भारतातील पंचायतराजमधील सर्वात खालचा परंतु अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 कलम 5 नुसार ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी गावात किमान 600 लोकसंख्या असणे आवश्यक सते. डोंगरी भागात हे प्रमाण 300 आहे. ग्रामिण भागापर्यंत केंद्र पातळीवरील सर्व सोयी सुविधा, योजना पुरविता याव्यात म्हणून जिल्हापातळी आणि त्यानंतर ग्रामपंचायत असे विकेंद्रिकरण करण्यात आले आहे. ग्रामपंतायतीमार्फत गावाचा कारभार चालविला जातो तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून येणाऱ्या योजनां गावातील नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जातात. चला तर मग या लेखाच्या माध्यमातून पाहू की यावर्षीच्या म्हणजेच 2024 मध्ये ग्रामपंचायत पातळीवर कोणकोणत्या योजना लागू करण्यात आल्या आहेत. Gram Panchayat Yojana 2024
ग्रामपंतायत पातळीवरील केंद्र पुरस्कृत योजना
ग्रामपंतायतीच्या माध्यमातून गावागावात केंद्र पुरस्तृत योजना राबविण्यात येतात. या योजना पुढील प्रमाणे आहेत.
- कायमस्वरुपी विक्री केंद्र बांधणे
- श्यामा प्रसाद मुखर्जी रूर्बन अभियान
- राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम
- महालक्ष्मी सरस प्रदर्शन
- दीन दयाल उपाध्याय कौशल्या विकास योजना
- प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण
- महिला किसान सशक्तीकरण कार्यक्रम
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनशैली मिशन
- प्रधान मंत्री ग्राम सडक योजना
- राष्ट्रीय ग्रामस्वराज योजना Gram Panchayat Yojana 2024
ग्रामपंचायत पातळीवरील राज्य पुरस्कृत योजना
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत योजना राबविल्या जातात
- तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम
- वित्त आयोग
- स्मार्ट ग्राम योजना
- ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान
- मुख्यमंत्री ग्राम सडक योजना
- जिल्हा परिषद व पंचायत समिती इमारत बांधकामाकरीता सहाय्यक अनुदान Gram Panchayat Yojana 2024
मनरेगाच्या माध्यमातून ग्रामिण विकास
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ साली करण्यात आला आणि या कायद्यानुसार ग्रामिण भागातील गरजू आणि काम करु इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस रोजगार मिळावा यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला.
- https://nrega.nic.in/stHome.aspx या लिंकवर क्लिक करुन तुम्ही मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता
- वेबसाईटच्या मुख्य पानावर तुम्हाला भारतातील सर्व राज्यांची नावे दिसतील त्यापैकी आपल्या राज्याचा म्हणजे Maharastra असा पर्याय निवडा
- त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हा, तालुका आणि मग ग्रामपंचायत निवडा.
- सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीत मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या योजना दिसून येतील.
- या योजनांतर्गत कोणी कोणी लाभ घेतला आहे हे देखील तेथे तुम्ही पाहू शकता.
- मनरेगा योजने अंतर्गत अनेकांना रोजगार पुरविला जाते त्याची एक यादीच तुम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून पाहू शकता. Gram Panchayat Yojana 2024
ग्राम पंचायत व पंचायतराज विभाग महाराष्ट्र राज्य
ग्राम पंचायत व पंचायतराज विभाग महाराष्ट्र राज्य या आधिकृत वेबसाईटवर जाऊन बघू शकता. https://rdd.maharashtra.gov.in/state ही या वेबसाईटची लिंक आहे.
ही आहेत ग्रामपंचायतीची कामे
गावाचा कारभार योग्य पद्धतीने चालावा यासाठी ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीचे कामकाज चालते. ग्रामपंतायतीअंतर्गत नेमकी कोणकोणती कामे केली जातात ते आपण पुढे पाहू. Gram Panchayat Yojana 2024
- गावात रस्ते बांधणे.
- गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.
- दिवाबत्तीची सोय करणे.
- गावातील जन्म, मृत्यू व विवाहाची नोंद ठेवणे.
- सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
- सांडपाण्याची व्यवस्था करणे.
- पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
- शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे.
- शेती विकासासंबंधी योजना राबवणे
- जत्रा, गावाचा बाजार, उत्सव, उरुस यांची व्यवस्था पाहणे.
- ग्राम पंचायत हद्दीतील येणारे कर व शासना कडून येणारी निधी यांचा योग्य त्या ठिकाणी वापर करावा. Gram Panchayat Yojana 2024