Land Purchase Grant: जमीन खरेदीसाठी मिळणार 16 लाखाचे कर्ज.. जाणून घ्या सविस्तर!

Land Purchase Grant

Land Purchase Grant: नमस्कार मंडळी तुम्हाला ऐकून नक्कीच नवल वाटेल पण, सरकारने जमीन खरेदी अनुदान म्हणून ओळखली जाणारी एक योजना देखील राबवली जात आहे, आणि या योजनेचा उद्देश हा शेतजमीन नसलेल्या व्यक्तींना शेतजमीन खरेदी करण्यासाठी मदत करणे हा आहे. ही योजना ज्यांच्याकडे स्वतःची शेतजमीन नाही त्यांच्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी सबसिडी प्रदान करते. Land Purchase Grant

सध्याच्या या काळात लोकसंख्या सतत वाढत चालली आहे, आणि परिणामी लोकांकडे कमी जमीनी उरल्या आहेत, तर काही लोकांकडे जमिनीचं नाही आहेत. भारतातील बर्‍याच प्रदेशांमध्ये, जमिनीचा एक मोठा भाग हा बिनशेती आहे म्हणजेच तो भाग पडीक असून तिथे शेती केली जात नाही. अनेक गावांमध्ये गायरान जमिन उपलब्ध आहे मात्र क्षमता असूनही कोणीही लागवडीचे काम हाती घेतले नसल्याने या जमिनी पडीकच आहेत. ही आणि अश्या जमिनीच्या समस्या सोडवण्यासाठी आणि भूमिहीन व्यक्तींचे सक्षमीकरण करण्यासाठी, सरकारने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान जमीन खरेदी योजना सुरू केली आहे. या योजनेत सरकार द्वारे नुकतेच काही महत्वाचे बदल करण्यात आले असून योजनेतील अलीकडील बदलांमुळे ती आणखी फायदेशीर झाली आहे. आणि या बदलांमुळे लाभार्थ्यांना आता जमीन खरेदी करण्यासाठी पूर्ण शंभर टक्के अनुदान मिळणार असल्याचे दिसून येत आहे. Land Purchase Grant

या जमीन खरेदी योजनेचे प्राथमिक लाभार्थी हे भूमिहीन अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध समुदायातील व्यक्ती असणार आहेत. मात्र या योजनेद्वारे जमीन खरेदीसाठी अनुदान मिळण्यास पात्र होण्यासाठी, काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

1. यापूर्वी कुठलीही जमीन लाभार्थ्यांच्या मालकीची नसेल: लाभार्थीच्या नावावर कोणतीही पूर्वीची जमीन मालकी नसावी.

2. अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असावा.

जमीन खरेदी अनुदान 2023 | Land Purchase Grant 2023 | Land Purchase Grant

जमीन खरेदी अनुदान 2023, हा महाराष्ट्र सरकारद्वारे राबवण्यात येणार एक विशेष उपक्रम असून, विशेषत: अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध समुदायांमधील भूमिहीन शेतमजुरांसाठी एक आशेचा किरण आहे. या योजनेद्वारे, या व्यक्तींना 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलीताखालील जमीन सरकारी दराने खरेदी करण्याची संधी दिली जाते आणि विशेष म्हणजे यामधे सरकार 100% अनुदान देखील देते.

या योजनेला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना असे नाव देण्यात आले असून साल 2004-05 पासून सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, मुंबई सरकारच्या मंत्रालय द्वारे कार्यरत आहे. दारिद्र्यरेषेखालील शेतकरी ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही असा शेतमजुरांच्या उदरनिर्वाहाच्या गरजा पूर्ण करणे हे या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

या योजनेंतर्गत निवड ही एका निवड समितीद्वारे केली जाते, ज्यात अशा अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध भूमिहीन शेतमजुरांवर लक्ष केंद्रित केले जाते ज्यांच्या कुटुंबांकडे उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नाही. Land Purchase Grant

शेतजमीन खरेदी अनुदानासाठी पात्रता निकष | Eligibility Criteria for Agricultural Land Purchase Grant | Land Purchase Grant

1. लाभार्थी 18 ते 60 वयोगटातील असावेत.
2. ते दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन मजूर असले पाहिजेत.
3. भूमिहीन शेतमजूर आणि परित्यक्ता महिलांना निवडीत प्राधान्य दिले जाते.
4. ज्या व्यक्तींना महसूल आणि वनविभागाने आधीच वाटप केलेल्या गायरान आणि सिलिंगच्या जमिनी मिळाल्या आहेत त्या या योजनेसाठी अपात्र आहेत.

शेत जमीन खरेदी अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents Required for Farmland Purchase Subsidy Scheme

1. 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लाभार्थीकडून प्रतिज्ञापत्र, जे शेतजमिनीची पसंती दर्शवते.
2. मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न दर्शविणारा तहसीलदार दाखला.
3. मतदार कार्ड.
4. आधार कार्ड.
5. राशन कार्ड.
6. पासपोर्ट फोटोसह अर्ज.
7. रहिवासी दाखला.
8. भूमिहीन शेतमजूर असल्याचा तहसीलदार दाखला.
9. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थीची स्थिती दर्शविणारे विहित प्रमाणपत्र.
10. लाभार्थी 60 वर्षांपेक्षा कमी आहे हे दर्शवणारा वयाचा पुरावा.
11. अर्जदाराच्या अनुसूचित जाती प्रवर्गाची पडताळणी करणारे जात प्रमाणपत्र. Land Purchase Grant