India Post Payments Bank Recruitment 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची सुवर्ण संधी; “या” पदांसाठी भरती जाहीर!

India Post Payments Bank Recruitment: इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ची स्थापना भारतीय टपाल मंत्रालयाने केली. बँकिंग सेवा लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मुंबई आणि देशातील इतर शहरांमध्ये विविध वरिष्ठ पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करत आहे. याबाबतची संपूर्ण माहिती आम्ही आमच्या या आजच्या लेखात दिलीच आहे, या भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास हा लेख संपूर्ण वाचा. India Post Payments Bank Recruitment

पदाचे नाव – पदांची संख्या
Executive (सहयोगी सल्लागार – पेमेंट ॲप्लिकेशन सपोर्ट) 5
Executive (सल्लागार – पेमेंट ऍप्लिकेशन्समध्ये सहाय्य) 2
Executive (वरिष्ठ सल्लागार – पेमेंट ॲप्लिकेशन सपोर्ट) 1
Executive (सहयोगी सल्लागार – IT सपोर्ट) 23
Executive (सल्लागार – आयटी सपोर्ट) 19
Executive (वरिष्ठ सल्लागार – कोअर इन्शुरन्स सोल्युशन्स) 1
Executive (वरिष्ठ सल्लागार – डेटा गव्हर्नन्स) 1
Executive (वरिष्ठ सल्लागार – डीसी व्यवस्थापक) 1
Executive (वरिष्ठ सल्लागार – चॅनल लीड) 1

शालेय पात्रता | Eligibility Criteria

मान्यताप्राप्त विद्यापीठातून computer science/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्समधील इंजिनियर पदवी. किंवा मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (एमसीए) या स्वरूपात पदवी किंवा computer science/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स मध्ये BCA/B.Sc पदवी
इतर काही पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव याबद्दल डिटेल मधे माहिती तुम्ही जाहिरातीत वाचू शकता.

निवड प्रक्रिया: प्राप्त झालेल्या अर्जांची योग्य तपासणी केली जाईल आणि पात्रता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड केली जाईल.

नोकरीचे स्थान: मुंबई, दिल्ली आणि चेन्नई

वय श्रेणी:
पदाची नावं – वयाची मर्यादा
Executive (सहयोगी सल्लागार) वय 22 ते 30 वर्षे
Executive (सल्लागार) वय 22 ते 40 वर्षे
Executive (वरिष्ठ सल्लागार) 22 ते 45 वर्षे

नोंदणी फी | registration fees
SC/ST/PWD: रु 150/-
इतर श्रेणी: 750/-

पगार:
पदांची नावं – वार्षिक पगार
Executive (सहयोगी सल्लागार) ₹ 10,00,000/-
Executive (सल्लागार) ₹15,00,000/-
Executive (वरिष्ठ सल्लागार) ₹ 25,00,000/-

अर्ज कसा भरायचा | How to apply for India Post Payments Bank Recruitment
मित्रानो ऑनलाइन अर्जाची लिंक आम्ही खाली दिलेलीच आहे.
जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल तर वेबसाइटला भेट देऊन आधी रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
त्यांनतर अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक भरा. पुढे तुमचा फोटो, सही आणि इतर कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करा.
सर्व माहिती भरल्यानंतर, व्हेरिफिकेशन करून हा फॉर्म सबमिट करा.
शेवटी पेमेंट करून, या फॉर्मची एक कॉपी तुमच्याकडे सेव्ह करा.

काही महत्वाच्या लिंक्स:

IPPB अधिसूचना https://nokarimazi.com/wp-content/uploads/job_notifications/IPPB-INFORMATION-TECHNOLOGY-EXECUTIVES-Recruitment-May-24.pdf

ऑनलाइन अर्जाची लिंक https://ibpsonline.ibps.in/ippblemarc24/

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024 रात्री 11:59 वाजता

अधिक माहिती | details of India Post Payments Bank Recruitment

अपूर्ण अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारण्यात येणार नाही ते फेटाळले जातील आणि त्यानंतरचा कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.

शिवाय, कोणत्याही परिस्थितीत अर्ज सादर करण्याचा कोणताही अन्य प्रकार/पद्धत स्वीकारली जाणार नाही.

लेखी परीक्षा/मुलाखतीला बसण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला टीए/डीए दिला जाणार नाही.

अर्जदाराने ऑनलाइन प्रविष्ट केलेला डेटा आणि मूळ प्रमाणपत्रामध्ये तफावत आढळल्यास, त्यांचा अर्ज नाकारला जाईल.

अर्जदाराने दिलेली माहिती खोटी, चुकीची किंवा पात्रता निकषांची पूर्तता करत नसल्यास, त्याचा/तिचा अर्ज भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा भरती झाल्यानंतर किंवा सामील झाल्यानंतर नाकारला जाईल.

तुम्हाला काही शंका असल्यास, तुम्ही खाली दिलेल्या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता: karrieres@ippbonline.in.

कृपया अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचा.

टीप: वरील माहिती चुकीची असू शकते. त्यामुळे कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक पहा. India Post Payments Bank Recruitment