GB WhatsApp download: जीबी व्हॉट्सॲप डाऊनलोड करा, जीबी व्हॉट्सॲप म्हणजे काय सजमून घेऊ

GB WhatsApp download

GB WhatsApp download: व्हॉट्सॲपने अगदी कमी कालावधीत जगातील ज्या भागात इंटरनेट पोहोचले आहे तेथील प्रत्येक व्यक्तीच्या फोनमध्ये जागा मिळवली.  इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सॲपचे अनेक फायदे आहेत. फक्त मेसेज सेंड करण्यासाठीच नाही तर फोटो, व्हिडीओ, डॉक्यूमेंट्ससह, व्हॉईस कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंगसुद्धा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून करता येते. व्हॉट्सॲपच्या या दैनंदिन कामी येणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे हे ॲप जगभरातील वापरकर्त्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले आहे. म्हणूनच ग्राहकांच्या बदलत्या मागण्यांमुळे व्हॉट्सॲपची कंपनी नवनवीन वैशिष्ट्ये त्यामध्ये अंतर्भूत करीत आहे.

याच दरम्यान मूळ व्हॉट्सॲपचे क्लोन ॲप म्हणजेच अगदी हुबेहुब व्हॉट्सॲप असलेले जीबी व्हॉट्सॲप बाजारात आले आहे. परंतु मूळ व्हॉट्सॲपपेक्षा सुरक्षेच्या बाबतीत हे  नवे जीबी व्हॉट्सॲप तितकेसे काही खास नाही. त्यामुळे हे डाऊनलोड करणे तुमच्यासाठी धोक्याचे  असू शकतो. या नव्या जीही व्हॉट्सॲप  ची वैशिष्ट्ये मात्र वापरकर्त्यांना भुरळ पाडणारी आहेत. म्हणूनच आपण आजच्या या  लेखामध्ये जीबी व्हॉट्सॲपबद्दल  सविस्तर माहिती मिळविणार आहोत.

मुळ व्हॉट्सऍपचे क्लोन  म्हणजे  GB WhatsApp

आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असलेल्या लोकप्रिय व्हॉट्सॲप  ची प्रतिकृती म्हणजेच GB WhatsApp.  हे नवे हुबेहुब बनवण्यात आलेले App  जुन्या  व्हॉट्सॲपच्या आधारे तयार करण्यात आले आहे. परंतु या नव्या Appमध्ये अनेक मनोरंजक फीचर्स असल्याचे सांगण्यात येते. ही वैशिष्ट्ये वापरकर्त्यांना भुरळ पाडत आहेत.  अशा प्रकारच्या क्लोन केलेल्या ॲप्सना मोडेड ॲप्स असे देखील म्हटले जाते. GB WhatsApp हे क्लोन ॲप अधिकृत नाही त्यामुळे ते  गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येत नाही. तसेच ते थर्ड पार्टी ॲप स्टोअरमधून डाउनलोड करता येऊ शकते. या जीबी व्हॉट्सॲपच्या वैशिष्ट्यांची अधिक माहिती आपण पुढील माहितीद्वारे समजून घेऊ.

GB WhatsApp download वापरकर्त्यांना भुरळ घालणारी वैशिष्ट्ये

  • जीबी व्हॉट्सॲपमध्ये मोठ्या आकाराच्या म्हणजेच 100MBपर्यंतच्या फाईल्स यावर पाठवता येणार आहेत.
  •  वापरकर्ते WhatsApp वर 16MB पेक्षा मोठ्या फाइल्स पाठवू शकत नाहीत.
  • सध्या मोठ्या आकाराच्या फाइल्स शेअर करण्यासाठी वापरकर्त्यांना टेलिग्रामचा वापर करावा लागतो.
  • परंतु जीबी व्हॉट्सॲपच्या मदतीने वापरकर्ते  १०० एमबीपर्यंतच्या फाइल्स देखील सहज दुसऱ्याला  पाठवू शकतात.
  • GB WhatsApp वापरकर्त्यांना त्यांच्या स्टेटस आणि डिपीबद्दलच्या गोपनीयतेवर अधिक लक्ष देते. उदा सांगायचे झाले तर,  तुम्ही तुमचं ऑनलाईन स्टेटस आणि टायपिंग स्टेटसही लपवू शकता.
  • तुम्हाला हवे असल्यास समोरच्याला कळणार नाही तुम्ही नेमकं ऑनलाईन आहात की नाही.
  •  सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे,  GB WhatsApp वापरकर्त्यांना मेसेज शेड्यूल देखील करता येणार आहेत.  
  • GB WhatsApp वापरकर्ते दुसऱ्याने  डिलीट केलेले मेसेज सुद्धा  वाचू शकणार आहेत.
  • दुसऱ्याचा स्टेटस आवडला तर तो डाउनलोड देखील करता येणार आहे.

GB WhatsApp कसे डाऊनलोड करावे

  • सर्वप्रथम स्मार्टफोनच्या ब्राउझरमध्ये जा आणि GB WhatsApp apk सर्च करा.
  • तेथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यातील GB WhatsApp च्या सर्वात नवीन  आवृत्तीचा पर्याय निवडून तो डाऊनलोड करा.
  • APK फाइल डाउनलोड केल्यानंतर, ही APK फाइल तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.
  • इंस्टॉल करताना  सिक्योरिटी मेसेज विचारले जातील त्यांना अप्रूव्ह करुन इंस्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण करुन घ्या.
  • पुढे मोबाईल नंबरसह GB WhatsApp मध्ये साइन इन करा.

GB WhatsApp वापरकर्त्यांनी घ्यावयाची काळजी

  • कोणतेही क्लोन किंवा मॉडेम ​ॲप्स हे सहसा सुरक्षित नसतात.
  • जीबी व्हॉट्सॲप देखील त्याला अपवाद नाही.
  • क्लोन आणि मोडेड ​ॲप वापरणाऱ्यांवर बंदी घालण्यासाठी व्हॉट्सॲपने कठोर धोरण आहे.
  • GB WhatsApp मधील मॅसेज एंड-टू-एंड इनक्रिप्टेड नसतात, त्यामुळे ते वापरकर्त्यांच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी धोकादायक असू शकतात.
  •  तसेच कंपन्यांकडून  जीबी व्हॉट्सॲपवर वापरकर्त्यांना सतत जाहिराती पाठवल्या जातात.
  • हे ​ॲप Google Play Store वर नाही म्हणून ते डाउनलोड करणे टाळावे.