Get loan from bank of Maharashtra: बँक ऑफ महाराष्ट्र शेतजमीन खरेदी करण्यासाठी देत आहे 10 लाखांचे कर्ज!

काही छोट्या शेतकऱ्यांकडे जमीन कमी असल्याने त्यांना हवे तसे उत्पादन घेता येत नाही. तर काही व्यवसायिक परंतू शेतीची आवड असलेल्यांना जमीन नसल्याने शेती करता येत नाही अशांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रामार्फत जमीन खरेदी कर्ज योजना राबवली जात आहे. लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी जमीन खरेदी करण्याकरीता बँक ऑफ महाराष्ट्रामार्फत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अर्जदार बँकेकडे अर्ज करुन 10 लाखापर्यंतचे जमीन खरेदीसाठीचे कर्ज मिळवू शकेल. तसेच 10 लाखापेक्षा जास्त किंमतीचे देखील कर्ज मिळविता येईल फक्त त्यासाठी जास्तीचे व्याजदर अर्जदाराला भरावे लागणार आहे. याबाबत अधिक माहिती मिळवूया या लेखाच्या माध्यमातून. Get loan from bank of Maharashtra

जमीन खरेदी कर्ज योजनेमागील उद्देश

बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची स्वतंत्र बँक आहे. 16 सप्टेंबर 1935 मध्ये या बँकेची स्थापना करण्यात आली आणि महाराष्ट्रातील जनतेच्या उन्नतीसाठी आणि आर्थिक व्यवहार सुरळीत चालण्यासाठी एक स्वतंत्र वित्तिय संस्थेची स्थापना करण्यात आली. बँक ऑफ महाराष्ट्र नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध आर्थिक सहाय्याच्या योजना राबवत आली आहे. आता देखील शेतीविषयक उद्देशाने जमीन खरेदी करण्याच्या उद्देशाने बँक ऑफ महाराष्ट्र ही वित्तिय संस्था अर्जदारांना कर्ज देत आहे. जेणेकरुन शेती व्यवसायाला चालना मिळेल. कर्ज घेऊन जमीन विकत घेतल्यानंतर जमीन मालक त्यावर शेती किंवा झाडांची लागवड करतील. त्यामुळे उत्पन्नात देखील भर पडेल. Get loan from bank of Maharashtra

जमीन खरेदी कर्जासाठी अर्जदाराची पात्रता

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जमीनीवर कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करताना अर्जदाराची पुढीप्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे.

  • अर्जदार शेतकऱ्याची किमान अडीज एकर जमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार खरेदी करणार असलेली जमीन अडीज एकरावर सिंचन असणे आवश्यक किंवा 5 एकर जमीन निर्जंतुक कलेलेली असणे आवश्यक आहे.
  • या कर्जासाठी शेतीविषयक पार्श्वभूमी असलेला उद्योजकही पात्र असेल. Get loan from bank of Maharashtra

जमीन खरेदी कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • कर्जाचा अर्ज, फ़ॉर्म नं. 138 बिन्झर बी 2
  • जमिनीचा 7/12 उतारा
  • जमिनीचा उतारा 8अ
  • जमिनीचा 6डी अर्क
  • अर्जदाराचे चतुःसिमा
  • अर्जदारावर 1.60 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज नसल्याचे वकिलांकडून घेतलेले तपासणी पत्र
  • हमी फॉर्म F-138
  • PACS जामिनदारांचे प्रमाणपत्र देय

जमीन खरेदी कर्ज परतफेडीचा कालावधी

बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत जमिन खरेदीसाठी देण्याच येणारे कर्ज हे एक मुदत कर्ज आहे. हे कर्ज घेतल्यास ते परतफेडीचा कालावधी 7 ते 10 वर्षांचा असतो. आणि या दरम्याने मासिक, तिमाही, सहामाही अशा पद्धतीने EMI ठरविण्यात येतात. कर्ज परतफेडीच्या कालावधीत जमीन मालक पैसे देऊ शकला नाही तर उरलेल्या रकमेवर अधिक व्याज लागते आणि कर्ज वाढत जाऊ शकते. त्यामुळे घेतलेले कर्ज वेळेवर भरणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. Get loan from bank of Maharashtra

जमीन खरेदी कर्जावर बँकेकडून किती व्याजदर लावला जातो?

बँक ऑफ महाराष्टमार्फत जमीन कर्ज मिळविल्यानंतर घेतलेल्या रकमेवर व्याज भरावे लागते. व्याजदराबाबतची संपूर्ण माहिती बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे, त्याप्रमाणेच आम्ही येथे ती माहिती घेऊन आलो आहोत.

  • 10 लाख रुपये पर्यंतच्या कर्जावर 1 वर्ष MCLR + BSS साठी 0.50% + 2.00% इतका व्याजदर आकारला जातो.
  • 10 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जावर 1 वर्ष MCLR + BSS साठी 0.50% + 3.00% इतका व्याजदर आकारला जातो.

जमीन खरेदीसाठी कर्जाचा अर्ज कुठे करावा

जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज हवे असल्यास बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

https://bankofmaharashtra.in/mar/farmers-loan-for-purchase-of-land या लिंकवर क्लिक करुन तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. समोरच तुम्हाला योजनेचीस र्व माहिती दिसेल आणि माहितीच्या खाली ‘अर्ज करा’ लिहिलेले हिरव्या रंगाचे बटन असेल त्यावर क्लिक करा. अर्जात विचारण्यात आलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा, सोबत तुमचा मोबाईल नंबर आणि आधारकार्ड असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे दोन फोट देखील सोबत ठेवा. संपूर्ण माहिती भरुन झाल्यानंतर एकदा सर्व माहिती तपासा आणि सबमीट करा. बँकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती तपासून तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय केला जाईल. तसेच बँकेचे अधिकारी तुम्ही विकत घेणार असलेली जमीनीची पाहणी देखील करायला येऊ शकतात. Get loan from bank of Maharashtra