Phule amrutkal mobile app: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी तयार केले नवीन ॲप! पाशूपालन करणाऱ्यांना अत्यंत मदतगार ठरणारे ॲप

Phule amrutkal mobile app

Phule amrutkal mobile app शेतीला जोडधंदा म्हणून अनेक ग्रामिण भागत आजही पशूपालन केले जाते. इतकेच काय तर पशूपालनाकडे आता भरपूर नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून देखील पाहिले जात आहे. अनेक तरुण या व्यवसायात उतरत आहेत. काही तरुण तर पशूपालनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण देखील घेत आहेत.

शासनामार्फत देखील पशूसंवर्धन आणि पशूपालनाला प्रोत्साहन मिळावे, पशूपालनाचा व्यवसाय वाढावा या साठी अनेक नवनवीन योजना आखल्या जात आहेत. पशूपालनासाठी विविध प्रकारची अनुदाने जाहिर करण्यात येत आहेत. परंतु पाळीव प्राणी किंवा पशूपालनाच्या व्यवसायात प्राण्यांना एखादा आजार झाला तर त्याचे निदान कसे करावे, प्राण्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत मात्र योग्य तसे प्रशिक्षण या क्षेत्रात दिले जात नाही. म्हणूनच राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ‘फुले अमृतकाळ’ नावाचे ऍप तयार केले आहे. हे ऍप पशूपालन करणाऱ्यांना अत्यंत मदतगार ठरणार आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या ऍप बद्दल अधिक माहिती मिळवणार आहोत.  Phule amrutkal mobile app

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऍपचे अनावरण

महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागामार्फत फुले अमृतकाळ या नवीन ऍपची निर्मिती करण्यात आली असून ण कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या ऍपचे अनावरण करण्यात आले. Phule amrutkal mobile app

वातावरणाचा पशुसंवर्धनावर होणारा परिणाम दूर करण्यासाठी ऍप मदत करणार

वातावरणात होणारे बदल, प्रदुषण याचा फटका पशु संवर्धनाच्या व्यवसायाला बसत आहे. त्यामुळे पशुंना विविध आजार होताना दिसून येत आहेत. फुले अमृतकाळ या ऍपच्या मदतीने आता हवामानातील बदलांनुसार पशुंची कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी याचा सल्ला पशुपालन करणाऱ्या व्यवसायिक शेतकऱ्यांना मोफत दिला जाणार आहे.

दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे हे ऍप

तुम्ही जर दुग्धव्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी फुले अमृतकाळ मोबाईल ॲप तुम्हा आजच डाऊनलोड केले पाहिजे. दुग्ध व्यवसाय हा महाराष्ट्रातील अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो. असे असताना दुग्धव्यवसाय करत असतांना जनावरांना होणारे आजार या संबधी जागरूक असणे देखील व्ययसायिकांसाठी  महत्वाचे आहे. बरेचदा गुरांना आजार झाल्यानंतर योग्य उपचार न झाल्यास किंवा रोगाचे योग्य निदान न झाल्याने ते दगावण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दुग्धव्यवसायावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

 दुग्धव्यवसाय करत असतांना पासुधानासाठी लागणारा चारा आणिज पाणी या बाबी खूपच महत्वाच्या आहे कारण यामध्ये बदल झाला तर यामुळे सरळ दुधावर परिणाम होतो. म्हणजेच  पशुवैद्कीय सल्ला घेणे पशुपालनाचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांसाठी गरजेचे असते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने फुले अमृतकाळ हे मोबाईल ॲप तयार करण्यात आल्याने आता पशुपालनाबद्दलचे सल्ले मिळविणे अत्यंत सोपे आणि सोयिस्कर झाले आहे. Phule amrutkal mobile app

असे करा ‘फुले अमृतकाळ’ ॲप डाउनलोड

 • तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर मध्ये जा.
 • Phule amrutkal असा शब्द टाकून सर्च करा. किंवा तुम्ही https://play.google.com/store/apps/details?id=com.dairy.thi या लिंकवर क्लिक करुन देखील ऍप डाऊनलोड करु शकता.
 • हे अमृतकाळ मोबाईल ॲप तुमच्या मोबाईलमध्ये install करून घ्या.
 • त्यानंतर तुम्हाला लॉगीन करावे लागेल. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर दिलेल्या चौकटीमध्ये टाईप करा आणि otp मिळवा या बटनावर क्लिक करा. 
 • तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. तो समोरील चौकटीत भरा.
 • तुमचे नाव, भौगोलिक स्थान व पत्ता टाईप करून सबमीट करा.  पत्यासाठी तुम्ही गुगल mapची मदत घेवू शकता.
 • एकता तुम्ही लॉगीन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या  मोबाईलमधील फुले अमृतकाळ ॲपमध्ये देशी गाई, संकरित गाई व म्हशी संदर्भात सविस्तर माहिती मिळेल.
 • ज्यांच्याकडे दुधाळ जनावरे आहे त्यांनी या Phule amrutkal mobile app ॲपचा जरुर उपयोग करावा.

फुले अमृतकाळ ॲपचे फायदे

 • तापमान आणि आर्द्रता निर्देशांकावर आधारित पशु सल्ला मिळणे सोपे झाले
 • उन्हाळ्यातील उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करता येईल.
 • दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली
 • पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेणे सोपे झाले
 • चारा आणि पाण्याचा योग्य वापर कसा करावा याची माहिती पशुपालन करणाऱ्यांना मिळू शकेल. Phule amrutkal mobile app