MPSC Exam Timetable 2024 : एमपीएससी ने परीक्षेचे वेळापत्रक केले जाहीर, या तारखेला होणार राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

MPSC Exam Timetable 2024: महाराष्ट्रात नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या म्हणजेच प्रामुख्याने एमपीएससी (MPSC) परिक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, MPSC आयोगाने म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2024 मध्ये होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्रातून लाखो तरुण-तरुणी या परीक्षेची तयारी करत आहेत.

दरम्यान, या लाखों तरुणांची वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे, यांना अजून जोर लावून अभ्यास करावा लागणार आहे. अनेक दिवसांपासून परीक्षाचे वेळापत्रक कधी जाहीर होईल, हा सवाल उमेदवारांच्या माध्यमातून केला जात होता. परंतु, आता त्यांची प्रतिक्षा संपली आहे.

MPSC Exam Timetable News
अशातच या एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच एमपीएससी ने राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (2024) चे वेळापत्रक जाहीर केले आहे.

लाखों तरुण याची आतुरतेने पाहत होते, आता ही आतुरता संपणार आहे. MPSC अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच आपण या आर्टिकल मध्ये संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणार आहोत.

MPSC आयोगाने केले परीक्षेचे वेळापत्रक जाहीर..


राज्य सरकारच्या विविध विभागांतील 524 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (2024) शनिवार 6 जुलै रोजी घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये MPSC तर्फे नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी 29 डिसेंबर 2023 रोजी 274 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली होती.

mpsc exam या काढण्यात आलेल्या जाहिराती नुसार, ही परीक्षा 28 एप्रिल रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्या दरम्यान सरकारने मराठा समाजासाठी 10 टक्के आरक्षण लागू करण्याचा कायदा फेब्रुवारी महिन्यात लागू केला गेला.

तसेच या कायद्यानुसार शासकीय सेवेतील विविध पदांवरील नियुक्तीकरीता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे आरक्षण लागू करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आयोगाने नव्या आरक्षणाप्रमाणे जागा निश्चिती करून प्रस्ताव पाठविण्याची सूचना राज्य शासनाला केली होती.

MPSC Exam Timetable
तसेच 21 मार्च च्या जाहिराती नुसार 28 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. राज्य सरकारने आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सुधारित 524 जागांचा प्रस्ताव पाठविला असून, ही रिक्त पदे भरण्यासाठी 6 जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. असं अधिकृतपणे‌ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे.

ही रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी तुम्हाला 9 मे ते 24 मे पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बॅंकमध्ये परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत 26 मे पर्यंत घेता येईल.‌ तर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख 27 मे पर्यंत असणार आहे.

विविध विभागांतील रिक्त पदे
1) उप जिल्हाधिकारी (गट अ) – 7 पदे
2) सहाय्यक कर आयुक्त (गट अ) – 116 पदे
3) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी गट अ) – 52 पदे
4) सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ) – 43 पदे
5) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी (गट ब) – 19 पदे
6) सहायक गट विकास अधिकारी (गट ब) – 25 पदे
7) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, (गट ब) – 52 पदे
8) निरीक्षण अधिकारी (पुरवठा गट ब) – 76 पदे
9) सहायक वनसंरक्षक (गट अ) – 32 पदे
10) वनक्षेत्रपाल (गट ब) – 16 पदे
11) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा (मृद व जलसंधारण विभाग) – 45 पदे