Find My Device: अँड्रॉइड मोबाईलचे फाइंड माय डिवाइस हे ॲप कसे वापरावे

Find My Device

Find My Device आजच्या डिजिटल क्रांतीच्या विश्वामध्ये आपल्यासाठी आपला फोन हा सर्वस्व असतो. त्यामुळे आपला फोन हरवला तर आपले खूप नुकसान होते, तसेच आपल्या फोनमध्ये आपण बऱ्यात खाजगी गोष्टी सेव केलेल्या असतात त्यामुळे तो दुसऱ्याच व्यक्तीच्या हातात गेला तर आपल्या खाजगी गोष्टी सेफ राहत नाहीत. म्हणूनच आम्ही तुम्हाला असं एक ॲप सजेस्ट करतो ज्याच्या वापराने तुमचे हे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. आजच्या आपल्या या लेखामध्ये आम्ही Find My Device या ॲप बद्दल माहिती देणार आहोत.

Find My Device तुमचा फोन कसा शोधायचा

जर तुम्ही गुगल अकाऊंट वापरून अँड्रॉइड फोन सेटअप केला असेल तर फाईंड माय डिवाइस तुमच्या गॅजेटवर आपोआप सेटअप झाले असणार.  तुम्ही ह्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्या फोनवर मोठ्याने रिंग प्ले करू शकता. इतकीच अट हे की तुम्ही हरवलेल्या फोनपासून रिंग ऐकू येईल  किमान इतक्या अंतरावर असणे गरजेचे आहे. पुढील प्रक्रिया करा. Find My Device

 • तुमचा कंप्यूटर किंवा दुसऱ्या मोबाइल डिवाइसवर क्रोम ओपन करा आणि android.com/find या लिंकवर  जा.
 • तुमच्या हरवलेल्या मोबाइलमध्ये ज्या गुगल अकाऊंटवरुन साइन इन केलेले आहे त्याच अकाउंटवरून  साइन इन करा.
 • तुमच्याकड़े अनेक अँड्रॉइड डिवाइस असतील साइड बारमधून हरवलेल्या फोनची निवड करुन घ्या.
 • त्यानंतर ‘Play Sound’ मेनूची निवड करा.
 • आता तुमच्या अँड्रॉइड फोनवर मोठ्याने रिंग वाजेल आणि  तुमचा गॅजेट सायलंटवर असला तरीही वाजणारी ही रिंग ५ मिनिटे सुरु राहील.
 • मोबाइलवर पावर बटन प्रेस करून किंवा फाईंड माय डिवाइसवर स्टॉप रिंगिंग प्रेस करून देखील रिंग बंद करता येउ शकेल.
 • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे फिचर वापरताना ‘Device located’ हे नोटिफिकेशन दिसले पाहिजे. Find My Device

फोन हरवल्यास कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते?

 सध्याच्या जमान्यात स्मार्टफोन हा एक अत्यंत महत्वाची दैनंदिन वापरातील गोष्ट झाली आहे.  फोनच्या माध्यमातून अनेक कामे मिनिटात शक्य होतात. त्यामुळे फोन हरवला किंवा चोरीला गेला असल्यास  अडचण निर्माण होते. बरेचदा याचे  आर्थिक नुकसान होते आणि आय फोन सारखे फोन हरवल्यास चे आर्थिक नुकसान मोठेच असते.  इतकेच नाही तर फोनमध्ये असलेले महत्त्वाचे फोटो, व्हिडिओ तसेच महत्त्वाच्या कामाच्या फाइल्स देखील आपल्याला गमवाव्या लागतात. त्यामुळे खूप नुकसान होते.

परंतु आता बदलत्या तंत्रज्ञानात  सोप्या ट्रिक्सच्या मदतीने आपण हरवलेला स्मार्टफोन सहज शोधून काढू शकतो. इतकेच नाही तर आपण आपला हरवलेल्या फोन स्विच ऑफ असताना देखील ट्रॅक करू शकतो. तुमचा हरवलेला फोन एखाद्या चांगल्या व्यक्तीला सापडल्यास किमान तो पुन्हा मिळण्याची शक्यता तरी असते. परंतु एखाद्या चोर भामट्याने तुमचा फोन चोरला असेल तर तुम्हाला तुमचा सर्व डाटा गमवावा लागू शकतो.  तसेच. म्हणूनच नेहमी तुमच्या फोनला पासवर्ड म्हणून पॅटर्न लॉक ठेवा. जेणेकरून फोन हरवला अथवा चोरीला गेला तरीही इतर व्यक्तींला तुमच्या फोनचा अ‍ॅक्सेस मिळणार नाही.

Find My Device चे फायदे

 •  फाईंड माय डिव्हाईस या ॲपमध्ये तुम्ही तुमचे डिव्हाईस ॲड केल्यावर तुमच्या डिव्हाईसचे लोकेशन तुम्हाला कायम कळत राहते.
 •  हे ॲप विशेषत: फोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यावर त्याचे लोकेशन जाणून घेण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते
 • तुमचा फोन पूर्णपणे लॉक करण्यासाठी किंवा त्यात असलेला डेटा हटवण्यासाठी हे ऍप अत्यंत महत्त्वाचे  काम करते.
 •  तुमच्या चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या फोनवर Find My Device द्वारे, SOS मेसेज पाठवले जाऊ शकतात
 • इतकेच नाही तर हरवलेल्या फोन डिस्प्लेवर कस्टमाइज्ड नोटिफिकेशन मेसेज देखील पाठवले जाऊ शकतात जे तुमच्या परवानगीशिवाय कोणीही काढू शकत नाही.
 • हे Google अॅप Android OS आधारित मोबाइल फोन तसेच टॅब्लेट आणि स्मार्टवॉचवर डाउनलोड आणि इन्स्टॉल केले जाऊ शकते.

My Device च्या या ऑप्शनमध्ये मेसेज पाठवताच चोरीला गेलेला फोन लॉक होईल आणि त्याचे कोणतेही फीचर काम करणार नाही, त्यामुळे चोरट्या व्यक्तीला तो फोन वापरता येणार नाही.