KDMC Recruitment 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली असल्याचं बघायला मिळत आहे. KDMC Recruitment 2025 अंतर्गत एकूण 490 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू राबविण्यात येत असून, ही भरती गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील विविध पदांसाठी करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य, अभियांत्रिकी, प्रशासन, लेखा, विधी, क्रीडा, उद्यान आदी सेवा विभागांचा समावेश केला गेला आहे. दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
या भरतीची अधिकृत जाहिरात (Kalyan Dombivli Mahanagarpalika jobs) प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. आमच्या आजच्या या लेखात तुम्हाला आवश्यक त्या सर्व माहितीसह ऑनलाईन अर्जाची लिंक, पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, शेवटची तारीख अशा सर्व मुद्द्यांची सविस्तर माहिती मिळणार आहे, त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
या भरती अंतर्गत एकूण रिक्त पदे: 490
या भरती अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांची यादी:
- फिजिओथेरपिस्ट – 2,
- औषधनिर्माता – 14,
- कुष्ठरोग तंत्रज्ञ – 2,
- स्टाफ नर्स – 78,
- क्ष किरण तंत्रज्ञ – 6,
- हेल्थ विजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन – 1,
- मानसोपचार समुपदेशक – 2,
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 1,
- लेखापाल/वरिष्ठ लेखापरीक्षक – 6,
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 58,
- कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 12,
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 8,
- चालक/यंत्रचालक – 12,
- अग्निशामक – 138,
- कनिष्ठ विधी अधिकारी – 2,
- क्रीडा पर्यवेक्षक – 1,
- उद्यान अधीक्षक – 2,
- उद्यान निरीक्षक – 11,
- लिपिक टंकलेखक – 116,
- लेखा लिपिक – 16,
- आया – 2
या भरतीसाठी आवश्यक पात्रता
या भरतीसाठी दहावी पास, बारावी पास, डिप्लोमा, पदवीधारक अशा विविध पात्रतेनुसार पदे उपलब्ध आहेत, तसेच प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही वेग वेगळी असल्यामुळे उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा असे सांगण्यात येत आहे.
भरती अंतर्गत आवश्यक वयोमर्यादा
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे) असावे.
फी संरचना:
- खुला प्रवर्ग: ₹1000
- राखीव प्रवर्ग: ₹900
- माजी सैनिक: शुल्क माफ (कोणतीही फी आकारली जाणार नाही)
या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया
या भरतीसाठीचे अर्ज हे फक्त ऑनलाईन (KDMC online form) पद्धतीनेच करता येणार आहे. जर कुठल्याही उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी त्याला प्रत्येक पदासाठी एक वेगळा स्वतंत्र फॉर्म भरण्याची आवश्यकता असणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 जून 2025
- अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख: 03 जुलै 2025
- परीक्षा शुल्क भरण्यासाठीची अंतिम तारीख: 03 जुलै 2025
- प्रवेशपत्र मिळण्याची तारीख: प्रवेशपत्र हे परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळण्याची शक्यता आहे.
- परीक्षेची तारीख: याबद्दलची अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रकाशित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
उमेदवारांसाठी सूचना
तुम्ही अर्ज भरण्याआधी अधिकृत PDF जाहिरात नक्की वाचा. तुमच्याकडून शैक्षणिक पात्रता, अनुभव, संगणक ज्ञान, वयोमर्यादा, इतर आवश्यक पात्रता अशा सर्व अटींची पूर्तता झाली आहे का हे तपासा. फॉर्म भरताना योग्य कागदपत्रे तयार ठेवा आणि वेळेत योग्य ती फी भरा.
सर्वच उमेदवारांसाठी ही भरती केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही, तर एक स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर घडवण्यासाठी एक मोठा टप्पा ठरणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सरकारी सेवेत सामील होण्याची ही संधी सोडू नका.
या भरतीबाबत अधिक माहिती आणि पुढील अपडेटसाठी KDMC च्या अधिकृत संकेतस्थळास अवश्य भेट द्या: http://kdmc.gov.in/CitizenHome.html