Home guard Bharti 2024 होमगार्ड ही भारतातील सैनिकी स्वयंसेवी पोलीस संघटना आहे. भारतीय पोलीस दलाला साहाय्यक असणारे गृहरक्षक दल म्हणूनही या संघटनेला ओळखले जाते. १९४६ मध्ये मुंबईत जातीय दंग्यांनी थैमान घातले होते, त्यांचे शमन करण्याच्या पार्श्वभूमीवर ही संघटना स्थापन करण्यात आली. Home guard Bharti 2024 या संघटनेमार्फत आतापर्यंतची सर्वात मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. तुम्हाही नोकरीच्या शोधात असाल आणि 12 वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही नक्कीच या पदासाठी योग्य आहात. शासनाने जाहीर केलेल्या होमगार्ड पदभरतीसाठी आजच अर्ज करा, या लेखात संबंधी पदभरतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ती वाचून तुम्ही आजच्या आजच अर्ज करा.
होमगार्ड भरती 2024 अंतर्गत किती पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे?
होमगार्ड भरती 2024 अंतर्गत 10 हजार 285 इतक्या जागांसाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. हि जाहिरात दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी संघटनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली. Home guard Bharti 2024
पदासाठी शैक्षणिक पात्रता
होमगार्ड बनण्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती 12 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पदासाठी वयोमर्यादा किती
होमगार्ड पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीची वयोमर्यादा कमीत कमी 25 आणि जास्तीत जास्त 45 इतकी आहे. Home guard Bharti 2024
परीक्षा फी किती आहे
होमगार्ड बनण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला ऑनलाईन पद्धतीने संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर https://dghgenrollment.in/ अर्ज करायचा आहे आणि अर्ज करताना 100 रु. इतकी फी भरणे अपेक्षीत आहे. Home guard Bharti 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
तुम्ही होमगार्ड भरती अंतर्गत अर्ज करणार असाल तर तुम्हाला घाई करावी लागले, लवकरात लवकर अर्ज भरा कारण तब्बल 10 हजारहूनही जास्त पदांसाठी ही जाहिरात करण्यात आली आहे. आणि अर्ज करण्याची अंतीम तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे त्याआधी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. Home guard Bharti 2024
होमगार्ड संघटना स्थापन करण्यामागचे उद्देश
- पोलीस दलाला अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी सहाय्यक दल म्हणून काम करणे हे होमगार्ड संघटनेचे प्रमुख कर्तव्य आहे.
- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्यकारी दल म्हणून काम करण्या व्यतिरिक्त इतरही बरीचशी कर्तव्य दलाला पार पाडावी लागतात.
- अग्निशमन, विमोचन, पूरपरिस्थिती, भूकंप, वादळे वगैरे परिस्थितीमुळे निर्माण होणार्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये समाज स्वास्थ्यासाठी जीवन आवश्यक सेवा चालू ठेवणे व तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणेबाबत होमगार्ड संघटनेला कामे करणे अपेक्षित असते. Home guard Bharti 2024
होमगार्ड दसलातील निवड प्रक्रिया –
होमगार्ड दलातील निवडप्रक्रिया संघटनेच्या नियमानुसार होते. ही निवड होमगार्ड संघटनेद्वारा वर्षातून दोनदा करण्यात येते. उमेदवारांची निवड जिल्हा पातळीवर होते. निवड झालेल्या गृहरक्षकांना विशेष प्रतिज्ञा देखील घ्यावी लागते.निवड झालेल्या उमेदवारांना होमगार्ड म्हणून नेमण्यात येऊन त्यांना स्थानिक स्तरावर विशिष्ट पोलिस ठाण्याशी संलग्न केले जाते. संबंधित जिल्ह्याची लोकसंख्या व आकारमानानुसार प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार हजार होमगार्डची नेमणूक करण्यात येते. Home guard Bharti 2024
होमगार्ड निवडीनंतरचे प्रशिक्षण
होमगार्ड या पदासाठी निवड झाल्यानंतर प्रशिक्षणाचे तीन टप्पे पार करावे लागतात. शिकाऊ, उमेदवारी, प्रत्यक्ष काम असे तीन टप्पे असतात. प्रशिक्षणामध्ये गृहरक्षकांना प्राथमिक कवायत, सशस्त्र कवायत, निशाणेबाजी, शस्त्रास्त्रे-प्रशिक्षण, प्राथमिक कायदा, जमाव नियंत्रण, प्रथमोपचार, नैसर्गिक आपत्ती निवारण, अग्निशमन प्रशिक्षण या सर्व गोष्टींचा समावेश प्रशिक्षणात करण्यात आलेला आहे.
होमगार्डचे निवृत्तीचे वय साधारण ५५ वर्षे इतके असते. जे गृहरक्षक-स्वयंसेवक तीन वर्षे गृहरक्षक म्हणून कामगिरी बजावली जाते. यावेळी पोलिस दल, अग्निशमन दल, राज्य राखीव दल इ. मधील निवड प्रसंगी पाच टक्के आरक्षणाचा नियम असून त्याचा फायदा प्रशिक्षित होमगार्ड वेळोवेळी घेत असतात. पुरुष व महिला होमगार्ड्सना निवडप्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांप्रमाणेच पोशाख-गणवेश दिले जातात. याशिवाय होमगार्ड्सना प्रत्यक्ष कामावर असताना दररोज 400रु. इतका भत्ता दिला जातो. Home guard Bharti 2024