Mothers Name in Government Documents Mandatory 2024: आता शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक; शासनाचा मोठा निर्णय

अनेकदा मातृदिनादिवशी हा प्रश्न उपस्थित केला जातो की, आई नऊ महिने मुलाला गर्भात सांभाळते, प्रसुतीकळा सोसून ती जन्म देखील देते, सांभाळते मुलाचे पालन करत मग आयुष्यभर मुलांना वडिलांचे नाव लावाणे आवश्यक असते. जन्मदात्या आईचे नाव हे नेहमीच दुर्लक्षित राहते. अनेक ठिकाणी तर वडिलांचे नाव नसेल तर मुलांना ऍडमिशन देखील दिले जात नाही. परंतु या सगळ्यावर उत्तर म्हणून महाराष्ट्रात 11 मार्च 2024 रोजी एक क्रांतीकारी निर्णय घेण्यात आला. तो निर्णय म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या नावासमोर आईचे नाव लागणे अनिवार्य आहे. Mothers Name Mandatory in Government Documents 2024असा असेल नव्या नावाचा फॉर्मॅट

या आधी आपण आपले नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव अशा पद्धतीने पूर्ण नाव लिहित होतो. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे यापुढे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे नाव हे पुढील फॉर्मॅट प्रमाणे असणे अनिवार्य आहे.

स्वतःचे नाव-आईचे नाव-वडिलांचे किंवा महिलांच्या बाबतीत नवऱ्याचे नाव- आडनाव

या फॉर्मॅट नुसार सर्वांनी आपल्या नावात बदल करुन घ्यावा असे जाहीर करण्यात आले आहे. Mothers Name Mandatory in Government Documents 2024या कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक असा आहे शासन निर्णय

खालील शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नांव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. Mothers Name Mandatory in Government Documents 2024

  • जन्म दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा प्रवेशाचे आवेदनपत्र
  • जमिनीचा सातबारा
  • प्रॉपर्टीची सर्व कागदपत्रे
  • शासकीय आणि निमशासकीय कर्मचा-यांचे सेवा पुस्तक
  • सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लीपमध्ये
  • रेशन कार्डवर लागणारी कुटुंबातील सर्व नावे
  • मृत्यु दाखला

तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म/मृत्यु नोंदवहीत बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडीलाचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नावाची  नोंद करण्यात यावी. असे शासन निर्णयात म्हणण्यात आले आहे. Mothers Name Mandatory in Government Documents 2024

शासनाने घेतलेला हा निर्णय कधी पासून लागू होईल?

महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय दिनांक 01 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू होणार आहे. तसेच

आईचे नाव अनिवार्य – मंत्र्यांनी त्यांच्या नावात बदल करुन केले जाहीर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हातात नावात केलेल्या बदलाच्या पाट्या घेऊन हा निर्णय जाहिर केला.

  • एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे – मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
  • देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस – उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
  • अजीच आशाताई अनंतराव पवार – उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

अशा पद्धतीने राज्याच्या मोठ्या मंत्र्यांनी त्यांच्या नावात बदल केलेल्या पाट्या घेऊन नव्याने घेण्यात आलेला निर्णय जाहीर केला. Mothers Name Mandatory in Government Documents 2024स्त्री-पुरुष समानता साध्य करण्यासाठीचा निर्णय

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी जाहीर केलेला हा निर्णय केवळ स्त्री पुरुष समानतेच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील आईच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. Mothers Name Mandatory in Government Documents 2024

आईचे नाव बंधनकारक असलेल्या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेले इतर निर्णय

  • जन्म आणि मृत्यू संबंधीत शासकीय दाखल्यामध्ये नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव अशा क्रमाने नोंदणी यापुढे नोंदणी केली जाणार आहे.
  • विवाहित स्त्रीयांनी विवाहानंतरचे नाव, पतीचे नाव आणि आडनाव अशा क्रमाने नोंदणीची प्रक्रिया सुरू राहील.
  • स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्ताऐवजात नोंदणीची मंजूरी देण्यात आली आहे.
  • घटस्फोटित पत्नी असल्यास न्यायालयाने मुलाची कस्टडी आईला दिल्यानंतर ती स्त्री तिच्या  मुलाच्या नावापुढे स्वतःचे नाव लावू शकेल. Mothers Name Mandatory in Government Documents 2024