E Pik Pahani: ई-पीक पाहणी कशी कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

E Pik Pahani: अलीकडच्या काळात, ई-पीक पाहणीचा विषय हा महाराष्ट्रातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हा उपक्रम महाराष्ट्र सरकारद्वारे गेल्या तीन वर्षांपासून राबवण्यात येत आहे आणि ई-पीक पाहणी या उप्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची थेट सातबारा उताऱ्यावर नोंदणी करता येणार आहे. E Pik Pahani उपक्रम हा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची नोंदणी सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी एक सोयीस्कर माध्यम उपलब्ध करून देत आहे. E Pik Pahani

चालू खरीप हंगामात 9 ऑक्टोबरपर्यंत, 1 कोटी 11 लाख 80 हजार हेक्‍टर इतक्या क्षेत्रातील E Pik Pahani पूर्ण करण्यात आली असून, अजून 50 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील E Pik Pahani बाकी आहे. सरकारने पीक नोंदणीसाठी 15 ऑक्टोबर 2023 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. या तारखेनंतर तलाठी (महसूल अधिकारी) स्तरावर पीक पाहणी सोळा ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. याचाच अर्थ ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी बाकी राहणार आहे, ती पीक पाहणी तलाठी यांना करावी लागेल.

छत्रपती संभाजीनगरमधील हिरापूर गावातील शेतकरी लालचंद नागलोत हे ई-पीक पाहणी बद्दल सांगताना म्हणाले की, “गावातील काही काही लोकांनी आधीच ई-पीक पाहणी केली आहे. गावात अशी चर्चा आहे की पीक पाहणी करणे आवश्यक आहे आणि म्हणून लोक पीक पाहणी करत आहेत.

E Pik Pahani कशी कराल? | How to do E Pik Pahani?

1. Play Store वरून E-Peak Pahani ॲप डाउनलोड करा.

2. हे ॲप उघडल्यावर “ई-पीक पाहणी” नावाचे पेज ओपन होईल, आणि याला डावीकडे सरकवल्यास तुम्हाला हे ॲप वापरण्याबाबत माहिती मिळेल. यानंतर पुन्हा एकदा डावीकडे सरकवल्यास पिकांची नोंदणी करण्यास आवश्यक असणाऱ्या गोष्टी दिसतील, जसं की 8 अ, सातबारा उतारा.

3. यापुढे “महसूल विभाग” पर्याय निवडा आणि नवीन खातेदार नोंदणी वर क्लिक करा.

4. इथे विभाग, जिल्हा, तालुका, गाव, खातेदाराचे नाव आणि खाते क्रमांक किंवा गट क्रमांक यासारखी आवश्यक माहिती भरा. ग्रुप नंबर टाकल्यानंतर “शोध” वर क्लिक करा.

5. प्रदान केलेल्या गटातून खातेदार निवडा आणि खातेदाराच नाव आणि खाते क्रमांक तपासून पुढे जा. त्यांनतर आता संकेतांक पाठवा असं पेज ओपन होईल

6. तुम्ही दिलेल्या मोबाइल नंबरवर तुमची नोंदणी प्रक्रिया केली जात असल्याची सूचना तुम्हाला प्राप्त होईल. आवश्यक असल्यास, आपण मोबाइल नंबर बदलू शकता.

7. जर तुम्ही या अ‍ॅपवर याआधी नोंदणी केली असेल, तर तुम्ही आधीच नोंदणीकृत आहात, तुम्हाला पुढे जायचं आहे का असा संदेश तुम्हाला दिसेल. नवीन वापरकर्त्यांसाठी, हा संदेश दिसणार नाही. इथे हो हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.

8. आता तुम्हाला खातेदाराच नाव निवडायचं आहे आणि पिन विसरलात यावर वर क्लिक करून पिन तिथे टाकायचा आहे. जर समोर ब्लँक स्क्रीन आली तर मग तुम्हाला होम या बटणावर क्लिक करावे लागेल.

9. “रेकॉर्ड क्रॉप माहिती” पर्यायावर क्लिक करून तुमच्या पिकांची नोंदणी करणे सुरू करा. खाते क्रमांक, गट क्रमांक, एकूण लागवड क्षेत्र आणि पडीत क्षेत्र यांसारखी माहिती तिथे आधीच येईल.

10. पुढे खरीप हंगाम निवडा आणि पीक प्रकार निवडा जसे की निर्भेळ पीक, मिश्र पीक, किंवा इतर. पिकांची नावे, हेक्टरमधील त्यांचे संबंधित क्षेत्र, सिंचन स्रोत (उदा. विहीर, तलाव), सिंचन पद्धती आणि लागवड तारखा याबद्दल माहिती भरा.

11. तुमचे अचूक स्थान बघण्यासाठी “अक्षांश रेखांश मिळवा” पर्यायावर क्लिक करा. तुमच्या शेतातील पिकाचा फोटो काढून अपलोड करायचा आहे.

12. त्यांनतर तुम्ही दिलेल्या माहितीची पुन्हा एकदा तपासणी करून, स्व-घोषणा बॉक्सवर टिक करून पुढे जा.

13. इथे तुम्हाला पीक माहिती यशस्वीरित्या जतन आणि अपलोड केली गेली आहे असे सांगितले जाईल

14. नोंदणी केलेल्या पिकाची माहिती पाहण्यासाठी तुम्हाला, “पिकांची माहिती पहा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

15. जर तुम्हाला दुसऱ्या गटासाठी पिकांची नोंदणी करायची असेल, तर तुम्ही वरील प्रक्रिया फॉलो करा आणि माहिती सबमिट करण्यासाठी “अपलोड करा” वर क्लिक करा.

ई-पीक तपासणीचे प्रमुख फायदे | Benefits of E-Peak Inspection

1. MSP साठी: तुम्हाला जर तुमच्या शेतीतील मल किमान आधारभूत किंमत योजनेद्वारे विकायचा असल्यास, ई-पीक पाहणी दरम्यान गोळा केलेला डेटा, शेतकऱ्यांच्या संमतीने वापरला जाऊ शकतो.

2. पीक कर्ज पडताळणी: ज्या पिकासाठी शेतकऱ्याने कर्ज घेतले आहे तेच पीक शेतकऱ्याने लावले आहे का हे पाहण्यासाठी बँका या डेटाचा वापर करू शकतात. 100 हून अधिक बँका सध्या हा डेटा वापरत आहेत.

3. पीक विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी: विमा अर्जादरम्यान नोंदवलेले पीक आणि ई-पीक पाहणी मधे नोंदवलेल्या पिकामध्ये कोणतीही तफावत आढळल्यास, पीक पाहणीमधील पिकाला अंतिम गृहीत धरलं जाईल. E Pik Pahani