Kisan Credit Card: शेतकऱ्यांना 1.5 लाखांचे कर्ज अवघ्या 10 मिनिटांत! विशेष प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यातील या जिल्ह्याचा समावेश

Kisan Credit Card

Kisan Credit Card: शेतकऱ्यांना शेतीसाठी विविध प्रकारच्या कर्जाची गरज असते. शासकीय बँका असोत किंवा खाजगी वित्तिय कंपन्या शेतकऱ्यांच्या या आर्थिक अडचणीचा फायदा घेतात आणि त्यांना कर्ज तर देतातच परंतू त्यावर व्याज देखील भरमसाठ लावले जाते. निसर्गांच्या अनियमिततेमुळे आधीच सतावलेल्या शेतकऱ्यांना हा आर्थिक भार सहन होत नाही. देशातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या कारणाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसून येतात.

आता शेतकऱ्यांची ही  आर्थिक अडचण केंद्र सरकार दूर करणार आहे. त्यासाठी देशातील दोन जिल्ह्यांमध्ये एक विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत निवड केलेल्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना अवघ्या 10 मिनिटांत कर्ज पुरवठा होईल. चला तर मग केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवलेल्या या प्रकल्पाची माहिती घेऊ आणि शेतकऱ्यांना कसे बिनव्याजी कर्ज मिळवता येईल ते देखील पाहू. तसेच महाराष्ट्रातील नेमका कोणता जिल्हा या योजनेसाठी निवडण्यात आलेला आहे त्याची देखील माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून मिळविणार आहोत. Kisan Credit Card

Kisan Credit Card संपूर्ण भारतातून केवळ दोन जिल्हे निवडण्यात आलेले आहेत

या योजनेसाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याची निवड केली आहे आणि उत्तर प्रदेशातील फारुखाबाद या जिल्ह्याची निवड केली आहे. प्रायोगिक तत्वावर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. Kisan Credit Card

फक्त शेतकऱ्यांना मिळणार बिन व्याजी कर्ज

शेतकऱ्यांना कमी व्याजात किंवा बिनव्याजी कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने एक योजना सुरु केली आहे. शासनाच्या किसान क्रेडिट कार्ड या जुन्या योजनेला ऍग्रो स्टॅक या ऍपची जोड देण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्ड ही केंद्र शासनाची योजना आहे. शासनाने तयार केलेल्या ऍग्री स्टॅक या ऍपच्या मदतीने आता शेतकरी अवघ्या 10 मिनिटात 1 लाख 60 हजारापर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळवू शकणार आहेत. शेतीच्या कामांसाठी या रकमेचा खूप उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे. Kisan Credit Card

ॲग्री स्टॅक ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण

शासनाच्या या योजनेसाठी निवड झालेल्या जिल्ह्यांना म्हणजेच महाराष्ट्रातील बीड आणि उत्तर प्रदेशातील फारुखाबाद या जिल्ह्यामध्ये  शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत कर्जाची प्रक्रिया अत्यंत सोपी असून ॲग्री स्टॅक या ऍपच्या मदतीने अवघ्या दहा मिनिटांत शेतकऱ्यांना  शेतीसाठी कर्ज मिळवता येणार आहे. या ॲपच्या मदतीने दहा मिनिटांतच 1लाख 60 हजार रुपयांचे कर्ज मिळेल. विशेष म्हणजे या कर्जासाठी शेतकऱ्यांना काहीही तारण ठेवावे लागणार नाही. हे कर्ज त्यांना विनातारण मिळेल. प्रायोगित तत्वावर हा प्रयोग आपल्या महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. मे महिन्यापासून याप्रकल्पाला सुरुवात होणार असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा भरपूर लाभ घ्यावा, Kisan Credit Card

शेतकऱ्यांसाठी ऍग्री स्टॅक ऍप विकसित करण्यात आले आहे.

  • शेतकऱ्यांना कोणत्याही व्याजाशिवाय आणि जलदगतीने कर्ज  मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऍग्री स्टॅक’ नावाचे नवीन मोबाईल ऍप्लिकेशन लाँच केले आहे.
  • केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तयार केलेल्या ऍग्री स्टॅक हे ऍप डाऊनलोड करण्यासाठी https://agristack.gov.in/#/ या लिंकवर क्लिक करा.
  • या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून केंद्रातून निवड करण्यात आलेल्या बिड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एका क्लिकवर दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करुन मिळणार आहे. हे कर्ज थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. Kisan Credit Card

एकाच ॲपवर पिकांची नोंदणी

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज देण्यासाठी भारत सरकारकडून ॲग्री स्टॅक  हे ॲप विकसीत करण्यात आले आहे. आता देशातील पिकांच्या नोंदणीसाठी सुद्धा  हेच ॲप वापरात येणार आहे. भारत सरकारचा हा पण एक विशेष प्रकल्प आहे. येत्या खरीप हंगामापासून देशातील सर्व पिकांची माहिती या ॲपमध्ये नोंदविण्यात येणार आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून तसे सांगण्यात आले आहे.

भारत सरकाने केवळ दोनच जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे ऍप्लिकेशन सुरू केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील बीड व उत्तर प्रदेशमधील फारुखाबाद जिल्ह्याचा समावेश आहे. मे 2024 पासून  ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अगदी झटपट कर्ज मिळविणे सोपे होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कर्ज शासनाकडूनच देण्यात येणार आहे. Kisan Credit Card