PM Awas Yojana 2024: पीएम आवास योजनेचे नवीन नियम आणि पात्रता अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या!!

PM Awas Yojana 2024 भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली तरी आजही भारतातील काही नागरिकांकडे स्वतःचे घर नाही, निवारा नाही. विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी कमी खर्चात बनविण्यात आलेली घरे शासनाने उपलब्ध करुन दिली आहेत. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचे नाव प्रधानमंत्री आवास योजना असे नाव आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी  पात्रता आणि नियम जाणून घेऊया, या योजनेसंबंधित अधिक माहिती  जाणून घेऊया. PM Awas Yojana 2024

काय आहे PMAY योजना?

प्रधानमंत्री आवास योजना 1 जून 2015 रोजी सुरू करण्यात आलेली, प्रधान मंत्री आवास योजना सरकारच्या सर्वांसाठी घरे या मिशन अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करून भारतातील घरांची कमतरता दूर करण्याचे लक्ष्य ठेवते. पीएमएवाय (PMAY) कार्यक्रम मागणी-आधारित दृष्टिकोनाचा अवलंब करतो ज्या अंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना विशिष्ट निकषांवर आधारित मागणी सर्वेक्षणाद्वारे ओळखल्या गेलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी प्रकल्प मंजूर करण्याचा अधिकार दिला जातो. PM Awas Yojana 2024

PM Awas Yojana 2024 ग्रामिण आणि शहरी दोन्ही ठिकाणी राहणारे नागरिक लाभ घेऊ शकतात

अनेकांचा असा गैरसमज असतो की, प्रधानमंत्री आवास योजना ही केवळ ग्रामिण भागात राबवली जाणारी योजना आहे परंतु तसे नाही. ही योजना ग्रामिण आणि शहरी या दोन्ही ठिकाणी राबवली जाते. या योजनेचा फायदा शहरी आणी ग्रामिण भागातील नागरिक घेऊ शकतात. शहरी भागात शासनामार्फत जे घरकुल प्रकल्प उभारले जातात त्यामध्ये नागरिकांना कमी पैसे भरुन घर मिळविण्याची सुविधा असते.  PM Awas Yojana 2024

नागरिकांच्या उत्पन्नाच्या गटाप्रमाणे आवास योजनेचा लाभ PM Awas Yojana 2024

ग्रामिण आणि शहरी भागातील नागरित त्यांच्या उत्पन्नाच्या गटाप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकतील. काही राज्यांमध्ये तेथील राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येते.

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिक (EWS) –  ३ लाख रुपयापर्यंत
  • कमी उत्पन्न गटातील नागरिक (LIG) –        3 लाख रुपये ते ६ लाख रुपयापर्यंत
  • मध्य उत्पन्न गटातील नागरिक – 1 (MIG-1) –        6 लाख रुपये ते 12 लाख रुपयापर्यंत
  • मध्य उत्पन्न गटातील नागरिक – 2 (MIG-2) –       12 लाख रुपये ते 18 लाख रुपयापर्यंत PM Awas Yojana 2024
  •  

पीएम आवास योजनेसाठी अर्जदाराची आवश्यक पात्रता – PM Awas Yojana Eligibility

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करताना सर्वप्रथम ही पात्रता जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा
  • प्रधानमंत्र आवास योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे स्वतःचे पक्के घर नसावे
  • अर्जदार किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीची सरकारी नोकरी असेल तर या योजनेसाठी ते अपात्र ठरवले जाऊ शकते
  • EWS आणि LIG जातीचे घरातील मुख्य महिलांना या योजनेचा लाभ मिळवता येईल.
  • पण EWS मधील लोकांचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा कमी असावे. PM Awas Yojana 2024

पीएम आवास योजनेसाठी  आवश्यक कागदपत्रे-  PM Awas Yojana Documents List

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराकडे पुढील आवश्यक कागदपत्रे असणे अत्यंत महत्त्वाचे असते. ही कागदपत्रे अर्जदाराकडे नसतील तर अर्जदार योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

  • आधार कार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्ड
  • विज बिल
  • जमिनीचा सातबारा उतारा
  • उत्पन्नाचा दाखला
  • मनरेगा जॉब कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज- Apply for PMAY

  • भारत सरकारची प्रधानमंत्री आवास योजना ग्रामिण या नावाने अधिकृत वेबसाईट आहे.
  • https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx या लिंकवर क्लिक करुन तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
  • तुमच्या घराजवळी ग्रामपंचायत किंवा CSC सेंटरला भेट द्या, आणि तेथून आवास योजनेसंबंधीत फॉर्म घ्या,
  • मिळालेला फॉर्म भरुन झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा CSCसेंटरला भेट द्यायची आहे आणि ऑनलाईन अप्लाय करायचे आहे. ऑनलाईन अप्लाय करताना वरती सांगितल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे असते.
  • अर्ज केल्यानंतर 45 दिवसांच्या आत तुम्हाला  याबाबत शासनाकडून पाठपुरावा केला जातो. आणि तुमच्या आर्थिक स्थितीची पडताळणी करुन आवास योजनेमार्फत घर मंजूर केले जाते.

या योजनेमार्फत मिळणारे पैसे टप्प्या टप्प्याने दिले जातात. PM Awas Yojana 2024