Kunbi Caste Certificate Genealogy: सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आपले मूळ शोधणे. आपले पूर्वज कोण, आपले मुळं गाव कोणते या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. कुटुंब म्हणजे एक वृक्ष असतो. त्यांचे मुळ कोठे आहे कुटुंब कुठून सुरु झाले, रोप कुणी लावले. कुटुंबाची जात कोणती आहे. कुटुंबाचा त्याचा प्रसार म्हणजेच शाखा फांद्या किती आहेत. आपले पंजोबा त्यांचे भाऊ सख्खे किती त्यांची मुलं किती मुली किती. आपले आजोबा कोण त्यांचे भाऊ किती त्यांना मुलं- मुली किती. रक्ताच्या नात्यांतला हा लेखी पुरावा आपल्याकडे असणे अत्यंत महत्त्वाचे असते.
सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी किंवा शैक्षणिक अनुदान मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्राती आवश्यकता असते. हे जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयात विविध कागदपत्रांचे सबमीशन करावे लागते. त्यापैकी एक म्हणजे जात वंशावळ. प्रत्येक कुटुंबाच्या इतिहास असतो. पणजोबा त्यांची मुले, आजोबा त्यांची मुले आणि वडिल -काका त्यांची मुले अशा तरत्या क्रमाने ही वंशावळ असते. यासंदर्भातच आज आपण या लेखाच्या माध्यमातून माहिती मिळविणार आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला तुमचे कुणबी प्रमाणपत्र मिळवताना तुमची वंशावळ बनवणे सोपे होईल.Kunbi Caste Certificate Genealogy
वंशावळ म्हणजे काय?
प्रत्येक कुटुंबाची वंशावळ असते. वंशावळ म्हणजे प्रत्येक कुटुंबातील पुर्वजांचा इतिहास. पणजोबा किंवा पणजोबांच्या आजोबांपासूनचा संपूर्ण इतिहास एका कागदावर मांडलेला असतो. हि संपूर्ण वंशावळ आत्ताच्या पिढीपर्यंत लिखित स्वरुपात किंवा आराखडा काढलेल्या स्वरुपात मांडायची असते. याला इंग्रजीमध्ये फॅमिली ट्री असे म्हणतात. Kunbi Caste Certificate Genealogy:
कुणबी प्रमाणपत्र बनवण्यासाठी वंशावळ काढण्याची प्रक्रिया.
कुणबी प्रमाणपत्र काढण्याससाठी कुटुंबाची वंशावळ देखील महत्वाची असते, परंतु अनेकांना प्रश्न पडतो की ही वंशावळ नेमकी काढायची कशी? किंवा या वंशावळीचा फॉरमॅट कसा असतो? म्हणूनच वंशावळ काढण्याती प्रक्रिया आम्ही येथे सांगात आहोत.
- वंशावळ काढताना नेहमी ज्या कुटुंबाची वंशावळ काढायची आहे त्या कुटुंबातील व्यक्तींच्या उतरत्या क्रमाने नावे लिहावीत.
- आधी खापर पणजोबाचे नाव लिहावे, खापर पणजोबांची जेवढी मुले आहेत त्यांची नावे एका ओळीच सरळ लिहावी. पणजोबांची नावे लिहून झाल्यानंतर त्यांच्या मुलांची नावे लिहावी. त्यानंतर आजोबा, आजोबांची मुले आणि मग आजोबांच्या मुलांची मुले अशा उतरत्या क्रमाने कोणत्याही कुटुंबाची वंशावळ लिहायची असते. उदा. तुमचे खापर पणजोबा – पणजोबा – आजोबा – वडील बाजूला काका – वडिलांच्या नावाखाली तुमचे नाव आणि काकांच्या नावाखाली काकांच्या मुलांची नावे.
- वंशावळ लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की, ज्या व्यक्तीच्या जातीचा दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीच्या नावापर्यंत वंशावळ लिहायची.
- तहसील कार्यालयातील जन्म मृत्यू नोंद वहीमध्ये प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची जन्म आणि मृत्यूची नोंद असते. तिथे तुम्हाला तुमच्या कुटुंबात्या पुर्वजांचा इतिहास मिळू शकतो.
- पुर्वजांचे तत्कालीन शिक्षण झालेले असेल तर त्यावेळच्या जातीच्या नोंद वहीमध्ये देखील पुर्वजांचे नाव सापडते. Kunbi Caste Certificate Genealogy:
वंशावळ काढणे का गरजेचे असते?
आपल्या जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जेव्हा आपण शासकीय कार्यालयांमध्ये जातो तेव्हा आपल्याला आपल्या कुटुंबाची वंशावळ विचारली जाते. जातीच्या प्रमाणपत्रासाठी आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा हा इतिहास अत्यंत महत्त्वाचा असतो. तसेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळविण्यासाठी देखील वंशावळ विचारली जाते. तुमच्या एखाद्या पुर्वजांच्या नावापुढे कुणबी अशी नोंद आढळून आल्यास त्यांच्या पुढच्या संपूर्ण पिढ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणे सोपे होते. Kunbi Caste Certificate Genealogy
वंशावळीच्या प्रतिज्ञापत्रासाठी अर्ज
https://revenue.mahaonline.gov.in/Site/Common/Documents/Downloads/Application_for_Genealogical_Affidavit.pdf या लिंकवर जाऊन तुम्ही PDF स्वरुपात वंशावळ प्रतिज्ञापत्राचा अर्ज डाऊनलोड करु शकता. Kunbi Caste Certificate Genealogy:
वरती दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या कुटुंबाची वंशावळ तयार करू शकता. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची माहिती मिळत नसेल तर तुम्ही ती तहसिलदार कार्यालयातून मिळवू शकता आणि त्या आधारावर तुमची वंशावळ तयार करून घेऊ शकता. कारण कुणबी जात प्रमाणपत्र असो किंवा कोणतेही जात प्रमाणपत्र असतो वंशावळ ही अत्यंक महत्त्वाचा दस्तावेज आहे.