Google Pay Personal Loan अ‍ॅपच्या माध्यमातून लोन मिळवा.

Google Pay Personal Loan

Google Pay Personal Loan डिजिटल इंडियाचा प्रवास आता अत्यंत वेगाने सुरु आहेत. त्यात बँकिंग व्यवस्था देखील डिजिटल होत आहेत. कोणालाही कुठुनही अगदी काहीच सेकंदात पेसं पाठवणे त्यामुळे शक्य आहे. Google Pay या App मुळे अनेक व्यवहार सुरळीच झाले आहेत. सुट्या पैशांच्या कटकटीतून तर कायमची सुटका झाली. रिक्षावाले, दुकानदार, भाजीवाल्यांना क्यूआर कोडद्वारे पैसे दिले जातात. आजच्या काळात आर्थिक व्यवहारांसाठी बरेच अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. परंतु Google Pay अ‍ॅप हे विश्वसनीय आणि सुरक्षित अ‍ॅप असल्याचे लक्षात येते.  या ऍपच्या माध्यमातून तुम्ही कोणालाही, कोणत्याही शुल्काशिवाय थेट तुमच्या बँक खात्यातून पैसे पाठवू शकता.  तुमचा संपर्क Google Pay वर नसला तरीही तुम्ही पैसे पाठवू किंवा मिळवू शकता.

भारतात 19 सप्टेंबर 2017 रोजी तत्कालीन वित्तमंत्री मा. अरुण जेटलीजी आणि  Next Billion Users चे व्हाईस प्रेसिडंट आणि जनरल मॅनेजर सीझर सेनगुप्ता यांच्या उपस्थितीत Google Tez app लाँच करण्यात आले. नंतर काही दिवसांनी म्हणजेच 28 ऑगस्ट 2018 रोजी Google Tez appचे नाव बदलून Google pay असे करण्यात आले.

कर्ज मिळविण्याविषयी अधिक माहिती Loan From Google Pay

Google Pay Loan: गुगल इंडियाने (Google India) छोट्या व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी गुगल पे ऍप्लिकेशनद्वारे (Google Pay App) कर्ज देण्याची सुविधा सुरू केली आहे. गुगल इंडियाने सांगितले की, भारतातील व्यापाऱ्यांना अनेकदा छोट्या कर्जाची गरज असते. ही गरज लक्षात ठेवून Google Pay व्यापाऱ्यांना 15,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे, ज्याची परतफेड 111 रुपयांच्या सुलभ रकमेत करता येईल.  

छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज देण्यासाठी Google Pay ने DMI Finance सोबत भागीदारी केली आहे. इतकंच नाही तर, Google Pay ने ePayLater च्या भागीदारीत व्यापार्‍यांसाठी क्रेडिट लाइन सक्षम करण्याची सुविधा देखील सुरू केली आहे. याचा वापर करुन व्यापारी सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदी करू शकतील.

Google Pay च्या माध्यमातून व्यावसायिकांना 1 ते 2 लाखापर्यंतचे कर्ज देखील उपलब्ध आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी दिला जातो.  तुम्हाला Google Pay वरून व्यवसायासाठी कर्ज हवे असल्यास सर्वप्रथम तुमचे Google Pay for Business अॅपवर खाते असणे आवश्यक आहे.

Google pay मार्फत कर्ज मिळविण्यासाठी पुढील प्रोसेस करा.

तुम्हाला Google Pay वरून व्यवसायासाठी कर्ज हवे असल्यास सर्वप्रथम तुमचे Google Pay for Business अॅपवर खाते असणे आवश्यक आहे. तुम्ही 8 स्टेप्समध्ये Google Pay द्वारे व्यवसायासाठी कर्ज मिळवू शकता.

  • सर्वप्रथम तुमचे Google Pay for Business अॅप उघडा.
  • यानंतर लोन्स विभागात जा आणि ऑफर्स टॅबवर क्लिक करा.तेथे तुम्हाला हवी असलेली कर्जाची रक्कम निवडावी लागेल आणि Get start वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्या Google खात्यात लॉगिन करा. तिथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. तसेच कर्जाची रक्कम आणि किती कालावधीसाठी कर्ज घ्यायचे आहे ते ठरवावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या कर्जाला रिव्ह्यू करावे लागेल आणि ई-साईन करावी लागेल.
  • हे सर्व केल्यानंतर तुम्हाला काही केवायसी कागदपत्रे सबमिट करावी लागतील, ज्याद्वारे तुमची पडताळणी केली जाईल.
  • यानंतर EMI पेमेंटसाठी तुम्हाला Setup eMandate किंवा Setup NACH वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल, जे तुम्ही अॅपच्या माय लोन सेक्शनमध्ये पाहू सकता.

Google Pay App च्या माध्यमातून आता छोटे कर्ज मिळविणे सोपे झाले आहे. भारतातील सर्वसामान्यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारामध्ये महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या Google Pay App आता त्याच सर्वसामान्यांचे आर्थिक अडचणीचे प्रश्न देखील सोडवणार आहे. भारतातील अनेक आर्थिक व्यवहार करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या ऍप्सपैकी अत्यंत विश्वसनीय ऍप म्हणून सध्या जगभरात  या ऍपचे 150 दशलक्ष वापरकर्ते आहेत. गुगल पे एका दिवसात 10 ची कमाल व्यवहार मर्यादा देखील निश्चित केली आहे. वापरकर्ते या अॅपवरून एका दिवसात फक्त 10 व्यवहार करू शकतील. त्याचवेळी या अॅपद्वारे एका दिवसात एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम हस्तांतरित केली जाऊ शकते.