Aadhar Mobile Link: आता घरबसल्या 5 मिनिटांत आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक करा

Aadhar Mobile Link

Aadhar Mobile Link  आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अत्यंत आवश्यक असलेले ओळखपत्र आहे. त्यामुळेच भारत सरकारने आधार कार्ड सर्व नागरिकांसाठी अनिवार्य केले आहे. UIDI म्हणजेच Unique Identification Authority of India असे संपूर्ण नाव आहे. प्रत्येक भारतीयाला देण्यात येणारा हा एक युनिक नंबर आहे, जो 12 अंकी असतो.  या दस्तावेजामध्ये व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, लिंग आणि व्यवसायाबाबातची माहिती नमूद केलेली  असते.

 शासकीय संस्थेमार्फत आधारकार्डची प्रक्रिया केली जाते. त्यासाठी एक वेगळा विभाग स्थापन करण्यात आला आहे.  याच आधार कार्डला व्यक्तीचा मोबाईल नंबर लिंक असणे शासनाने अनिवार्य केले आहे. आणि ही सुविधा नागरिकांना घरबसल्या देखील करता येईल यासाठी शासनाने तशी सोय केली आहे. त्यामुळे आपल्या नागरिकत्वाची ओळख सांगणारे आधारकार्ड आपल्या मोबाईल नंबरसोबत लिंक कसे करावे आणि त्याचे अपडेट्स कसे मिळवावे या संबंधी संपूर्ण माहिती आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. तसेच आधारकार्ड मोबाईल नंबरसोबत लिंक केल्याने नागरिकांचे कोणकोणते फायदे होतात हे देखील तुम्ही लेखाच्या शेवटी पाहू शकता.  Aadhar Mobile Link

पुढील सोप्या स्टेप्सच्या मदतीने तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डसोबत लिंक करा  How to do Aadhar Mobile Link?

 • सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाइल नंबरवरून 14546 या क्रमांकावर कॉल करा.
 • तुम्ही भारतीय नागरिक आहात  की दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतलेले भारतीय रहिवासी आहात याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्यापैकी भारतीय असा पर्याय निवडा.
 • पर्याय निवडल्यानंतर आधार कार्ड तुमच्या मोबाइल क्रमांकाशी लिंक करण्याची परवानगी विचारली जाईल. तुम्ही मोबाइलवरून 1 प्रेस केल्यानंतर तुमची परवानगरी असल्याचे गृहीत धरले जाईल. Aadhar Mobile Link
 • त्यानंतर  तुम्हाला  तुमचा 12 अंकी आधार क्रमांक सांगावा लागेल. त्यानंतर परत  1 अंक दाबा लागेल. जर का तुम्ही तुमचा आधार क्रमांक चुकीचा टाकला असेल तर तुम्हाला दुसरा पर्याय दिला जातो.
 • त्यानंतर तुम्हाला  एक OTP तुमच्या मोबाईलवर येईल.
 • आयव्हीआर प्रक्रियेने तुमच्याकडे मोबाइल क्रमांक मागितला जाईल.
 • त्यानंतर दुसऱ्या बाजूस असलेल्या  मोबाइल ऑपरेटरला तुमचं नाव, जन्मतारीख वय इत्यादी माहिती द्यावी लागेल.
 • त्यानंतर  आयव्हीआर तुमच्या मोबाइल क्रमांकातील शेवटचे चार क्रमांक वाचून दाखवतील आणि ते बरोबर आहेत का असा प्रश्न  तुम्हाला विचारला जाईल. तुम्ही ते कन्फर्म करणे आवश्यक असते.
 • तुमची कन्फर्मेशन मिळाल्यानंतर तुम्ही एसएमएसद्वारे आलेला OTP टाका. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला 1 दाबावा लागेल.
 • त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होऊन तुमचा मोबाइल नंबर  तुमच्या आधार क्रमांकासोबत जोडला जाईल.

आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याचे फायदे  benefits of Aadhar Mobile Link

 • आपले आधाक कार्ड आणि आपला मोबाईल नंबर लिंक केलेला असेल तर आपल्याला केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सहजरित्या घेणे शक्य आहे. 
 •  शालेय मुलांना शिष्यवृत्ती साठी अर्ज करताना त्यांच्या आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक असल्यास शिष्यवृत्तीच्या अर्जाची प्रक्रिया लवकर होते,
 • पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, पासपोर्ट सारखी ओळखपत्रे काढायची असल्यास आपल्याला आधारकार्ड विचारले जाते अशावेळी आधारकार्ड आपल्या मोबाईल नंबरला लिंक केलेले असेल तर ही ओळखपत्रे ऍक्टिव्ह झाल्याचे मॅसेज आपल्या मोबाईलवर येतात.
 • केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या शासकीय योजनांमार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जेव्हा पैसे जमा होतात तेव्हा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलेले असेल तर पैसे जमा झाल्याचा मॅसेज मोबाईलवर येतो.
 • लहान मुलांच्या आधारकार्डशी आई वडिलांपैकी एकाचा कोणाचातरी मोबाईल नंबर लिंक असेल तर त्याचा खूप फायदा होतो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुलगा कुठेही चुकला असल्यास त्याच्या हाताच्या ठशांवरून त्याचे आधारकार्ड शोधता येते आणि त्याला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्याच्या आईवडिलांना संपर्क करणे सोपे होते.  benefits of Aadhar Mobile Link 

1 thought on “Aadhar Mobile Link: आता घरबसल्या 5 मिनिटांत आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक करा”

Comments are closed.