Life VS Health Insurance: जीवन आणि आरोग्य याबद्दल कोणताही अंदाज वर्तवणे कठीण असू शकते, कारण कधी कुठली परिस्थिती समोर येईल हे काही आपल्याला सांगता येणार नाही. आणि अशाच काही परिस्थिती हाताळण्यासाठी, तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही विम्यामधील गुंतवणुकीचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे. सध्या, तुम्ही जीवन विमा आणि आरोग्य विमा दोन्ही घेऊन भविष्य सुरक्षित करू शकता. लाइफ इन्शुरन्समुळे तुमच्या कुटुंबाला पैशाची मदत होते आणि आरोग्य विमा दीर्घ उपचारांदरम्यान तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला आर्थिक अडचणी येणार नाही याची काळजी घेतो. Life VS Health Insurance
आरोग्य विमा आणि जीवन विम्याच्या अनेक फायद्या आणि तोट्यांबद्दल याआधी देखील बरीच चर्चा झाली आहे. काही लोक आरोग्य विम्याच्या जागी जीवन विम्याचा विचार करत आहेत, आणि याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना या विम्यासंदर्भात पूर्णपणे माहिती नसते. बाजारात विविध विम्याचे पर्याय उपलब्ध असल्याने कुठल्या एकाची निवड करणे थोडे गोंधळात टाकणारे असू शकते.
पण तुमच्या आयुष्यात किंवा आरोग्याच्या बाबतीत काही अनपेक्षित गोष्टी घडल्याचं तर विम्यामुळे म्हणजे आरोग्य आणि जीवन विमा दोन्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता देऊ शकतात. आणि म्हणूनच या दोन्हींमध्ये गुंतवणुक करणे योग्य आहे. याचा तुम्हाला फायदाच होईल. Life VS Health Insurance
जीवन विमा का आवश्यक आहे आणि त्याचे फायदे कोणते? | Why is life insurance necessary and what are its benefits? | Life VS Health Insurance
जीवन विमा हे तुम्ही आणि विमा कंपनी यांच्यातील एक करार आहे. या करारामध्ये, कंपनी तुमचे निधन झाल्यानंतर तुमच्या निवडलेल्या व्यक्तीला (लाभार्थी) ठराविक रक्कम देण्याचे वचन देते. जीवन विम्याचे मुख्य उद्दिष्टच हे आहे की तुम्ही नसतानाही तुमचे कुटुंब आणि जवळच्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असतील. सध्या बाजारात विविध जीवन विमा योजना उपलब्ध आहेत, काही कमी प्रीमियमसह, आणि बर्याचदा आयकर लाभांच्या अतिरिक्त फायद्यासह येतात.
जेव्हा तुम्ही विमा घेण्याचा विचार करत असाल, तेव्हा त्याचा आपल्याला कसा आणि किती फायदा होतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपण नेहमीच जीवन आणि आरोग्य विमा निवडतो कारण ते थेट तुमच्या आयुष्याशी संबंधित असतात.
जेव्हा तुमच्या आयुष्यात अचानक काही अनपेक्षित गोष्ट घडते, जसे की आजारपण किंवा, आणखी काही तेव्हा दोन्ही प्रकारचे विमा मदत करतात. परंतु येथे मुख्य फरक हा आहे की जीवन विमा तुम्ही हयात नसल्यावर तुमच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य पुरवण्यावर लक्ष केंद्रित करतो, तर आरोग्य विमा हा तुम्ही आजारी पडल्यास त्याचा सर्व खर्च भरून काढण्यावर भर देतो. याला तुम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू देखील म्हणू शकता.
सुरक्षित जीवनासाठी दोघांची गरज का आहे? | Why do you need both for a safe life? | Life VS Health Insurance
जीवन विमा आणि आरोग्य विमा दोन्ही असणे म्हणजे जीवनात घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टींमधे दुहेरी सुरक्षा जाळे असण्यासारखे आहे. जर तुम्ही मुख्य कमावणारे असाल, आणि तुम्हाला काही झाले तर जीवन विम्याद्वारे तुमच्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळेल.
या उलट, काही अनपेक्षित वैद्यकीय समस्या समोर आल्यावर आरोग्य विमा महत्वाची भूमिका बजावतो. आरोग्य समस्यांमुळे तुमची बचत एका झटक्यात संपू शकते परंतु इथे आरोग्य विमा कामाला येतो. आरोग्य विमा तुमच्या संपूर्ण उपचाराचा खर्च उचलतो. बर्याच लोकांसाठी, दोन्ही प्रकारचे संरक्षण असणे ही एक मात्वाची गोष्ट आहे.
मुख्य फायदा | main benefit
लाइफ इन्शुरन्सचा मुख्य फायदा हा आहे की तो तुम्ही गेल्यानंतर तुम्ही निवडलेल्या व्यक्तीला (नामांकित) इन्शुरन्स ची रक्कम देतो. तर दुसरीकडे, आरोग्य विमा उपचार, वैद्यकीय परिस्थिती आणि काही बिले एका ठराविक कमाल मर्यादेपर्यंत हाताळतो.
टॅक्स सुटमधे सुद्धा फरक आहे | difference in tax exemptions
जीवन विम्याला आयकर कायद्याच्या कलम 80C आणि 10(10D) अंतर्गत सूट मिळते. आरोग्य विम्याला कलम 80D अंतर्गत कर सुट मिळते.
लाइफ इन्शुरन्समध्ये मुदत योजना, बचत, मुलांशी संबंधित किंवा सेवानिवृत्ती योजनांचा समावेश होतो. या उलट आरोग्य विमा, सर्वसमावेशक आरोग्य कव्हरेजपासून गंभीर आजार योजनांपर्यंत अनेक श्रेणी ऑफर करतो. Life VS Health Insurance