Lek ladaki yojna 2024: मुलींच्या शिक्षणासाठी राज्य सरकारचा धडाकेबाज निर्णय

Lek ladaki yojna 2024

Lek ladaki yojna 2024 मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत मुलीला 18 वर्षे पुर्ण होईपर्यंत 75 हजार ते 1 लाख रुपये मिळणार आहेत. चला तर मग पाहूया ही कोणती योजना आहे. आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा आहे. Lek ladaki yojna 2024

मुलींच्या शिक्षणास चालना देण्यासाठी आणि मुलींचा मृत्यूदर कमी करण्यासाठी तसेच  व कुपोषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना सुरु केली आहे.  1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या 1 किंवा 2 मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.  दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा दोन्ही मुली जरी असतील तरी त्या दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. असे महाराष्ट्र राज्य सरकारने काढलेल्या शासकीय निर्णयात जाहिर केले आहे.

योजनेचा निर्णय कधी घेण्यात आला

महाराष्ट्र सरकारने 10 मार्च रोजी 2023-2024 चा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पा दरम्याने राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींच्या शिक्षणासाठी लेक लाडकी ही योजना जाहीर केली.  या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार मुलींच्या नावे उघडलेल्या खात्यात 50 हजार रुपयांची रोख रक्कम देणार आहे. पात्र मुलींना 75 हजार. तत्कालीन अर्थमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना जाहीर केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला पाठिंबा दिला. Lek ladaki yojna 2024

लेक लाडकी योजनेची  महत्त्वाची उद्दिष्टे

  • पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांचे प्रमाण कमी होत असल्याने मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविण्याचा शासनाचा हेतू आहे. Lek ladaki yojna 2024
  • या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणास चालना देण्याचा शासनाचा हेतू आहे.
  • मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह कमी करणे
  •  मुलींचे कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थी मुलीचा जन्म दाखला
  • पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख असल्याचा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला
  •  लाभार्थी व पालकाचे आधारकार्ड (पहिल्या लाभावेळी मुलीच्या आधारकार्डसाठी सूट देण्यात आली आहे.)
  • राष्ट्रीयीकृत बँकेतील पासबूकच्या (माता व मुलीचे संयुक्त खाते) पहिल्या पानाची झेरॉक्स, रेशनकार्ड
  • पालकांचे मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभावेळी मुलीचे नाव मतदार यादीत बंधनकारक)
  • लाभाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलगी शाळा शिकत असल्याचा दाखला  म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट देणे अपेक्षित आहे.  
  • मुलीची आई किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
  • योजनेच्या लाभ त्यांच मुलींना घेता येईल ज्यांचा विवाह झालेला नाही. Lek ladaki yojna 2024

लेक लाडकी योजनेच्या अटी आणि शर्ती

  • लाभार्थी मुलगी किंवा तिचे पालक महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.
  • पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू राहील.
  •  एक मुलगा व एक मुलगी असेल तरीही  मुलीला मिळेल लाभ.
  • 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींनाही मिळेल लाभ.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे. Lek ladaki yojna 2024

18 व्या वर्षापर्यंत मुलींना मिळणार 75 हजार रुपये. पुढील टप्प्या टप्प्याने मिळणार पैसे

  • मुलगी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये मिळतील.
  • मुलगी पहिलीत शिकत असताना 6,000 रुपये देण्यात येतील.
  • मुलगी  सहावीत शिकत असताना  7,000 रुपये मिळतील.
  • मुलगी अकरावीत शिकत असताना  8,000 रुपये मिळतील.
  • मुलगी 18 वर्षांची झाल्यावर  रोख 75,000 तिच्या बँक खात्यात  जमा होतील.
  • अशा रितीने राज्यातील मुलीला एकूण 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ  महाराष्ट्र राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. Lek ladaki yojna 2024