Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण सुरूच, वाचा तुमच्या शहरातील दर

Gold-Silver Price Today: सोने आणि चांदीच्या किमती हे त्याच्या दरातील चढ उतार आणि ग्राहकांच्या भावना दर्शविणारे प्रमुख संकेतक आहेत. सोन्या चांदीच्या भावात दररोज चढ-उतार होणे ही गोष्ट काही नवीन नाही, आणि म्हणूनच या किमती धातूच्या किमतींबद्दल सतत अपडेट राहणे गुंतवणूकदार, ज्वेलर्स आणि ग्राहकांसाठी महत्त्वाचे आहे. आज, आजच्या या लेखात आपण भारतातील सोन्या-चांदीच्या नवीन किंमती, उत्पादन शुल्क, त्यावर लागणार टॅक्स आणि या किमतीमुळे निर्माण होणारे फरक याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. शिवाय, एका अशा ॲप बद्दल देखील माहिती देणार आहोत जे ग्राहकांना सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी आणि हॉलमार्किंग किंवा त्यांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांमध्ये जर इतर काही तक्रारी आढळून आल्या तर त्याबाबत तत्काळ तक्रारी नोंदविण्यास हे ॲप ग्राहकांना मदत करते. Gold-Silver Price Today

सोन्या आणि चांदीच्या आजच्या किमती | Gold and Silver Prices Today | Gold-Silver Price Today
24-कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा सध्याचा दर हा 57,500 रुपये आहे, जो मागील बंद किंमत म्हणजेच (भाव ज्या किमतीवर बंद झाला होता) 57,490 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या तुलनेत किंचित वाढला आहे. तसेच या दरम्यान, चांदीचा भाव सध्या 69,780 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे, जो मागे 69,770 रुपये प्रति किलोग्राम इतका होता. इथे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेस हे प्रत्येक राज्यात वेगळे असल्याने संपूर्ण भारतभर सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भिन्न असू शकतात.

प्रादेशिक सोन्याच्या किमती | Regional Gold Prices | Gold-Silver Price Today
सोन्याच्या किमतीत प्रत्येक राज्यानुसार होणारा बदल हा विशेष लक्ष देण्यासारखा आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅमसाठी 52,708 रुपये आहे, तर त्याच वजनासाठी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर हा 57,500 रुपये इतका आहे. 22-कॅरेट सोने 52,708 रुपये आणि 24-कॅरेट सोन्याचा दर 57,500 रुपये प्रति 10 ग्रॅम असाच भाव पुण्यात देखील बघायला मिळू शकतो. दरम्यान, नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,708 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,500 रुपये आहे. नाशिकमधे हेच दर 22-कॅरेटसाठी 52,708 रुपये आणि 24-कॅरेट सोन्यासाठी 57,500 रुपये प्रति 10 ग्रॅम अशा प्रकारे पाहायला मिळू शकतात. Gold-Silver Price Today

बीआयएस केअर ॲप | BIS Care App


बीआयएस केअर ॲप हे सोन्या चांदीची खरेदी करताना या धातूंची शुद्धता तपासून या मधे गुंतवणूक करण्याबद्दल योग्य माहिती देण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ‘BIS Care App’ ग्राहकांना सोन्याच्या शुद्धतेची पडताळणी करण्यासाठी आणि त्यामधे काही तफावत आढळल्यास तक्रार नोंदवण्यासाठी एक सोयीस्कर उपाय प्रदान करते. हे ॲप हॉलमार्किंग, परवाना, नोंदणी आणि सोन्याच्या वस्तूंच्या हॉलमार्क क्रमांकाविषयी संपूर्ण माहिती ग्राहकांना देते. जर दागिन्यांमध्ये किंवा सोन्या चांदीच्या वस्तूंमध्ये, वरीलपैकी कोणतीही बाब चुकीची आढळून आल्यास, ग्राहक अॅप वापरून समस्यांची तत्काळ तक्रार करू शकतात. याव्यतिरिक्त, हे ॲप दगिण्यांबद्दल त्वरित तक्रार कशी नोंदवायची याबद्दल देखील उपयुक्त माहिती देते. Gold-Silver Price Today

सोन्याची शुद्धता कशी ओळखाल? How do you know the purity of gold?

24-कॅरेट शुद्ध सोनं असल्यास त्यावर 999 असे लिहिलेले असते
तेच जर 22-कॅरेट सोनं असेल तर त्यावर 916 लिहिलेले असते.
21 कॅरेट शुद्ध सोनं असल्यास त्यावर 875 असे लिहिलेले असते
18 कॅरेट शुद्ध सोनं असल्यास त्यावर 750 असे लिहिलेले असते
14 कॅरेट शुद्ध सोनं असल्यास त्यावर 585 असे लिहिलेले असते

सोने आणि चांदीच्या किमतीतील दैनंदिन चढउतारांचा ग्राहक, ज्वेलर्स आणि गुंतवणूकदार या सगळ्यांवर विशेष परिणाम होऊ शकतो. या सोन्या चांदितील गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी यांच्या दरातील माहिती असणे आवश्यक आहे. भारतातील विविध क्षेत्रांमधील किमतीतील तफावत कर आणि मेकिंग चार्जेस मुळे येणाऱ्या अडचणी दर्शवते. त्याशिवाय, ‘बीआयएस केअर’ सारख्या ॲप द्वारे सोन्याची शुद्धता ठरवण्यासाठी ग्राहकांना सक्षम करण्यात तंत्रज्ञानाची देखील महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं दिसून येत आहे. या बीआयएस केअर ॲप मुळे नक्कीच सोन्या चांदीत गुंतवणूक करणाऱ्या किंवा गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांना एक उपयुक्त प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. Gold-Silver Price Today