How to choose Insurance plan विमा ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे, ही बाब कोविड काळात लोकांना चांगलीच लक्षात आली आहे. परंतू तरीही अनेकजण विम्याला विनाकारण खर्च मानतात. खरे तर विमा हा खर्च नसून तुमच्या कुंटुंबाच्या सुरक्षेचे एक महत्त्वाचे साधन बनू शकतो. How to choose Insurance plan ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला दिलासा मिळू शकतो. इन्शुरन्स बाबतीत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारदेखील सुद्धा विविध आस्थापनांद्वारे प्रयत्न करत आहे. खाली दिलेले सात इन्शुरन्स हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आम्ही तुम्हाला त्या 7 विम्यांबद्दल सांगतो जे आजच्या काळात प्रत्येकाने खरेदी करणे आवश्यक आहे. Best Insurance policy
जीवन विमा – TERM LIFE INSURANCE
जीवन विमा उतरवणं खरं तर ही आपली एक जबाबादारीच बनली आहे. प्रत्येक घरातील कमवत्या व्यक्तीनं घ्यावा असा हा विम्याचा प्रकार आहे.. टर्म लाईफ इन्शुरन्स ही सर्वात पारंपारीक विमा पॉलिसी आहे, ज्या मध्ये मुदतीच्या आत विमा असलेल्या व्यक्तीसोबत कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याला किंवा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला विम्याच्या रकमेचा लाभ मिळतो. सोप्या भाषेतच सांगायचेच झाले तर तुमच्या नंतर तुमच्यावर अवलंबून लोकांची आर्थिक काळजी घेणारा हा इन्शुरन्स आहे. मुदत जीवन विमा पॉलिसीचा कालावधी १० वर्ष ते मृत्यू होईपर्यंत असा ठेवता येतो. याचा प्रीमियम वय आणि विमा कव्हर यावर ठरतो. इंन्शूरन्ससंबंधी जाहिरातीत आपण ऐकतो की, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी” हे या इन्शुरन्सला नक्कीच अगदी तंतोतंत लागू होतं. Best Insurance policy
आरोग्य विमा – HEALTH INSURANCE
आरोग्य विमा ही आजच्या काळात प्रत्येकाची गरज आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी आरोग्य विमा असणे आवश्यक आहे. चांगल्या आरोग्य विमा योजनेत डॉक्टरांची फी, हॉस्पिटलायझेशन खर्च, वैद्यकीय चाचण्या आणि शस्त्रक्रिया इत्यादींचा समावेश होतो. आपत्कालीन परस्थितीमध्ये उपचारच्या खर्चाची योग्य ती भरपाई देण्यास मदत करतो. आरोग्य विमा म्हणजे असा विमा आहे जो आपल्याला आपत्कालीन परिस्थितीत, आजार किंवा अपघातामुळे वैद्यकीय खर्चापासून आर्थिक संरक्षण करतो. प्रत्येक व्यक्तीला आरोग्य विमा घेणं गरजेचं आहे. आजकाल कधीही कोणतेही आजार उद्भवत आहेत. अशा वेळी आयुष्यभराची कमाई खर्च होऊ नये असं वाटत असेल तर आरोग्य विमा घेणं उत्तम. वेगवेगळे पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. स्वतःची गरज ओळखून योग्य ते विमा कव्हर घेणं आवश्यक आहे. याचा प्रीमियम वय, आजार आणि कव्हर यावर ठरतो.
चाईल्ड इन्शुरन्स प्लॅन – CHILDREN INSURANCE PLAN –
आजच्या वेगाने बदलणाऱ्या काळात पालक म्हणून आपल्या मुलांच्या आर्थिक भविष्यासाठी योग्य ती तरतूद करुन ठेवणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. कारण वाढती महागाई आणि चलनाचे सतत बदलत राहणारे दर. ही विमा योजना मुलांच्या भविष्याच्या दिशेने एक चांगला पर्याय आहे. पालकांनी त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणुकीचे आणि सुरक्षित ठेवणायचे साधन प्रदान करते. पालक आणि पाल्य दोघांना यामध्ये विमा आवरण मिळते, पालकांच्या आकस्मित मृत्यूनंतर पाल्याच्या शिक्षणाचा भार ही विमा योजना सांभाळते. मुलांच्या भविष्यातील आर्थिक योजना जसे की उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण, विवाह अशा वेळास हा प्लॅन उपयोगाला येतो. मुलांसाठी आर्थिक पाठबळ देण्यासाठी त्याच्या जन्मानंतर लगेच ही योजना घेणे खुप गरजेचे आहे. Best Insurance policy
अपघात विमा – PERSONAL ACCIDENT INSUANCE
वैयक्तिक अपघात विमा घेणाऱ्यांची संख्या खुप कमी आहे, मूळात या विषय लोकांना माहितीच कमी आहे. वैयक्तीक अपघात विम्यामध्ये जर तुम्ही अॅसिसिडेन्टमुळे तात्पुरते किंवा कायम, अंशतः व पूर्णपणे शाररिक दुर्बलता आल्यास आर्थिक मदत करते. या कालावधीत उत्पन्न नसेल तर रोजच्या गरज भागविण्यासाठीची आर्थिक किरकोळ मदत यामध्ये केली जाते. कायम स्वरूपी अपंगत्व आल्यास किंवा अपघाती मृत्यू आल्यास एक घाऊक रक्कम यामध्ये देऊ केली जाते. याची कव्हर होणारी मार्यादा व्यक्तीच्या उत्पनावर अवलूंबून आहे. How to choose Insurance plan
वृद्धापकाळासाठीचा विमा – RETIREMENT INSUANCE PLAN –
जीवनाच्या विविध पैलूचा आनंद घेण्यासाठी आज तुमच्याकडे जे आर्थिक स्थैर्य आहे, ते तुमच्या सेवानिवृत्तीनंतर सुद्धा कायम राखायचं असेल तर योग्य वेळी तुम्हाला सेवानिवृत्ती विमा योजनेमध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे. हा तुम्हाला तुमच्या जीवनाच्या दुसऱ्या इंनिंगमध्ये आरामात जगण्यासाठी निधी उभारण्यासाठी मोलाचा हातभार लावतो. तुमच्या कमाईच्या वर्षामध्ये पद्धतीशीर गुंतवणूक करून रिटारमेंट नंतरच्या आयुष्यासाठी पैसा उभा करू शकता. यामध्ये तुम्हाला आवश्यक असेलेला निधी आणि वर्ष याप्रमाणे प्रीमियम ठरतो.
घराचा विमा – HOME INSURANCE
स्वतःचे घर असणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असतो. असं घर सुरक्षित ठेवणं हे सुद्धा कर्तव्य आहे. गृह विमा पॉलिसी चक्रीवादळ, वादळ, वीज पडणे, भूकंप, पूर, भूस्खलन, त्सुनामी, हिमस्खलन, आग, दहशतवादी हल्ले, घरफोडी, चोरी, यांसारख्या मानवनिर्मित आपत्तींसह, नैसर्गिक आपत्तींसह विविध परिस्थितींपासून घराचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही घराचा विमा काढणे तितकेच महत्त्वाचे असते. How to choose Insurance plan
मोटर विमा – MOTOR INSURANCE
मोटार इन्शुरन्स हा विमा वाहनधारकाला आपल्या वाहनाला काही अनपेक्षित आणि अपघात झाल्यास होणाऱ्या आर्थिक खर्चापासून संरक्षण देतो. त्यामध्ये चोरी असो, गाडीचे महत्त्वाचे पार्टस असो किंवा आग व पाण्यापासून होणारे नुकसान असो, अशा सर्व बाबींमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी याची मदत होते. आता सरकारनं वाहन विमा हा अनिर्वाय केला आहे. आपल्या गाडीचा अपघात झाला तर त्याचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी हा विमा लोक घेतात.