Types of Bank loan 2024: तुम्हाला बँकेकडून मिळते 15 प्रकारचे Best loan, ही पहा यादी

Types of Bank loan 2024

Types of Bank loan 2024 सध्या आपण जे जीवनमान जगत आहोत तेथे आर्थिक संचय किंवा खर्च याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. तुमच्याकडे आर्थिक बचत नसेल तर तुम्ही चांगले जीवनमान जगू शकत नाही. त्यासाठी बरेच लोक कर्जाचा पर्याय निवडतात. भरतीय बँका आपल्याला विविध प्रकारची कर्जे देतात. सध्या विविध मोबाईल ऍप्सच्या माध्यमातून देखील कर्जे उपलब्ध होत आहे. परंतु आज आपण या लेखाच्या माध्यमातून बँकेकडून आपल्याला 15 प्रकारचे  loan मिळते, आणि ही कोणकोणती कर्जे आहेत त्यांची आपण माहिती घेणार आहोत. Types of Bank loan

गृहकर्ज

तुम्हाला तुमचे घर खेरदी करायचे आहे परंतु तमच्याकडे पुरेशी एकरकमी पैसे नाहीत तर तुम्ही बँकेकडे गृहकर्जासाठी अर्ज करु शकता. तसेच घरातील पायाभूत सुविधा खरेदी करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी घेतलेल्या कर्जाला  देखील गृहकर्ज म्हणतात. कोणतीही  बँक एकूण रकमेच्या 75 – 85% पर्यंत गृहकर्ज देते.

वैयक्तिक कर्ज

व्यक्तीने स्वतःच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी घेतलेले कर्ज म्हणजे वैयक्तिक कर्ज आहे. घराचे भाडे, शाळेची फी, मासिक खर्च भागवणे हे स्वतःच्या गरजेसाठी घेतलेले कर्ज आहे. प्रत्येक बँकेचे वैयक्तिक कर्ज योजनांवर त्यांचे स्वतःचे असे वेगवगळे व्याज दर असतात. सध्या विविध बँकांकडून आकारले जाणारे वैयक्तिक कर्जाचे व्याज दर 9% ते 40% पर्यंत आहेत Types of Bank loan

सुवर्ण कर्ज

सध्या सुवर्ण कर्ज हा अत्यंत सुलभ आणि सोयीचा कर्ज प्रकार समजला जातो. आपल्याकडे असलेले सोने आपण नेहमीच वापरतो असे नाही. एखाद्या सणा समारंभालाच आपण सोन परिधान करीत असतो. त्यामुळे बँकेकडे सोने तारण ठेवून आपण कर्ज घेऊ शकतो. याचे दोन फायदे असतात एक म्हणजे आपली आर्थिक गरज भागते आणि दुसरे म्हणजे आपले सोने बँकेकडे सुरक्षित राहते. तरीही असे लक्षात येते की, साधारणपणे लोक आपत्कालीन गरजा पूर्ण करण्यासाठी सुवर्ण कर्जाची निवड करतात. सुवर्ण कर्जाचे व्याजदर सुमारे 10% ते 12%  इतके असतात. Types of Bank loan

मालमत्तेवरील कर्ज

आपले घर, जमीन किंवा एखादा गाळा असेल तर ती आपली मालमत्ता होते. या मालमत्तेवर आपण कर्ज घेऊ शकतो. फक्त मालमत्ता कर्जासाठी महत्त्वाची एकच अट असते ती म्हणजे, जमीन, घर किंवा कोणतीही इतर मालमत्ता ही आपल्या मालकीची असावी. कर्जदारांना 15 वर्षांच्या कालावधीसाठी मालमत्तेच्या मूल्याच्या 40-60% पर्यंत कर्ज मिळू शकते. मालमत्तेच्या रकमेवरील संपूर्ण कर्जाची परतफेड होईपर्यंत मालमत्ता सावकाराकडे तारण म्हणून ठेवली जाते.

शैक्षणिक कर्ज

सध्या शिक्षण हे अत्यंत खर्चिक झाले आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर लाखो रुपये खर्च होतात. त्यासाठी बँकांकडून शैक्षणिक कर्ज दिले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय करुन  विद्यार्थी कर्जाची परतफेड करू शकतात.

वाहन कर्ज

सध्या  आपण 2 व्हिलर असो वा 4 व्हिलर कोणतीही गाडी खरेदी करण्यास गेलो असता आपल्याला वाहन कर्ज ऑफर केले जाते. वाहन कर्जावर 10 ते 12 टक्के व्याज आकारले जाते. प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे आहेत.  कर्जाची संपूर्ण रक्कम जोपर्यंत संपूर्ण भरली जात नाही तोपर्यंत वाहन  व्याज देणाऱ्या बँकेच्या मालकीचे असते. Types of Bank loan

कृषी कर्ज

आपला भारत हा शेतीचा देश आहे. येथे हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते, त्यामुळे बरेचदा बी- बियाणे खरेदी करण्यासाठी किंवा शेतीची यंत्रे खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिले जाते. शेती आणि सिंचन उपकरणे खरेदी, लागवडीसाठी पिके आणि इतर शेतीशी संबंधित उपक्रम यासाठी कृषी कर्ज दिले जाते. इतकेच नाही तर  शेतकर्‍यांव्यतिरिक्त हे कर्ज इतर शेतीशी संबंधित क्षेत्र जसे की पशुसंवर्धन, फळबाग, मत्स्यपालन, मत्स्यपालन, रेशीम शेती आणि फुलशेतीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींसाठी देखील उपलब्ध आहे. Types of Bank loan

सिक्युरिटीजसाठी कर्ज

आपण आपल्या सुरक्षित जीवनासाठी म्युच्युअल फंड आणि शेअर्स खरेदी करतो. या म्युच्युअल फंड आणि शेअर्स वर देखील आपल्याला कर्ज मिळत असते. फक्त  सिक्युरिटीजचे पेपर्स तारण म्हणून गहाण ठेवावे लागतात आणि आपल्याला वित्तिय संस्थांकडून कर्ज मिळते. Types of Bank loan

तारण कर्ज

तारण कर्ज हे आपल्या मालकीच्या मालमत्तेविरुध्द मिळवलेले कर्ज असते. आपल्या मालकीचे घर, दुकान किंवा बिगर शेतजमीनीचा तुकडा या सर्व गोष्टी मालमत्तेत येतात. तारण कर्जे ही बॅंका आणि गैर-बॅंकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून दिली जातात. सावकार तुम्हाला मुद्दल कर्जाची रक्कम पुरवतो आणि त्यावर तुमच्याकडून व्याज आकारले जाते.  कर्जदार त्याला परवडणार्‍या मासिक हप्त्यांमध्ये संपूर्ण कर्जाची परतफेड  करेपर्यंत त्याची मालमत्ता सावकाराच्या ताब्यात राहते. Types of Bank loan

व्यवसाय कर्ज

सध्या स्टार्ट अप ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. आपल्याकडे व्यवसायाची उत्तम संकल्पना असेल तर आपण बँकांना ती संकल्पना सांगून व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकतो. सध्या बँका, वित्तिय संस्था, काही खाजगी कंपन्या देखील व्यवसाय कर्ज देऊ लागले आहेत. त्यामुळे लघुउद्योगासह मोठमोठे व्यवसाय उभे राहत आहेत. Types of Bank loan

फ्लेक्सी कर्ज

फ्लेक्सी लोन बँकांद्वारे प्रदान केलेल्या ओव्हरड्राफ्ट सुविधेसारखेच आहे. बँकेने पूर्व-मंजूर केलेल्या क्रेडिट मर्यादेतून गरज असलेली कर्जाची रक्कम कर्जदार काढू शकतात. कर्जदाराला थकीत कर्जाची रक्कम आणि जेव्हा कर्जदाराला  पैसे द्यायचे असतात तेव्हा कर्ज परतफेडीबाबत त्याला लवचिकता मिळते, फक्त दरमहा कर्जावरील व्याज भरणे अनिवार्य असते.

विवाह कर्ज

एखाद्याला लग्न करायचे आहे आणि त्याच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही बँकेकडे विवाह कर्जासाठी अर्ज करु शकता. तुम्हाला लग्नासाठी कर्ज मिळते. या कर्जाच्या परत फेडीचा कालावधी हा 6 ते 12 महिन्यांचा असतो. Types of Bank loan