land measurement online सध्या जमिनीला खूपच जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेकदा जमिनीवरुन वाद होताना दिसून येतात. जमीन खरेदी करायची असो किंवा विकायची असतो जमीन मोजणी ही अत्यंत महत्त्वाची असते. जमीन मोजणी ही शासकीय कार्यालयामार्फत केली जाते. महाराष्ट्र शासन भूमिअभिलेख विभागाच्या तालुकास्तरावरील उपअधीक्षक किंवा नगर भूमापन कार्यालयात अर्ज केल्यानंतर तेथील अधिकारी जमीन मोजणीचे काम करतात. हे शासकीय काम असल्याने त्याचे शुल्क देखील जमीन मालकाला भरावे लागते. जमीन मोजणीसंदर्भातील सर्व माहिती आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. sarkari jamin mojni kashi karavi
सातबाऱ्यावर असणारी जमीन
शेतकऱ्यांची जमीन किती आहे हे त्याच्या सातबाऱ्यावर दिसत असते.मात्र सातबारावर असणारी जमीन आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये अनेक वेळा तफावत होते मग अशावेळी शासकीय पद्धतीने मोजणी करून घेणे हाच एक चांगला पर्याय असतो.
अशी परीस्थिती असते तेव्हा बरेचदा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की, शेतजमीन मोजणीसाठी शासकीय कार्यालयात अर्ज कसा करावा? अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडली पाहिजेत. जमीन मोजणीसाठी शासकीय शुल्क किती असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून मिळणार आहेत.
जमिन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे
कोणतीही जमीन मोजणीसाठी अर्ज करताना काही कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक असते. ही कागदपत्रे कोणती ती आपण पाहू. जमीन मोजणीसाठीचा अर्ज जमीन मालकाने भूमिअभिलेख विभागाच्या तालुकास्तरावरील उपअधीक्षक किंवा नगर भूमापन कार्यालय यांच्या कार्यालयात अर्ज करायचा असतो. sarkari jamin mojni kashi karavi
- जमीन मालकाचे आधारकार्ड, रेशनकार्ड
- जमिनीचा उतारा-8 प्रमाणपत्र
- सातबारा प्रमाणपत्र
- हमीपत्र
- जमिनीचे खरेदी खत
असा भरा जमीन मोजणीचा अर्ज
- bhumiabhilekh.maharashtra.gov.in भूमीअभिलेख विभागाची अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर ‘मोजणीसाठी अर्ज’ असा एक पर्याय येतो. त्यावर क्लिक करा.
- तुम्ही ज्या तालुक्यात कार्यालयात अर्ज सादर करणार आहात त्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव टाकावे लागेल.
- त्यानंतर जमीन मालक किंवा अर्जदाराने आपले संपूर्ण नाव आणि पत्ता याविषयी माहिती भरावी.
- यामध्ये अर्जदाराचे चे नाव, गावाचे नाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव योग्य लिहिणे आवश्यक असते.
- जमीन मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील भरावा.
- मोजणीच्या प्रकार समोर कालावधी आणि उद्देश लिहावा.
- त्यानंतर परत एकदा तालुक्याचे नाव, गावाचे नाव, शेत जमीन ज्या गट क्रमांकात येतो गट क्रमांक आवश्यक असतो. sarkari jamin mojni kashi karavi
- जमीन मोजणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा वेबसाईटवर आहे.
जमीन मोजणीचे तीन प्रकार आहेत
शेतजमीन असो किंवा बिगर शेत जमीन कोणतीही जमीन मोजणीचे तीन प्रकार आहेत. ते आपण जाणून घेऊ sarkari jamin mojni kashi karavi
- अर्ज केल्या नंतर सहा महिन्याच्या कालावधीत जमिनीची मोजणी केली जाते त्या प्रक्रियेस साधी मोजणी असे म्हणतात. या प्रकारातील मोजणी बऱ्याच कालावधीनंतर होते. हे शासकीय अधिकाऱ्यांच्या कामांवर अवलंबून असते.
- जमीन मालकाने अर्ज केल्यानंतर तीन महिन्याच्या आत जमिनीची मोजणी करुन दिली जाते. या प्रकाराला तातडीची मोजणी असे म्हणतात.
- जमीन मालकाने अर्ज केल्यानंतर दोन ते दीड महिन्याच्या आत जमिनीची मोजणी शासकीय अधिकाऱ्यांमार्फत केली जाते त्याला याला अती तातडिची मोजणी असे म्हणतात. बरेचदा जमिन विषयक वाद कोर्टात सुरु असतात किंवा कौटुंबिक वाद विवादांमुळे जमिनीची मोजणी तातडीने करुन घ्यायची असते तेव्हा शासनाकडे तसा अर्ज करावा लागते.
हे आहेत जमीन मोजणीचे दर
तुमची जमीन मोजणी करायची असल्यास सर्व प्रथम तुम्हाला शासकीय कार्यालयात म्हणजेच भूमिअभिलेख विभागाच्या तालुकास्तरावरील उपअधीक्षक किंवा नगर भूमापन कार्यालयात अर्ज करावा लागेल. जमीन मोजणीचा अर्ज करताना जमीन मालकाला पैसे भरावे लागतात. हे जमीन मोजणीसाठीचे शुल्क असते. ते नक्की किती आकारले जातात ते आपण पुढे पाहू. sarkari jamin mojni kashi karavi
- एक हेक्टर साधी मोजणी करण्यासाठी -1000/-रुपये
- एक हेक्टर तातडीच्या मोजणीसाठी – 2000/- ते 2500/- रुपये
- एक हेक्टर अती तातडीची मोजणीसाठी – 3000/- रुपये
जमीन मोजणीच्या प्रकारांप्रमाणे तुम्हाला किती जमीन मोजून घ्यायची आहे त्याप्रमाणे शुल्क भरणे आवश्यक असते. sarkari jamin mojni kashi karavi