Land area calculator app download: जमीन मोजणी करण्यासाठी ऍप्लीकेशन डाऊनलोड करा.

Land area calculator app download जमीन मोजणीवरून अनेकदा आपल्याला वाद झाल्याचे दिसून येतात. त्यामुळे शेतजमीन असो किंवा बिगरशेत जमीन वाद हे होतातच त्यावेळी शासनाकडून जमीन मोजणी करुन घेतली जाते. परंतु या पद्धतीने जमीन मोजणी करताना खर्च देखील येतो आणि वेळ देखील जास्त लागतो. परंतु यापुढे तुम्हाला जमीन मोजणी करण्यासाठी कोणताही खर्च करण्याची गरज लागणार नाही. यापुढे तुम्ही मोबाईल ऍप्लीकेशनच्या मदतीने तुम्ही जमीन मोजू शकता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या जमीन मोजणीसाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. 

तुमच्या मोबाईलमधील गुगल मॅपमध्ये आपल्या जमिनीच्या बांधावर जमिनीची हद्द सिलेक्ट करून जमिनीची मोजणी करू शकता.

मोबाईल ऍप्लिकेशनच्या मदतीने अशी करा जमीनीची मोजणी

  • तुम्ही तुमच्या मोबाईलमधील play store ओपन करा.
  • त्यानंतर त्यामध्ये Google map calculator असे सर्च करा.
  • तेथे तुम्हाला अनेक पर्याय दाखवले जातील  त्यामध्ये Gps Area Calculator कॅल्क्युलेटर हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलचा GPS सुरु करा.
  • GPS सुरु केल्यानंतर Gaps Area Calculator हे ऍप उघडा.
  •  स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण नकाशा दाखवला जाईल, त्यामध्ये तुम्ही तुमचे ठिकाण, तुमचे राज्य, जिल्हा व तालुका टाकून सर्च करा.
  • तुम्ही सर्च केलेला नकाशा समोर दिसल्यानंतर तुमच्या जवळील नकाशा आल्यानंतर आता तुमच्या जमिनीच्या चारी बाजू कोपऱ्यांनी सिलेक्ट करा.
  • ऍप्लीकेशनमधील जमीन मोजणीचे परिमाण निवडून तुम्ही जमिनीची मोजणी करू शकता. Land area calculator app download
  • अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमीन मोजताना ऍप्लीकेशनमधील Square Feet किंवा Square Meter या परिणामाणाची निवड करा.
  • ऍप्लीकेशनच्या मदतीने तुम्ही तुमची किंवा इतर कोणाचीही जमीन सहज मोजू शकता. जमीनीचे परिमाण निवडताना तुम्ही जमीन हेक्टरमध्ये सुद्धा मोजू शकता.

काय आहे GPS Area Calculator App?

जीपीएस एरिया कॅलक्युलेटर GPS Area Calculator या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या जमीनीची मोजणी हेक्टर, एकर आणि गुंठ्यामध्ये किंवा इतर कोणत्याही जमीन मोजण्याच्या प्रकारांमध्ये करू शकतात. Land area calculator app download

भारतात जमीन मोजणी ऍपची आवश्यकता

भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. 20 -20 हेक्टरमध्ये एकच प्रकारचे धान्य पीक घेतले जाते. त्यामुळे अनेकदा जमीन मोजणी करणे गरजेचे असते. भारतातील अनेक राज्यांमध्ये जमीनचे वाद उद्भवतात. जमिनीची हिस्सेदारीमध्ये असताना जमीन मोजणी करणे आवश्यक ठरते. अशावेळी शासकीय पद्धतीने जमीन मोजणीवर अवलंबून राहताना जमीन मोजणीच्या कामासाठी खर्च देखील होतो आणि वेळ देखील खूप लागतो. त्यामुळे जमीन मोजणी ऍप अत्यंत मदतगार ठरते.

जमीन मोजण्याची परिमाणे

1 एकरमध्ये एकूण 40 गुंठे असतात. 33 बाय 33 फूट जमीन मिळून एक गुंठा तयार होतो. म्हणजे, 1 गुंठा 1089 चौरस फूट इतका असतो. यावरून 1 एकराचे प्रमाण काढायचे असल्यास ते 43560 चौरस फूट इतके येईल. एकूण 2.47 एकर जमिनीचा एक हेक्टर बनतो ज्यात 98.8 गुंठे असतात. यावरून लक्षात येईल की 107636  चौरस फूटांचा 1 हेक्टर असतो. Land area calculator app download

शेत जमीन मोजण्याचे सुत्र समजून घेऊ

सर्वप्रथम जमिनीची लांबी व रुंदी फूट टेप च्या साह्याने मोजून घ्या, चौरस, आयत जमिनीच्या समोरासमोरील बाजू समानच असतात त्यावेळी काही अडचण नाही मात्र चौकोन जमिनीच्या समोरासमोरील बाजू वेगवेगळ्या असतील तर समोरासमोर च्या बाजूंची बेरीज करून त्या बेरजेला दोन ने भागावे व सदर उत्तरे लांबी अन रुंदी म्हणून वापरावी. त्यानंतर साध्या क्षेत्रफळाच्या सूत्राने गुणाकार करून (लांबीXरुंदी) क्षेत्रफळ काढून घ्यावे

जमीन त्रिकोणी असेल तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र वापरून क्षेत्रफळ काढावे

  • गुंठ्यांमध्ये करताना स्क्वेअर फुटात आलेल्या उत्तराला 1089 ह्या संख्येने भागावे.
  • एकरामध्ये करताना गुंठ्यांमध्ये आलेल्या उत्तराला 40 ने भागावे .
  • हेक्टर मध्ये करताना गुंठ्यांमध्ये आलेल्या उत्तराला 100 ने भागावे किंवा एकरांमध्ये आलेल्या 2.5 ने भागावे. Land area calculator app download