Indian Postal Department Bharti 2024: कम्युनिकेशन मंत्रालय, पोस्ट विभागाद्वारे “कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)” पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून भारतीय टपाल विभाग भरती 2024 मध्ये या पदांसाठी एकूण 27 जागा उपलब्ध असल्याचं दिसून येत आहे. या पदांसाठी नोकरीचे ठिकाण कर्नाटक सर्कल असणार असून या पदांसाठी पात्र असलेले उमेदवार फक्त भारतीय टपाल विभागात अर्ज करू शकणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 14 मे 2024 निश्चित करण्यात आली आहे.
भारतीय पोस्टल सर्कल भर्ती 2024 साठी अर्ज कसा करावा | HOW TO APPLY?
पदांसाठी अर्जदारांकडे या पदांसाठी आवश्यक असलेल्या सर्व पात्रता असणे आवश्यक आहेत.
या पदासाठी अर्ज करण्यासाठीचा योग्य अर्ज पीडीएफ स्वरूपात खाली देण्यात आला आहे.
आवश्यक कागदपत्रांसह हा अर्ज स्पीड पोस्ट/नोंदणीकृत पोस्टद्वारे योग्य आकाराच्या जाड कागदाच्या एन्वलोप मधून सबमिट केले पाहिजे, तसेच त्यामधे कव्हर पेजवर स्पष्टपणे “एमएमएस बेंगळुरूमध्ये ऑटो ड्रायव्हर (थेट भरती) साठी अर्ज” असे लिहिणे आवश्यक आहे तसेच हा अर्ज “द मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, बेंगळुरू-560001” यांना संबोधित करणारा असावा. या शिवाय बाकी कुठल्याही माध्यमातून पाठवण्यात आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. Indian Postal Department Bharti 2024
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 14.05.2024 आणि संध्याकाळी 5:00 पूर्वी आहे.
- 14 मे 2024 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे.
- एकूण रिक्त पदांची संख्या 27 आहे.
- Indian Postal Department Bharti 2024 रिक्त पदाचे नाव: कार्मिक वाहन चालक (सामान्य श्रेणी)
- शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त मंडळ किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण असायला हवा.
- वयोमर्यादा: अर्जदार उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे.
- परीक्षा फी: कोणतीही परीक्षा फी आकारली जाणार नाही
- या भरतीअंतर्गत पगार: रु. 19,900/- ते रु. 63,200/-.
- अर्ज करण्याची पद्धत: या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
- 14 मे 2024, या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नसून, उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत अर्ज करावा.
- अर्ज करण्यासाठीचा पत्ता: व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिसेस, बंगलोर-560001 Indian Postal Department Bharti 2024
अधिकृत वेबसाइट: www.indiapost.gov.in
भरतीची ऑफिशियल जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
(https://drive.google.com/file/d/1zHdoHOjG_-Ps18a2S9r1bN4689uXbinH/view)