Indian Post Office Bharti 2024: पोस्ट ऑफिसमध्ये 40 हजार जागांसाठी मोठी भरती. जाणून घ्या अधिक माहिती

Indian Post Office Bharti 2024

Indian Post Office Bharti 2024 तुम्ही ग्रॅज्यूएट असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पोस्ट ऑफिस विभागामार्फत भरती जाहीर करण्यात येणार असून नोकरीची ही सुवर्ण संधी गमाऊ नका. ही भरती म्हणजे सुशिक्षित उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या पोस्ट ऑफिस विभागाकडून 40 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या मेगा भरतीतून विविध राज्यांमध्ये शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर आणि डाक सेवक अशा पदांवर नियुक्त्या होणार आहेत. Indian Post Office Bharti 2024

कधी सुरु होणार भरती प्रक्रिया

ही भरती प्रक्रिया लवकरच म्हणजे ऑगस्ट महिन्यात सुरू होईल. भरतीसंबंधी अधिसूचना भारतीय डाक विभागाकडून प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील. शिक्षणाची अट पाहता दहावी पास उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. Indian Post Office Bharti 2024

आजपर्यंतची डाक विभागातील सर्वात मोठी मोगा भरती

भारतीय डाक विभाग  म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये आजपर्यंतची ही सर्वात मोठी मेगा भरती जाहिर करण्यात येणार आहे. 10-20 नाही तर तब्बल 40 हजार  पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. शासकीय रिपोर्टनुसार ऑगस्ट 2024 मध्ये  या भरती प्रक्रियेची अधिसूचना भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. Indian Post Office Bharti 2024

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज  करू शकणार आहेत. म्हणजेच भारतातील कोणत्याही राज्यातून आणि कोणत्याही राज्यातील जिल्हात राहणारे उमेदवार पोस्ट ऑफिस भरतीसाठी अर्ज करु शकणार आहेत.  Indian Post Office Bharti 2024

शिक्षण आणि वयाची अट

पोस्ट ऑफीस भरतीसाठी शिक्षण आणि वयाची अट लागू केली जाणार आहे. भरती साठी जाहिर केलेल्या पदांनुसार शैक्षणिक आर्हता असणार आहे. तसेच  प्रक्रियेसाठी उमेदवाराची वयोमर्यादा  किमान 18 वर्षे पूर्ण  ते कमाल 40 वर्षे  इतकी असणार आहे. तसेच अरक्षित उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.  Indian Post Office Bharti 2024

पोस्ट ऑफिस भरतीमधून कोणकोणती पदे भरली जाणार आहेत?

पोस्ट ऑफिसमार्फत जाहीर करण्यात येणाऱ्या या जाहिरातीमध्ये विविध पदांसाठी भरती निघणार आहे. त्यामध्ये  शाखा पोस्ट मास्टर्स,  सहायक शाखा पोस्ट मास्टर्स, डाक सेवक ही पदे भरली जाणार आहेत.  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नसल्याचे देखील सांगितले जातंय. एक यादी गुणवत्तेनुसार जाहीर केली जाईल. Indian Post Office Bharti 2024

केंद्र शासनांतर्गत नोकरी करण्याची संधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया  घालवू नये. पोस्ट ऑफिस विभागामार्फत ऑगस्टमध्ये जशी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल तशीच ऑनलाईन अर्ज करावा. कारण केंद्र शासनांतर्गत नोकरी करण्याची ही एक नामी संधी आहे.  त्याआधी मात्री इच्छूक उमेदवारांनी संबंधित परिक्षांचा अभ्यास करावा. कोणती पदे आहेत ती जाणून घेऊन त्या पदांसाठी कोणत्या प्रकारचा अभ्यास करणे गरजेचे आहे जे समजून घ्यावे. जेणेकरुन वेळ वाया जाणर नाही आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच अर्ज करुन तुम्ही ऑनलाईन परीक्षा देऊ शकता.  Indian Post Office Bharti 2024

भारतीय डाक विभाग अधिक माहिती

ज्या विभागामार्फत भरती जाहिर होणार आहे त्याबद्दल अधिक माहिती घेऊया. भारतीय डाक विभागाची स्थापना सन 1767 मध्ये करण्यात आली. दिल्ली येथे भारतीय डाक विभागाचे मुख्य कार्यालय आहे. देशभर पसरलेल्या 1 लाख 55 हजार 333 टपाल कार्यालयांमार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील सर्वात मोठे जाळे आहे असे सांगितले जाते. भारतातील अत्यंत अवघड आणि रस्ते नसलेल्या भागात देखील गावांमध्ये देखील ही प्रणाली पोहोचली असून तेथील नागरिक देखील या टपाल सेवेचा वापर करीत आहेत. Indian Post Office Bharti 2024