how to get fancy number for vehicle: गाडीसाठी फॅन्सी नंबर कसा घ्यायचा? व्हीआयपी नंबरच्या किमती किती?

how to get fancy number for vehicle

how to get fancy number for vehicle आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात त्यांना गाड्यांची खूप आवड असते. आणि फक्त गाड्याच नाही तर त्यांना त्या गाड्यांसाठी कोणाकडेही नसतील असे व्हिआयपी नंबर घ्यायचे असतात. हे व्हिआयपी नंबर मिळविण्याची एक प्रोसेस असते आणि त्यानुसारच आपण हे नंबर मिळवू शकतो. तुम्हाला देखील तुमच्या गाड्यांसाठी व्हिआयपी नंबर घ्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच आम्ही सांगितलेल्या पर्यायांपैकी कोणत्याही पर्यायांचा वापर करु शकता.  तुमच्या बाईक किंवा कारसाठी व्हिआयपी नंबर मिळवायचा याविषयी सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखातून मिळवणार आहोत. how to get fancy number for vehicle

व्हीआयपी नंबर म्हणजे काय?

काहींना नवनवीन गाड्यांची खूप आवड असते. त्यांना त्यांच्या नवनवीन गाड्यांसाठी व्हिआयपी नंबर हवे असतात, व्हीआयपी नंबर म्हणजे असे नंबर  सामान्यतः सहजासहजी कोणालाही मिळत नाहीत म्हणजेच, जे लिलावातून दिले जातात आणि ते नंबर म्हणजे एकदम खास क्रमांक मानले जातात इतकेच नाही तर त्यांची किंमत देखील खूप जास्त असते.  how to get fancy number for vehicle

व्हीआयपी नंबर मिळवण्याची पद्धत

तुम्हाला तुमच्या गाडीसाठी व्हिआयपी नंबर घ्यायचा असेल तर तुम्ही दोन मार्गांनी हा नंबर मिळवू शकता. लिलावाद्वारे देखील व्हिआयापी नंबर मिळवता येतात आणि डिलर कडून देखील व्हिआयपी नंबर खरेदी करता येतात.  how to get fancy number for vehicle

लिलावाद्वारे व्हीआयपी नंबर मिळविणे

ऑनलाइन लिलाव: अनेक राज्यांमध्ये वाहतूक विभागामार्फत व्हीआयपी नंबर साठी ऑनलाईन लिलाव आयोजित केले जातात. त्या लिलावामध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला संबंधित विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी करून तुम्ही लिलावात भाग घेऊ शकता.

ऑफलाइन लिलाव: काही राज्यांमध्ये व्हीआयपी नंबर साठी संबंधित विभागामार्फत ऑफलाइन लिलाव देखील आयोजित केले जातात. तुम्हाला जर त्यामध्ये भाग घ्यायचा असेल तर लिलावाची तारीख आणि वेळ संबंधित विभागाकडून मिळू शकते,त्यानुसार तुम्ही त्या लिलाव मध्ये भाग घेऊ शकता. how to get fancy number for vehicle

प्रत्यक्ष खरेदीद्वारे

बाईक किंवा कार डीलर मार्फत देखील आपण व्हिआयपी नंबर मिळवू शकतो,  ज्याठिकाणी आपण कार किंवा बाईक ची खरेदी करतो तेथील डीलरशी तुम्ही संपर्क करुन तुमच्या पसंतीचा व्हिआयपी नंबर उपलब्ध आहे का हे विचारून  आपल्याला हवा असलेला नंबर मिळवू शकतो. how to get fancy number for vehicle

व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • वाहन नोंदणी प्रमाणपत्र -आरसी बुक
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा – लाईट बील
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • लिलाव शुल्क

व्हीआयपी नंबर साठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

तुम्हाला जर का व्हिआयपी नंबर मिळवायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करुन हा नंबर मिळवू शकता.  रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वेबसाईटला भेट  देऊन तुम्ही व्हिआयपी नंबरसाठी तुम्ही अर्ज करु शकता. ही प्रोसेस नक्की कशी करायची ते आपण पुढे स्टेप बाय स्टेप पाहूया. how to get fancy number for vehicle

  • सर्वात आधी रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या वेबसाईटला भेट द्या https://morth.nic.in/ या लिंकवर क्लिक करुन  तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता.
  • त्यानंतर navigation मेनू वर क्लिक करा,त्यात तुम्हाला वाहनविषयक सर्व पर्याय दिसतील.
  • नागरी सेवा या पर्यायावर क्लिक करून, नवीन पर्याय उघडतील.
  • त्यानंतर Registration या पर्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर  VIP number Registration या पर्यावर क्लिक करा.
  • व्हीआयपी नंबर नोंदणी या पर्यायावर क्लिक करून जे नवीन पेज ओपन होईल त्यावर पब्लिक युजर म्हणून तुमचे स्वतःचे रजिस्ट्रेशन करुन घ्या.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जो आवडीचा नंबर आहे त्या नंबरची निवड करा.
  • जो  नंबर तुम्ही निवडला आहे त्या नंबरच्या रेंजनुसार  त्याचे शुल्क भरायचे असते.
  • सदरचे शुल्क भरल्यानंतर नंबरच्या लिलावात तुम्हाला सहभागी व्हावे लागेल.
  • तुम्ही ज्या नंबरची निवड केली आहे तो नंबर तुम्हाला लिलावात जिंकावाच लागेल.
  • सर्व प्रक्रियेतून तुम्हाला तुमचा व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी जावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तो नंबर मिळेल.