Voting स्लिप घरी न आल्यास घरबसल्या करता येईल डाउनलोड, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पद्धत

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे 2024 रोजी पार पडणार आहे. यावेळी  लोकसभेच्या 49 जागांसाठी मतदान होणार आहे. अशातच बुथ स्तरावरील अधिकारी घरोघरी जाऊन वोटर स्लिपचे वाटप देखील  करीत आहेत.  नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी शासनाने ही सुविधा केली आहे.  भारतभरात एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. त्यापैकी 4 टप्प्यांमधील मतदान झाले असून आता पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.  जे नागरिक या पाचव्या टप्प्यात मतदान करणार आहेत आणि त्यांना त्यांची वोटींग स्लीप मिळालेली नाही अशांसाठी हा लेख आम्ही घेऊन आलो आहोत. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील मतदान स्लीप मिळवू शकता मग ती कशी मिळवायची याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती  आम्ही घेऊन आलो आहोत.  चला तर मग याबद्दल अधिक जाणून घेऊया.

पाचव्या टप्प्यातील मतदान होईल मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये

20 मे 2024 रोजी मुंबईमध्ये मतदान होणार आहे.  5 व्या टप्प्यातील या मतदानावर अनेकांचा लक्ष आहे. कारण या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असलेल्या मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये लोकसभा निवडणूका होणार आहेत एकूण 49 लोकसभेच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मतदान पाच टप्प्यात होणार असल्याने हे महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान आहे असे म्हणता येईल. Lok Sabha Election 2024

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात लोकसभेच्या सहा जागा आहेत. हे मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण आहेत. ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर या जागांसाठीही पाचव्या टप्प्यात निवडणूका होणार आहे. Maharashtra Voter List 2024

अशी करा वोटर स्लिप डाउनलोड

  • सर्वप्रथम मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन तेथे voter helpline app डाउनलोड करा.
  • ते ऍप तुमच्या मोबाईलमध्ये ओपन झाल्यानंतर त्यामध्ये मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड भरून लॉगइन करा.
  • नॅशनल वोटर सर्विस पोर्टलवर रजिस्टर करा.
  • EPIC क्रमांक सर्च केल्यानंतर वोटर स्लिप दाखवली जाईल ती डाउनलोड करा.
  • SMS च्या माध्यमातून मतदात्याला मतदान केंद्राची माहिती देखील पाठवली जाईल. मतदानाच्या दिवशी मतदात्याने या केंद्रावर उपस्थित राहून मत करायचे आहे. Maharashtra Voter List 2024

वोटर स्लिपशिवाय असे करा मतदान

मतदार यादीत नाव नसल्यास आणि वोटर स्लिपही नसेल तरीही तुम्ही मतदान कार्डच्या माध्यमातून मतदान करू शकता. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पुढील ओखळपत्रांच्या माध्यमातून मतदान करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना अशा काही ओखळपत्रांचा समावेश आहे.
  • बँक किंवा टपालखात्याचे फोट असलेले पासबूक
  • रोजगार ओळखपत्र
  • कामगार मंत्रालयामार्फत देण्यात येणारे आरोग्य कार्ड Maharashtra Voter List 2024

मोबाईल ऍपच्या मदतीने वोटर स्लीप डाऊनलोड करा

  • https://electoralsearch.eci.gov.in/  या लिंकवर क्लिक करा
  • तुमच्या मोबाईल नंबरच्या मदतीने  तुम्ही येथे वोटर स्लिप मिळवू शकता.
  • तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल. तो ओटीपी समोर भरल्यानंतर काही सेकंदातच तुमचे मतदार कार्ड आणि तुमचे मतदान सेंटर तुमच्यासमोर येईल.
  • ही माहिती सेव करुन ठेवा. Maharashtra Voter List 2024

ऑनलाईन वोटर स्लीप मिळविण्याचे फायदे Lok Sabha Election 2024

ऑनलाईन पद्धतीने वोटर स्लीप मिळविण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करुन दिली आहे. जेणेकरून ज्या नागरिकांकडे वोटर स्लीप किंवा मतदार कार्ड उपलब्ध नाही त्यांना मतदान करण्याची संधी मिळावी. या ऑनलाईन पद्धतीने वोटर स्लीप मिळविण्याचे पुढीलप्रमाणे काही फायदे आहेत, Maharashtra Voter List 2024

  • ऑनलाईन पद्धतीने वोटर स्लीप मिळविण्याची सुविधा असल्याने मतदाराला वेळीच मतदान करता येते.
  • मतदार कार्ड नसले तरी ऑनलाईन वोटर स्लीपच्या मदतीने मतदान करता येते
  • मतदाराचा वेळ वाचतो. Maharashtra Voter List 2024