Land Map – जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा अगदी काही सेकंदात

भारत हा  कृषीप्रधान देश आहे. येथे शेत जमिनी अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जाते. तसेच जमिन विकणे व जमिन खरेदी करणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे विषय मानले जाता. त्यामुळे जमिनीचे व्यवहारिकरण करताना डिजिटलायझेशन अत्यंत गरजेचे होते. त्यासाठी शासनाने ई- नकाशा प्रकल्प हाती घेतला. ऑनलाईन पद्धतीने जमिनीची माहिती मिळवताना आपल्याला ई नकाशा प्रकल्पाबद्दल देखील जाणून घेणे गरजेचे आहे.

ई-नकाशा प्रकल्प नेमका काय आहे?

गाव पातळीवर जमिनिच्या हद्दी नियमित करण्यासाठी शासनाकडून भूमि अभिलेख विभाग स्थापन काम करीत असतो. या विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे साठवून ठेवलेले असतात. या नकाशांच्या आधारे जमिनीच्या हद्दी कायम करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे हे नकाशे महत्त्वाचे असतात.

दि. 20 मार्च 2011 रोजी ई नकाशा प्रकल्प व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यासाठीचा शासन निर्णय तयार झाला.  आणि दि. 31 नोव्हेंबर 2012 रोजीच्या शासन निर्णयानुसार ”महाभूमि- प्रकल्प व्यवस्थापन संस्था, राष्ट्रीय भूमि आधुनिकीकरण कार्यक्रम (NLRMP), महाराष्ट्र राज्य” असे नामकरण करण्यात आले. कालांतराने डिजिटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (DILRMP) अशी नावात सुधारणा करण्यात आली. एकात्मिक भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम – National Land Record Modernisation- NLRMP असे नाव देण्यात आलेले आहे. भूमि अभिलेख व्यवस्थापनासाठी आधुनिक, सर्वसमावेशक व पारदर्शक प्रणाली निर्माण करणे ज्यामुळे जमीन विषयक मालकी हक्काचे निर्णय आणि भूमि अभिलेखांचे संगणकीकरण व महसूल प्रशासन बळकट करणे तसेच भूमि अभिलेखांचे अद्यावतीकरण करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला.

      आता शेतीविषयक कामांसाठी किंवा जमीन खरेदी विक्री प्रकल्पामध्ये जमीनिचे आराखडे land map  पाहण्याची गरज भासते. अशावेळी प्रत्येक नागरिकाला त्याच्या त्याच्या मोबाईल, संगणकावर त्यांच्या नावे असलेल्या जमीनीचा आराखडा पाहता यावा म्हणून शासनाने ई नकाशा प्रकल्प सुरु केला आहे. चला पाहुया तुम्ही तुमच्या गावाचा किंवा तुमच्या स्वतःच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने कसा पाहू शकता.

गावचा नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी पुढील प्रोसेस करा.

  • mahabhunakasha.mahabhumi.gov.in ही लिंक उघडल्यावर समोर एक पेज दिसेल त्याच्या डाव्या बाजूला Location (स्थान) हा रकाना असेल, त्यामध्ये राज्य categoryमध्ये urban आणि rural असे दोन पर्याय येतील.
  • तुम्ही शहरात राहत असाल तर urban पर्याय निवडा आणि ग्रामिण भागात राहत असाल तर Rural हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाचा पर्याय निवडा.
  • Village map या पर्यायावर जा.

स्वतःच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी पुढील पर्याय निवडा

  • Village map या पर्यायावर गेल्यानंतर पुढील प्रोसेस करा.
  • डाव्याबाजूच्या बटनावर प्लॉटप्रमाणे जमीन शोधता येते.
  • search by plot number या नावानं एक रकाना दिलेला आहे.
  •  इथे गट क्रमांक किंवा खसरा क्रमांक टाकून सर्चवर क्लिक केले असता तुमचा गट क्रमांक असेल्या जमिनीचा नकाशा तुमच्या स्क्रिनवर दिसतो.
  • अशा पद्धतीने jaminicha nakasha online  तुम्हाला पाहता येतो.

जमिन मालमत्ता विकत घेताना किंवा जमिन विकताना मालमत्तेचा इतिहास पाहण्यासाठी, शेत-जमिनीतून वाट काढण्यासाठी तसेच विकत घेण्यात येणारी  संबंधित जमिनीची हद्द कुठेपर्यंत आहे या सर्व बाबतीत त्या जागेचा नकाशा पहावा लागतो. त्यामुळे याचगोष्टी तुम्ही वरील प्रक्रियेप्रमाणे विनाशुल्क. घरबसल्या मोबाइल किंवा लॅपटॉपवरून तुम्ही  ई भूमि नकाशा पाहू शकता. 

Land map, ऑनलाईन भूमि नकाशा आणि शेतीविषयक शासन निर्णयांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरु नका. इथे तुम्हाला अपडेटेड माहिती आणि शासकीय निर्णयांसंबंधी लेख वाचायला मिळतील. ही माहीती  तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. शेतीसंबंधी किंवा शेतकऱ्यांच्या विविध विकसिक प्रकल्पांसंधी आम्ही वाचनीय लेख घेऊन येत असतो.  जर का तुम्ही शेतकरी आहात किंवा शेतीविषयक अभ्यास करीत आहात तर नक्कीच हे लेख वाचल्याने तुम्हाला नक्कीत फायदा होऊ शकतो.