Ration Card e-KYC Maharashtra 2025: या ग्राहकांची नावे रेशनकार्ड मधून वगळण्यात येणार! सरकारचा मोठा निर्णय!

Ration Card e-KYC Maharashtra 2025: मंडळी, आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्रातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी रेशन कार्ड हे जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. सरकारच्या सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (PDS) याद्वारे अनेक कुटुंबांना दरमहा गहू, तांदूळ, डाळी, तेल, मीठ यांसारख्या जीवनावश्यक वस्तू अत्यंत कमी दरात वितरित केल्या जातात. मात्र, या सुविधांचा लाभ फक्त पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा आणि बनावट कार्डधारकांना वगळण्यासाठी सरकारने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे.

ई-केवायसीची गरज आणि अंतिम मुदत

ई-केवायसी प्रक्रियेद्वारे रेशन कार्ड धारकांची ओळख निश्चित केली जाते, ज्यामध्ये आधार क्रमांकाशी रेशन कार्डची जोडणी करून नाव, पत्ता, कुटुंबातील सदस्यांची संख्या यांची पडताळणी केली जाते. या प्रक्रियेमुळे बनावट किंवा मृत व्यक्तींची नावे शिधापत्रिकेतून वगळली जातात, ज्यामुळे वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यास मदत होते.

महाराष्ट्र सरकारने ई-केवायसीसाठी सुरुवातीला ३१ मार्च २०२५ ही अंतिम मुदत दिली होती. मात्र, नागरिकांच्या असणाऱ्या अनेक अडचणी लक्षात घेऊन ही मुदत वाढवून ३० एप्रिल २०२५ पर्यंत वाढवण्यात आली होती. तरीही बऱ्याच लोकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने ही मुदत, ३० मे २०२५ पर्यंत वाढवली गेली पण तरी देखील राज्यात केवळ ७७% लाभार्थ्यांनीच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, तर उर्वरित २३% लाभार्थ्यांची ही प्रक्रिया अजूनही प्रलंबितच आहे.

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास होणारे परिणाम

राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, ३१ मे २०२५ नंतरही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची नावे रेशन कार्डातून वगळली जातील. परिणामी, अशा कुटुंबांना पुढील महिन्यापासून रेशन मिळणार नाही. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास, गरजू कुटुंबांना अन्नधान्याच्या अभावाचा सामना करावा लागू शकतो.

ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करावी?

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील मार्गांचा अवलंब केला जाऊ शकतो:

मोबाईल अ‍ॅपद्वारे घरबसल्या e-kyc करा

‘Mera e-KYC’ अ‍ॅप डाउनलोड करून, आधार क्रमांक व मोबाईल OTP द्वारे e-KYC प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.

अ‍ॅपमध्ये लॉगिन करून सर्व माहिती भरून सबमिट केल्यानंतर ई-केवायसी पूर्ण झाल्याचा मेसेज फोनवर येतो.

जवळच्या रेशन दुकानात जाऊन ऑफलाइन प्रकारे KYC करा

ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट सुविधा नाही, त्यांनी आपल्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन फिंगरप्रिंट पडताळणी करून ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड (कुटुंबातील सर्व सदस्यांचे)
  • रेशन कार्ड
  • सदस्य वगळायचा असल्यास त्याचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा संबंधित कागदपत्र
  • नवीन सदस्य जोडायचा असल्यास जन्म प्रमाणपत्र

राज्य सरकारने सर्व जिल्हा प्रशासनांना ई-केवायसी प्रक्रिया (Ration Card e-KYC Maharashtra 2025 ) जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व क्षेत्रीय कार्यालयांना प्रलंबित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, ‘Mera e-KYC’ अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे हे प्रत्येक रेशन कार्ड धारकासाठी अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास, गरजू कुटुंबांना अन्नधान्याच्या अभावाचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच, सर्व शिधापत्रिकाधारकांनी ३१ मे २०२५ पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून सरकारी योजनांचा लाभ सतत मिळत राहण्यासाठी आपले रेशन कार्ड सक्रिय ठेवावे.