऊ शकता.

राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने दुधाळ गाय आणि म्हशीचे अनुदानावर वितरण करण्याची योजना सुरू केली असून दारिद्र्यरेषेखालील अल्पभूधारक लहान शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे दिसून येत आहे. Gai Mhashi Vatap Yojana

या योजनेंतर्गत निवडल्या गेलेल्या सामान्य श्रेणीतील लाभार्थ्यांना दोन देशी दुधाळ गायी, दोन संकरित गायी किंवा दोन म्हशींचा एक समूह ५० टक्के अनुदानावर दिला जाणार आहे. तर याशिवाय अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी क्षेत्र उपयोजना अंतर्गत निवडल्या गेलेल्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर याचे वाटप केले जाणार आहे. दारिद्र्यरेषेखालील शेतकरी आणि लहान जमीन मालकांचा आता या योजनेच्या लाभार्थ्यांच्या निकषांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय 11 सप्टेंबर 2023 रोजी जारी करण्यात आला आहे. Gai Mhashi Vatap Yojana

लाभार्थी निवडण्यासाठी कोणते निकष आहेत? | What are the criteria for selecting beneficiaries? | Gai Mhashi Vatap Yojana

• दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी
• लहान, अत्यल्पभूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्यंत भूधारक असलेले शेतकरी)
• लहान शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी (ज्यांच्याकडे एक ते दोन हेक्टर जमीन आहे असे शेतकरी)
• सुशिक्षित बेरोजगार (रोजगार आणि स्वयंरोजगार केंद्रात नोंदणीकृत असलेले)
• महिला बचत गटांच्या लाभार्थी  Gai Mhashi Vatap Yojana

सरकारी अनुदानाव्यतिरिक्त, उर्वरित 50% रक्कम आणि इतर श्रेण्यांसाठी 25% रक्कम ही शेतकऱ्यांना किंवा लाभार्थ्यांना स्वतः किंवा बँक आणि वित्तीय संस्थांकडून कर्जाद्वारे उभारावी लागणार आहे. या योजनेंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना दुधाळ गाई आणि म्हशींसाठी, कडबा कुट्टी यंत्राचा पुरवठा आणि खाद्य साठवण्यासाठीचे शेड बांधण्यासाठी कोणतेही अनुदान मिळणार नाही.

या योजनेचे लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल आणि तीन टक्के अपंग लाभार्थी निवडले जाणार आहेत. या योजनेच्या अंतर्गत प्रति कुटुंब फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असेल. Gai Mhashi Vatap Yojana

या योजनेत दररोज 10 ते 12 लिटर दूध देणाऱ्या एचएफ, जर्सी या संकरित गायी, दररोज 8 ते 10 लिटर दूध देणाऱ्या गिर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, आणि दररोज 5 ते 7 लिटर दूध देणाऱ्या देवणी, लाल कंधारी, देवलाऊ, डांगी गाईचे वाटप केले जाणार आहे. सोबतच सुधारित मुरा व जाफराबादी जातीच्या गायी व म्हशींचे वाटप सुद्धा करण्यात येणार आहे. Gai Mhashi Vatap Yojana

दुभत्या गायी आणि म्हशी वाटप योजना पुन्हा सुरू | Gai Mhashi Vatap Yojana

सरकारी अनुदानाव्यतिरिक्त, उर्वरित 50% रक्कम आणि इतर श्रेण्यांसाठी असणारी उर्वरित 25% रक्कम शेतकऱ्यांना आणि लाभार्थ्यांना स्वतः किंवा बँक आणि वित्तीय संस्थांकडून कर्जाद्वारे उभारावी लागणार आहे.

या योजनेंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना किंवा शेतकऱ्यांना दुभत्या गाई म्हशींसाठी गोठा बांधणे, कडबा कुट्टी यंत्राचा पुरवठा आणि खाद्य शेड बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले जाणार नाही.

अर्ज कुठे करायचा? | Where to apply? | Gai Mhashi Vatap Yojana

या योजने बद्दलची संपूर्ण माहिती आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया https://ah.mahabms.com/ या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने Google Play Store वरील AH-MAHABMS या मोबाईल अॅप्लिकेशनवर ऑनलाइन अर्ज सादर करावा. Gai Mhashi Vatap Yojana