land record आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. येथे जमिनीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करणे त्यासाठी अडून राहणे यासरख्या गोष्टी वारंवरा दोन गटांमध्ये होत असतात. शहरी तसेच ग्रामिण भागात जमिनीच्या मालकी हक्काबाबत योग्य जागरुकता नसल्याने अनेकदा व्यक्तीसोबत अन्याय होऊ शकतो म्हणूनच आम्ही आजच्या लेखात घेऊन आलो आहोत की land record जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते.
अनेकदा असे होते की, जमीन कसणारा एक पण प्रत्यक्षात मालक मात्र वेगळाच असतो.त्यामुळे मग जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद -विवाद निर्माण होतात. अशावेळी ती जमीन आपल्याच मालकिची आहे, हे सिद्ध करण्यासाठी जमिनीसंबंधीचे काही पुरावे कायमस्वरुपी जतन करुन ठेवणे फार मह्त्त्वाचे असते. मग हे जमिनीवरील मालकी हक्क सांगणारे नेमके कोणते पुरावे जतन करण्याची गरज आहे. हे आता आपण जाणून घेणार आहोत.
जमिनीचे मोजणी नकाशे
जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास जमिनीची मोजणी केली जात असते.यावेळी जमीन मोजणीचे नकाशे आपल्याजवळ असल्यास आपल्याला त्या जमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करता येऊ शकतो.त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे जपून ठेवणं फार गरजेचं असतं. ज्या पद्धतीनं साताबारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिली जात असते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावानं किती बिगर शेतजमीन आहे, याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते. land record
जमिनीचा सातबारा उतारा
शेतजमिनीचा सातबारा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा उतारा मानला जातो.गाव नमुना सातमध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्या शेतकऱ्याचा किती जमिनीवर मालकी आहे, हे सर्व नमूद केलेलं असतं.सातबारा उताऱ्यावर भूधारणा पद्धत नमूद केलेली असते. यावरून जमिनीचा खरा मालक कोण, याची ओळख पटण्यास मदत होत असते.
जमिनीचे खरेदी खत
जमिनीच्या व्यवहारात म्हणजेच खरेदी-विक्रीमध्ये जमिनीच्या मालकी हक्कासंबधी एक महत्त्वाचा कागद आवर्जुन पाहिला जातो. तो कागद म्हणजे जमिनीचे खरेदी खत होय. खरेदी खत म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजला गेला आहे. जमिनीच्या खरेदीखतावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला झाला, कोणत्या दोन व्यक्तींमध्ये झाला, किती क्षेत्रावर आणि किती रुपयाला झाला याची परिपूर्ण माहिती खरेदी खताच्या कागदावर असते. जमिनीचे खरेदी खत तयार झाल्यानंतरच ती माहिती फेरफारवर लागत असते आणि मग सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद करण्यात येत असते.
जमिनीचा कर भरल्याच्या महसूलाच्या पावत्या
जमिनीचा महसूल दरवर्षी जमिन मालकाला भरावा लागतो. हा महसूल भरल्यानंतर तलाठ्यांमार्फत दिली जाणारी पावतीचा कागद अत्यंत महत्त्वाचा असतो. हा कागदसुद्धा जमिनीच्या मालकी हक्काबाबत महत्तावाचा पुरावा ठरू शकतो. या पावत्या एका फाईलमध्ये सांभाळून ठेवल्यास वेळप्रसंगी त्याचा पुरावा म्हणून वापर केला जाऊ शकतो.
जमीन महसूल भरतांना तो नेमका कोणी भरला पाहिजे असा प्रश्न उपस्थित राहतो. हा महसूल कर आहे तो शेतीतील हक्क संबंधावर अवलंबून आहे सरकारने ज्या लोकांना जमिनीचे वाटप केले आहे, असे सर्व पट्टेदारांना हा महसूल भरावा लागतो. कुळ असेल तर ज्यावर जबाबदारी आहे त्या सर्वांना महसूल भरावा लागतो. एखाद्या शेती मध्ये एका पेक्षा जास्त मालक असतील ते सर्व संयुक्त भोगवटादार, यातील स्वत:च्या हिश्याला जेवढा जमीन महसूल येईल तेवढा जमीन महसुलासाठी ते जबाबदार म्हणून ग्राह्य धरले जातात
जमिनीच्या आधीच्या खटल्यांसंबंधीचे कागदपत्र
एखाद्या जमिनीवर मालकी हक्कावरुन किंवा इतर कोणत्याही कारणाने कोर्ट केस सुरु असेल तर त्याबाबातचे सर्व कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण त्यामध्ये न्यायालीन खटला चालवल्याची माहिती असते. केसची कागदपत्रं, त्यातील जबाबाच्या प्रती, निकाल पत्र इत्यादी महत्वाचे कागदपत्रं आपण जपून ठेवले पाहिजेत. या सर्व कागदपत्रांचा वापर जमिनीवर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी येऊ शकतो.
जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड
बिगरशेती जमिनीवर जर तुमची मालमत्ता असेल तर त्याच्या मालकी हक्काविषयीही जागरूक राहणं अत्यंत आवश्यक असते. बिगरशेतजमिनीवर मालमत्तेच्या हक्काविषयी माहिती सांगणारा सरकारी कागदाला प्रॉपर्टी कार्ड म्हटले जाते. जसे की, साताबारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिली जात असते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावाने किती बिगर शेतजमीन आहे, याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते. जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करताना हे प्रॉपर्टी कार्ड तुमच्या अतीशय कामी येऊ शकते.