bhrashtachari sarpanch gramsevak talathi online complaint in marathi: ग्रामसेवक, तलाठी, रेशन चालक काम करत नसतील तर अशी करा ऑनलाईन तक्रार

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध उपक्रम राबवले आहेत. परंतु आजही ग्रामिण पातळी पासून ते देश पातळीवर शासकीय अधिकारी कामे करण्यासाठी पैशांची मागणी करताना दिसतात किंवा बरेचदा कामांच्या फाईल्स अडवून ठेवताना दिसून येतात.  राज्यपातळीवर, जिल्हापातळीवर आणि ग्रामपंचायत पातळीवर कोणी शासकीय अधिकारी नागरिकांची कामे करण्यासाठी नकार देत असतील तर नागरिकांना नेमकी कुठे तक्रार केली पाहिजे हे अनेकांना माहित नसते. म्हणूनच आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून नागरिकांना जागृत करण्यासाठी सविस्तर माहिती देत आहोत. लेख संपूर्ण वाचा आणि जर का शासकीय अधिकारी तुम्हाला एखाद्या शासकीय कामासाठी अडवणूक करीत असतील तर तक्रार जरुर करा. bhrashtachari sarpanch gramsevak talathi online complaint in marathi

अशा करा ऑनलाईन तक्रार

तुम्हाला एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करायची असेल तर पुढील प्रक्रिया करा.

  • शासकीय अधिकाऱ्यांची तक्रार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला  भेट द्या.
  •  https://grievances.maharashtra.gov.in/mr या लिंकवर क्लिक करुन तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
  • जर तुम्ही नवीन असाल तर तुमची सर्व माहिती भरून लॉगिन आयडी तयार करावा लागेल त्यानुसार  पासवर्ड देखील जनरेट करावा लागेल. 
  • सर्वप्रथम तुम्ही तुमचा ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबरच्या मदतीने लॉगिन करा.
  • पासवर्ड टाकून लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर विविध पर्याय उपलब्ध होतील.
  • ‘तक्रार नोंदवा’हा पर्याय तुम्हाला समोर दिसेल त्याच्यावरती क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्मतारीख, पत्ता, लिंग, व्यवसाय, राज्य, शहर, जिल्हा तालुका, पिनकोड, मोबाईल नंबर ईमेल आयडी हे सर्व निट भरा.
  • त्यानंतर तुम्हाला तक्रारीचा तपशील द्यायचा आहे.
  • येथे पुन्हा एकदा  तुम्हाला जिल्हा, तालुका आणि गाव ते निवडायचे आहे.
  • यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ज्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार करणार आहे, त्याचा विभाग निवडायचा आहे त्यानंतर कार्यालय आणि तक्रारीचे स्वरूप हे तुम्हाला निवडायचे आहे.
  • त्यानंतर तुमची तक्रार काय आहे? तुमची कोणती कामे होत नाहीत? तुमची कोणी कामे अडवले आहेत? याची सर्व संपूर्ण माहिती भरायचे आहे. त्याची मर्यादा 3000 शब्दापर्यंत दिलेली आहे.
  • तक्रारकर्त्याकडे संबंधित शासकीय अधिकाऱ्याच्या विपोधाक काही पुरावे असतील तर ते देखिल तक्रारकर्ता फोटोच्या किंवा पीडीएफ च्या माध्यमातून ऑनलाईन  तक्रारीसोबत जोडू शकतो.
  • आता पुढे कॅपच्या भरून पूर्वावलोकन हे ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला टोकन आयडी भेटेल.
  • पुढे तुम्हाला संबंधित विभागाच्या माध्यमातून मोबाईल नंबर दिला असेल तर त्याच्यावरती कॉल किंवा ई-मेल पाठवले जातात.
  • तुम्ही तक्रार केलेल्या संबंधित शासकीय विभागातील अधिकाऱ्याला नोटीस पाठवली जाते आणि संबंधित तक्रारीविषयी कारण विचारले जाते.
  • त्यामुळे तुम्हाला कोणतीही सरकारी कार्यालयातील कामे कोणत्याही प्रकारची लाच न देता करायचे असतील तर ही पद्धत नक्कीच अवलंबा तुम्हाला त्याचा फायदा होईल. bhrashtachari sarpanch gramsevak talathi online complaint in marathi

तक्रार केल्यामुळे काय काय होईल?

नागरिक म्हणून आपले काही हक्क असतात. शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा ग्रामपंचायत आणि जिल्हा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आपली कामे करुन देणे त्यांना अनिवार्य असते. कारण नागरिकांची कामे करण्यासाठी आणि त्यांना सेवा सुविधा पुरविण्यासाठीच त्या  शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली असते. जनतेच्या करातूनच या शासकीय अधिकाऱ्यांना पगार मिळत असतो. त्यामुळे नागरिकांनी कोणालाही न घाबरता शासकीय अधिकाऱ्यांनी कामे करण्यास नकार दिल्यास किंवा कामे करण्यासाठी पैशांची मागणी केल्यास तक्रार नोंद करा. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि एक ना एक दिवस बदल नक्की अनुभवता येईल. bhrashtachari sarpanch gramsevak talathi online complaint in marathi

एमपीएससी आणि युपीएससी मार्फत निवडलेल्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिली जाते

देश पातळीवरील आणि राज्य पातळीवरील शासकीय संस्थांमधील विविध स्तरावरील कर्मचारी निवडताना MPSC आणि UPSC या परीक्षा होतात. या परीक्षांच्या माध्यमातून देखील अधिकाऱ्यांना शपथ दिली जाते की ते भारतीय नागरिकांचा सन्मान करीत आणि कोणतेही शासकीय काम करताना पैशांची मागणी किंवा कामात अडथळा आणणार नाही. bhrashtachari sarpanch gramsevak talathi online complaint in marathi