Satbara boja now Online: वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, बोजा चढविणे किंवा कमी करणे आता ऑनलाईन

Satbara boja now Online

Satbara boja now Online: वारस नोंदी. मयताचे नाव कमी करणे किंवा बोजा चढविणे, कमी करणे अशा स्वरुपाच्या अर्जासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही, ही कामे देखील केवळ 25 रुपयांमध्ये महा ई सेवा केंद्र, सेतू आणि आपले सरकार केंद्रांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करता येणे आता शक्य आहे. सरकारने या संदर्भात एक महत्त्वाचा शासननिर्णय जाहीर केला आहे आणि सर्व सामान्य नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.Land record

शेतजमीन ज्याच्या नावावर आहे, त्याचा मृत्यू झाल्यास काय करावे?

ग्रामिण भागात शेतजमीन ही कुटुंबातील कर्त्यापुरुषाच्या किंवा वयाने मोठ्या व्यक्तीच्या नावे असते. अशावेळी शेतजमीन ज्याच्या नावावर आहे  त्याचा अचानक मृत्यू झाल्यास वारसांनी जमिनीचे हक्क मिळावे यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, ते आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वप्रथम त्यासाठी शेतजमिनीवर वारस नोंद करावी लागते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत वारस नोंदीसाठी शासनाकडे अर्ज करणे अनिवार्य आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे वारस नोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. महाराष्ट्र सरकारच्या ‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे घरबसल्या वारस नोंद अर्ज करता येतो. १८ व्या दिवशी संबंधित व्यक्तीचा अर्ज व कागदपत्रे योग्य असल्यास वारसाची जमिनीच्या सातबारावर नोंद केली जाते. Satbara boja now Online

महाराष्ट्र राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी ‘ई-हक्क’ प्रणाली, ई चावडी अशी संकेतस्थळे विकसित केली आहे. या संकेतस्थळांच्या मदतीन शेतकरी घरबसल्या 8 प्रकारची जमिन विषयक कामे करु शकतात. Satbara boja now Online

 1. वारसाची नोंद करणे.                               
 2. ई – करार नोंदणी
 3. जमिनीच्या सात बारा मधील चूक दुरुस्त करणे
 4. बोजा चढविणे किंवा बोजा कमी करणे.
 5. मयत व्यक्तीचे नाव कमी करणे                        
 6. अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे
 7. एकत्र कुटुंब कर्ताची नोंद कमी करणे        
 8. विश्वस्तांचे नाव बदलणे

जमीन विषयक ऑनलाईन सुविधांसाठी महत्त्वाच्या लिंक खालील प्रमाणे

       महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी तसेच जमीनधारकांसाठी जमिनविषयक सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांच्या शासकीय संकेतस्थळांच्या लिंक खालील प्रमाणे असून तुम्ही कोणत्याही लिंकवर जाऊन तुम्हाला हव्या असलेल्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. Satbara boja now Online

महा ई सेवा केंद्रhttps://www.mahaonline.gov.in/Site/24/Maha-E-Seva-centers

ई चावडीhttps://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi

महाभूमी – bhulekh.mahabhumi.gov.in

वारस नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करा अगदी सोप्या पद्धतीने.

 • सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in या संकेत स्थळावर गेल्यास  ‘७/१२ दुरुस्तीसाठी ई- हक्क प्रणाली अशी सूचना असते. त्याखालील https://pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करावे.
 •  Public data Entry हे पेज उघडल्यावर Proceed to login यावर क्लिक करून या संकेतस्थळासाठी तुमचे  रजीस्ट्रेशन करा.
 •  रजीस्ट्रेशन करण्यासाठी Create new user पर्यायावर क्लिक करून New User Sign Up वर सुरवातीला स्वत:ची माहिती भरा.  पुढे लॉग-इन डिटेल्समध्ये Username टाकून check availability पर्यायावर क्लिक करून पासवर्ड टाका.
 • त्यानंतर मोबाईल, ई-मेल, पॅनकार्ड नंबर, पिन कोड भरा. देश, राज्याचे नाव, जिल्ह्याचे नाव भार आणि ‘Select City’मध्ये गाव निवडा. त्यानंतर Address Details येथे तुमच्या घराची माहिती भरा.  शेवटी कॅप्चा टाका आणि ‘सेव्ह’ म्हणा.
 • नोंदणी करताना टाकलेले यूझरनेम व पासवर्ड पुन्हा एकदा टाका.  तसेच कॅप्चा टाकून लॉग-इन म्हणा. त्यानंतर Detailsचे पेज उघडेल. त्याठिकाणच्या पर्यायावरील ७/१२ mutationsवर क्लिक करा.
 • सुरुवातीला अर्जदाराची माहिती भरून ‘पुढे जा’ पर्यायावर क्लिक करा. पुढे अर्ज मसुदा जतन केल्याचा मेसेज येईल आणि त्यासमोर अर्ज क्रमांक असेल. मेसेज खालील ‘ok’ बटनावर क्लिक करा.
 •  मृताचे नाव किंवा खाते क्रमांक टाका, सातबारावरील खाते क्रमांक भरा.  पुढे खातेदार शोधा पर्यायावर क्लिक करून मृताचे नाव निवडा.
 • पुढे खातेदाराचा गट क्रमांक व मृत्यू दिनांक भरा. त्यानंतर समाविष्ट करा या बटनावर क्लिक करून खातेधारकाच्या जमिनीची माहिती  तुम्हाला तेथे दिसेल. त्यानंतर अर्जदार हा वारसांपैकी आहे का? असा प्रश्न येईल. होय, नाही या दोन्हीपैकी एक पर्याय निवडून वारसांची नावे भरा या पर्यायावर क्लिक करा.
 • वारस म्हणून ज्यांची नावे जोडायची आहेत, त्यांची माहिती भरा.  इंग्रजी भाषेत नाव लिहा, जन्मतारीख भरा, वय भरा. त्यानंतर पुढे मोबाईल क्रमांक आणि पिनकोड भरा. पुढील माहिती भरून तुम्ही राहत असेलल्या परिसरातील पोस्ट ऑफिस निवडा.
 • पुढे मृतासोबतचे नाते निवड करा आणि  व शेवटी Save या पर्यायावर क्लिक करा.
 • वारसांची नावे भरल्यानंतर पुढे जा पर्यायावर क्लिक करा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. मयत व्यक्तीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत  संकेतस्थळावर अपलोड करा. तसेच इतर कागदपत्रांमध्ये रेशनकार्ड जोडणे आवश्यक आहे.  मृत व्यक्तीच्या जमिनीचे ‘८-अ’चे उतारेही जोडणे आवश्यक आहे.
 • अशा पद्धतीने तुमची वारस हक्क नोंद होईल आणि मयत व्यक्तीचे नाव कमी होऊन कुटुंबातील हयात मुख्य व्यक्तीचे नाव जमिनीच्या सातबारावर चढेल