वाहतुकीचे नियम पाळूच आपण ड्रायव्हिंग करावी जेणेकरुन आर्थिक भूर्दंड सोसावा लागत नाही. वाढत्या आपघातांमुळे भारत सरकारने सध्या वाहतुकीचे नियम अत्यंत कडक केले आहेत आणि वाहतुकीचे नियम तोडल्यास होणारे दंड देखील वाढविण्यात आले आहे. तुमच्या गाडीवर वाहतुक पोलीसांकडून एखादे चलान बसले असेल तर तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता. E Challan
परिवहन विभागाचे नवे ऍप
रस्ते आणि वाहतूक मंत्रालयामार्फत mParivahan नावाचे मोबाईल ऍप बनविण्यात आले आहे. या ऍपच्या मदतीने तुम्ही तुमच्या गाडीवर कधी आणि कोणत्यावेळी दंड लागला आहे हे तपासू शकता. दंड लावण्यामागचे पुरावे देखील तुम्हाला या ऍपवर पाहता येतात. वाहतुक विभागामार्फत अत्यंत सुत्रपणे आणि विकसित तंत्रज्ञानाचा वापर करुन हे ऍप बनविण्यात आले आहे. आतापर्यंत तब्बल 5 कोटीहून जास्त नागरिकांनी हे ऍप डाऊनलोड केलेले आहे. तसेच खाली नमूद केल्या प्रमाणे तुम्ही परिवहन विभागाच्या वेबसाईटला भेट देऊ शकता आणि जाणून घेऊ शकता की वाहतूक नियम मोडल्यामुळे किती दंड भरावा लागू शकतो.
- https://play.google.com/store/apps/details/NextGen_mParivahan?id=com.nic.mparivahan&hl=mr या लिंकवर जाऊन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये mParivahan ऍप डाऊनलोड करु शकता.
- तसेच परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी
https://parivahan.gov.in/parivahan//en/content/mparivahan या लिकंवर क्लिक करा.
तुमच्या गाडीवरील E Challan पाहण्यासाठी पुढील प्रक्रिया करा
- तुमच्या मोबाईलमधील Play store मध्ये जाऊन mParivahan हे ऍप डाऊनलोड करा. वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करुन देखील तुम्ही हे ऍप डाऊनलोड करु शकता.
- mParivahan तुमच्या मोबाईमध्ये ओपन करा.
- सुरुवातीलाच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. तो भरा.
- तुम्हाला तुमच्या मोबाईलवर OTP येईल तो तेथे भरा आणि मोबाईल ऑथेटिफिकेशन पूर्ण करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या गाडीचा क्रमांक जोडावा लागेल.
- त्यानंतर मुख्य पानावर तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यामध्ये E Challan हा पर्याय असेल.. तो पर्याय निवडा.
- तुमच्या गाडीवर एखादे चलान लागले असेल तर ते तिधे दिसेल आणि किती दंड आहे ते देखील दिसेल.
- दंड भरण्यासाठी ऑनलाईन पे सिस्टिम उपलब्ध आहे.
- तसेच तुम्हाला कोणत्या कारणासाठी दंड लावण्यास आला आहे त्याचे फोटो देखील ऍप वर अपलोड करण्यात आलेले असतील ते देखील तुम्ही तपासू शकता.
- तुमचे E Challan तुम्ही दिलेल्या मुदतीत भरणे आवश्यक असते, तसे न केल्यास तुम्हाला त्यावर अधिक पैसे भरावे लागू शकतात. E Challan
वाहतुकीचे सर्वसाधारण नियम आणि कायदा
अनेकदा तरुण वेगाच्या नशेत भरधाव गाडी चालवतात त्यावेळी वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. परंतू असे वारंवार घडल्यास अपघात होऊ शकतो या गोष्टी लक्षात घेता शासनाकडून काही दंडनीय कायदे करण्यात आले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यानुसार खाली सर्व कायद्यांन्वये व्यक्तीने वाहतुकीचे नियम तोडल्यास ती व्यक्ती दंडास पात्र असेल. चला तर मग जाऊन घेऊ कोण कोणती कलमे आहेत जी सर्वसाधारण वाहतुकीसाठी बनविण्यात आलेली आहेत.
- वाहन चालकाने वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास कलम ११२ अन्वये दंडास पात्र
- भार क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक केल्यास कलम ११३ अन्वये दंडास पात्र
- वाहतूक चिन्हांचे व संकेतांचे उल्लंघन केल्यास कलम ११९ अन्वये दंडास पात्र
- वाहन धोकादायक स्थितीत उभे करून ठेवल्यास कलम १२२ अन्वये दंडास पात्र
- चालकास अडथळा होईल अशा ठिकाणी प्रवासी किंवा एखादी वस्तू ठेवल्यास कलम १२५ अन्वये दंडास पात्र
- हॅल्मेट घातल्याशिवाय वाहन चालविल्यास कलम १२८ अन्वये दंडास पात्र
- कलम १३२ नुसार गणवेशधारी अधिकाऱ्याने थांबण्याचा इशारा दिल्यानंतर वाहन थांबविणे आवश्यक असते.
- कलम १३४ मध्ये असे सांगण्यात आले आहे की, अपघात घडल्यानंतर संबंधित महिती २४ तासांच्या आत पोलिसांना कळविणे व अपघातग्रस्तांना योग्य ती मदत करणे.
- दारू किंवा अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालविल्यास कलम १८५ अन्वये दंडास पात्र
- मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अपात्र असताना वाहन चालविल्यास कलम १८६ अन्वये दंडास पात्र.
- महाराष्ट्र मोटार वाहन नियम २५० अ नुसार वाहन चालवित असताना मोबाईल फोनचा वापर केल्यास दंडास पात्र E Challan