Land Record: नमस्कार. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने जमीन मालकांना सुद्धा त्यांच्या जमिनीचा आधार क्रमांक देण्यासाठी एक योजना सुरू केली आहे. या योजनेला “जमिनीसाठी आधार” योजना म्हणतात. या योजनेअंतर्गत जमीन मालक त्यांचा आधार क्रमांक त्यांच्या जमिनीच्या नोंदीसोबत लिंक करू शकतात. यामुळे जमिनी बाबत होणारी फसवणूक रोखण्यात मदत होणार असून, जमीन मालकांना सरकारी योजना आणि सेवांमध्ये प्रवेश करणे सोपे होणार आहे. Land Record
सत्तेत आल्यापासून सध्याच्या सरकारने देश डिजिटल करण्यावर सर्वाधिक भर दिला असल्याचं दिसून आलं असून, सरकारी कार्यालयातील काम डिजिटल करण्यापासून ते देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे डीजिटायजेशन पोहोचवण्यात सरकार गुंतले आहे. नोटाबंदी ते जीएसटीसारख्या मोठ्या निर्णयांनीही डिजिटल इंडिया मधे वाढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या प्रकारे भारतात, नागरिकांना देण्यात आलेल्या युनिक क्रमांकाद्वारे म्हणजेच आधार कार्ड द्वारे त्यांना मोठा फायदा झाला आहे. मात्र आता याच पार्श्वभूमीवर सरकार द्वारे आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याप्रमाणे आत्तापर्यंत प्रत्येक व्यक्तीचा एक विशिष्ट क्रमांक (आधार क्रमांक) होता, त्याचप्रमाणे, आता सरकार जमिनीचाही युनिक नोंदणीकृत क्रमांक जारी करण्याच्या तयारीत आहे. वास्तविक पाहता, केंद्र सरकार वन नेशन वन रजिस्ट्रेशन या कार्यक्रमांतर्गत हे काम करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2022 मध्ये याचा उल्लेख केला होता. Land Record
2023 पर्यंत नियोजित होते
अर्थसंकल्प 2022 नुसार आता जमिनीच्या नोंदी डिजिटल पद्धतीने ठेवल्या जाणार असून यासाठी आयपी आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी जमिनीच्या कागदपत्रांची मदत घेतली जाणार असून त्या नोंदी डिजिटल पद्धतीने ठेवल्या जाणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने 2023 पर्यंत देशभरातील जमिनीच्या नोंदी डिजिटल करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. याअंतर्गत मार्च 2023 पर्यंत संपूर्ण देशात जमिनीच्या नोंदी डिजिटल केल्या जातील, असे सांगण्यात आले होते.
तुम्हाला काय फायदा मिळेल? | Land Record
डिजिटली झालेल्या जमिनीच्या नोंदीमुळे लोकांना अनेक फायदे मिळणार आहेत. वास्तविक पाहता, ते 3C फॉर्म्युला अंतर्गत वितरित केले जाणार असल्याने, नागरिकांना याचा खूप फायदा होणार आहे. यापैकी सेंट्रल ऑफ रेकॉर्ड्स, कन्व्हिनियन्स ऑफ रेकॉर्ड्स, रेकॉर्ड्सचे संकलन याचा सर्वसामान्यांना खूप फायदा होईल. या अंतर्गत, तुमच्या जमिनीला 14 अंकी ULPIN क्रमांक म्हणजेच युनिक क्रमांक देण्यात येणार आहे. सोप्या भाषेत या क्रमांकाचा जमिनीचा आधार क्रमांकही म्हणता येईल. म्हणजेच याच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या बसल्या एका क्लिकवर तुमच्या जमिनीची सर्व कागदपत्रे व इतर काही माहिती सुद्धा पाहू शकाल.
तुमच्या जमिनीसाठी आधार क्रमांक मिळवण्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत: Land Record
सर्व प्रथम तुम्हाला जवळच्या UIDAI नावनोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल.
त्यांनतर तुम्हाला यासाठी नावनोंदणी फॉर्म भरायचा आहे.
त्यांनतर तुमच्या जमिनीच्या नोंदी तिथे उपस्थित नोंदणी अधिकाऱ्याकडे द्या.
पुढे तुम्हाला तुमची बायोमेट्रिक माहिती द्यावी लागेल जसं की फिंगरप्रिंट आणि डोळ्यांचे स्कॅन.
सगळ्यात शेवटी तुम्हाला रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार आहे.
तुम्ही तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर, UIDAI त्यावर प्रोसेस करेल आणि तुम्हाला 15 दिवसांच्या आत आधार पत्र पाठवण्यात येईल.
जमिनीबद्दल ची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार | Land Record
हा ULPIN प्रधानमंत्री किसान सन्मान निधी सारख्या अनेक योजनांमध्ये देखील वापरला जाऊ शकतो. तसेच, ULPIN क्रमांकाच्या मदतीने तुम्हाला देशात कुठेही जमीन खरेदी-विक्री करत असताना कोणतीही अडचण येणार नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे भविष्यात जर जमिनीचे विभाजन झाले तर त्या दोन्ही जमिनींचा आधार क्रमांक हा वेगळा असणार आहे.
ड्रोनच्या मदतीने केले जाणार जमिनीचे मोजमाप
वन नेशन, वन रजिस्ट्रेशन या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकार ड्रोन चा वापर करून जमिनीचे मोजमाप करणार आहे. वास्तविक पाहता, ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोजमापात कोणत्याही प्रकारची चूक होण्याची शक्यता नसल्याने हे मोजमाप या प्रकारे केले जाणार आहे. कालांतराने हे मोजमाप सरकारी डिजिटल पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. Land Record