Maha DBT Biyane Anudan Yojana 1 जानेवारी 2023 पासून केंद्र सरकारच्या नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेला सुरुवात झाली. 2023 वर्षासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवण्याची नवीन योजना जाहीर करण्यात आली. गरीब आणि दुर्बल गटातल्या लोकांसाठी अन्नधान्याची सुलभता, किफायतशीर दर आणि उपलब्धतेच्या बाबतीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि त्यासंदर्भातील तरतूदी करण्यात आल्या. त्याचबरोबर उत्पन्नात वाढ व्हावी. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पिक घेऊन चांगले उत्त्पन्न घेता यावे आणि ते उत्पन्न वाढल्यास या केंद्रीय योजनेसाठी मदत होईल या हेतूने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बियाणे वितरण योजना सुरु करण्यात आली. या योजनेसंदर्भात अधिक सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत. Maha DBT Biyane Anudan Yojana
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बियाणे वितरण योजनेसाठी आवश्यक पात्रता काय?
- शेतकऱ्यांची स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे
- आर्जदार शेतकऱ्यांकडे शेतीसाठी जलसाठा असणे आवश्यक आहे.
- शेतकरी अनुसूचित जाती, जमातीचा असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे.आणि जमिनीसंदर्भात कोणतीही न्यायालयीन केस नसावी. Maha DBT Biyane Anudan Yojana
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बियाणे वितरण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराच्या जमिनीचा 7/12 उतारा
- 8 अ प्रमाणपत्र
- शेतकरी आरक्षणांतर्गत येत असल्यास जातीचे प्रमाणपत्र
- पूर्वसंमती पत्र
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बियाणे वितरण योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?
- या योजनेसाठी शेतकऱ्यांनी खालील लिंकवर क्लिक करुन अर्ज करायचा आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login
- वेबसाईटच्या मुख्य पानावर गेल्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करून तुमची नोंदणी करुन घ्या
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला शेतकरी योजना या पर्यायावर जाऊन क्लिक करायचे आहे. येथे तुम्हाला शेतकऱ्या बांधवांशी नीगडीत सर्व शासकीय योजना मिळतील त्यांतील बियाणे अनुदान योजनेवर क्लिक करा आणि अर्ज करा.
- विचारण्यात आलेली कागदपत्रे अपलोड करा.
- बियाणे अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी 23.60रुपये एवढे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागले. त्यानंतर तुमचा अर्ज सादर होणार आहे.
- शेवटी submit बटनावर क्लिक करून, तुमचा अर्ज ऑनलाईन सबमीट करा.
बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख
दिनांक 31 मे 2024 ही अंतीम तारीख असून आलेल्या अर्जांमधून लाभार्थी शेतकऱ्यांना ऑनलाईन लॉटरी पद्धतीने निवड केली जाणार आहे. Maha DBT Biyane Anudan Yojana
केंद्र शासन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत समाविष्ट जिल्हे आणि त्यांना दिली जाणारी बियाणे
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे त्या जिल्ह्यांची यादी पुढील प्रमाणे आणि सोबतच ज्या पिकांची बियाणे अनुदान पद्धतीवर देण्यात येणार आहेत त्यांची देखील नावे पुढे नमुद करण्यात आली आहेत. mahadbt portal farmer schemes 2021
- भरडधान्य आणि मका- सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव
- गहू – सोलापूर, बीड, नागपूर
- पौष्टीक तृणधान्ये – ज्वारी, बाजरी, रागी
- भात – नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली
- कडधान्य – सर्व जिल्हे
- बाजरी – जालना, उस्मानाबाद नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड
- ज्वारी – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ
- ऊस –औरंगाबाद, जालना, बीड.
- कापूस –अमरावती, वाशिम, बुलढाणा,अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.
- नाचणी – ठाणे (पालघर सह), नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड व रत्नागिरी. उस्मानाबाद, नांदेड, लातूर,परभणी,हिंगोली.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बियाणे वितरण योजना ही शेतकऱ्यांना माफक दरात चांगले बियाणे मिळावे या साठी सुरु करण्यात आलेली योजना आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कामांना वेग येईल. हा इतकाच महाराष्ट्र राज्य सरकारचा हेतू आहे. Maha DBT Biyane Anudan Yojana