High Demand Jobs: Indeed नावाच्या रिक्रूटमेंट प्लॅटफॉर्मने 2024 मधील भारतातील सर्वोत्तम नोकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे, 2024 वर्षातील भारतातील सर्वोत्तम नोकऱ्यांची यादी जाणून घ्या | High Demand Jobs दररोज अनेक लोक नोकरीच्या विविध संधी विविध प्रकारच्या माध्यमांतून शोधतच असतात. याशिवाय हे लोक अनेक लोकांकडून चांगल्या नोकऱ्यांची माहितीही घेतच असतात. जर तुम्ही देखील त्यापैकीच एक असाल, तर ‘द इंडियन एक्स्प्रेस’ च्या एका लेखानुसार Indeed नावाच्या जॉब प्लॅटफॉर्मने 2024 मधील सर्वोत्तम नोकऱ्यांची यादी शेअर केली आहे आणि याबद्दलच आता आपण अधिक जाणून घेणार आहोत. High Demand Jobs
Indeed या जॉब प्लॅटफॉर्म अनुसार तंत्रज्ञान, इंजिनियरिंग, सोशल मीडिया, फायनान्स आणि थेरपी या क्षेत्रांत यावेळी नोकरीच्या उत्तम संधी असल्याचं सांगितल जात आहे. वास्तविक पाहता या अहवालात असे म्हटले आहे की नोकरीची उपलब्धता, पगार, संधी वाढ तसेच घरातून काम किंवा हायब्रीड नोकरीच्या संधींबद्दल सर्व बाजूंनी अभ्यास केल्यानंतरच ही यादी जाहीर करण्यात आली आहे. तर त्या नोकऱ्या कोणत्या आहेत हे आता आपण जाणून घेऊया.
अभ्यासानुसार भारतातील सर्वोत्तम नोकऱ्यांची यादी | High Demand Jobs
पहिल्या क्रमांकावर ‘senior engineer’ ची नोकरी असून उमेदवाराला सरासरी 9 लाख 12 हजार 307 रुपये वेतन दिले जाते. या खाली ‘ऑपरेशन लीड’ पदावर असलेल्या उमेदवारांना सात लाख नऊ हजार रुपये पगार मिळतो. तर सोशल मीडिया मॅनेजरची नोकरी तिसऱ्या क्रमांकावर येते, या पदावरील उमेदवाराला सरासरी 4 लाख 47 हजार 140 रुपये इतका पगार दिला जातो. त्यानंतर चौथ्या क्रमांकाच्या बिझनेस मॅनेजर पदाच्या उमेदवाराला सरासरी 5 लाख 27 हजार 621 रुपये पगार मिळतो. पाचव्या क्रमांकावर असलेल्या फायनान्स मॅनेजर पदाच्या उमेदवाराला सरासरी 8 लाख 4 हजार 599 रुपये वेतन मिळते.
याव्यतिरिक्त, सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्यांमध्ये Accounts Manager, Assistant Leader, Senior Engineer, Cluster Manager, supply chain manager, finance manager इ. यामध्ये पदावर काम करणाऱ्या उमेदवारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न आठ ते नऊ लाखांपर्यंत असू शकते. High Demand Jobs
या यादीमध्ये फक्त दोन तांत्रिक भूमिकांचा समावेश आहे, senior web developer आणि senior engineer. द इंडियन एक्स्प्रेसमधील एका लेखानुसार, अनेक टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करण्यास सांगत असताना, परफॉर्मन्स मॅनेजर, सोशल मीडिया मॅनेजर, मीडिया आणि मार्केटिंगमधील कंटेंट मॅनेजर या पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिमोट काम करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर वरील यादी नीट वाचा आणि जाणून घ्या की तुम्ही कोणत्या क्षेत्रात उत्तमरीत्या काम करू शकता. High Demand Jobs
या व्यतिरिक्त या वर्षाच्या नोकरीच्या यादीत तंत्रज्ञान, Marketing आणि सोशल मीडिया, फायनान्स तसेच फार्मा, मेडिसिन यासारख्या क्षेत्रातील भूमिका अग्रस्थानी आहे. नोकरीची उपलब्धता, पगार, संधी, वाढ आणि रिमोट किंवा हायब्रीड कामाची व्यवस्था ऑफर करणाऱ्या पोस्टिंगची संख्या, अनेक प्लॅटफॉर्मवरील डेटा या सगळ्याच्या आधारे नोकऱ्यांची ही यादी तयार करण्यात आली आहे. फायनान्स, अकाउंटिंग, सोशल मीडिया, सप्लाय चेन आणि कस्टमर केअर यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये मिड-व्यवस्थापन भूमिकांना सध्या जास्त मागणी आहे.
2024 मधील भारतातील सर्वोत्कृष्ट नोकऱ्यांमध्ये फक्त पाच तंत्रज्ञान नोकऱ्यांचा समावेश आहे. टॉप 20 नोकऱ्यांच्या यादीमध्ये सोशल मीडिया मॅनेजर, डिजिटल मार्केटर आणि थेरपिस्टच्या भूमिकांचा समावेश नोकरीचे बदलते स्वरूप दाखवून देत आहे. आणि या नुसार फक्त टेक्नॉलॉजी असलेल्या भूमिकांचे वर्चस्व कमी होत असल्याचेच दिसून येत आहे.
गेल्या वर्षभरात, तंत्रज्ञानात झालेले नवीन बदल, तंत्रज्ञानाने केलेली लक्षणीय प्रगती आणि त्यामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती आपण सगळ्यांनीच पाहिली आणि या गोष्टीचा रोजगारांच्या बाजारपेठेवर सुद्धा कायमस्वरूपी परिणाम झाला आहे, असे इंडिड इंडियाचे मार्केटिंग हेड शशी कुमार यांनी सांगितले. फायनान्स, ऑपरेशन्स, डिजिटल मार्केटिंग आणि अकाउंटिंग यासारखी इतर क्षेत्रे नोकरी शोधणाऱ्यांसाठी सध्या टॉप लिस्ट वर असणारी क्षेत्र ठरत आहेत. हा ट्रेंड केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवरही पाहायला मिळत आहे. 2024 च्या ग्लोबल बेस्ट जॉब्सच्या यादीत टेक नोकऱ्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. High Demand Jobs