Maha DBT Seed Subsidy Scheme: राष्ट्रीय कृषी विकास योजनेद्वारे बियाणे, औषधे आणि खतांच्या वितरण अनुदान योजनेची माहिती आम्ही आज आमच्या या लेखात दिली आहे. यानुसार या योजनेंतर्गत बियाणे अनुदानात कोणकोणत्या बियाण्याचा समावेश आहे? कोणत्या जिल्ह्यांचा यामधे समावेश केला गेला आहे? या अनुदानावर कोणती पिके घेतली जातील? पात्रता काय आहे आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, कुठे आणि कसा अर्ज करावा या बद्दलची सर्व माहिती आपण पाहूया.
आपल्यापैकी बरेच जण कृषी क्षेत्रात काम करतात. परंतु सध्या शेतकरी सेंद्रिय पिकांऐवजी बहुतांशी रासायनिक पिकांचा वापर शेतीत करत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होत आहे. कमी कालावधीत भरघोस उत्पादन मिळाल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो आहे. मात्र आता येथेही शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. खते, कीटकनाशके, बियाणे खरेदी करत असताना अनेकदा बनावट बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे. Maha DBT Seed Subsidy Scheme
आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले तरी एकाही शेतकऱ्याने तक्रार दिली नाही. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या खरेदी दरम्यान जर काही फसवणूक झाली तर अशा फसवणुकीच्या तक्रारी आता सहज करता येणार आहेत. तसेच या तक्रारीवर गोपनीय रित्या कारवाई केली जाईल. अशा परिस्थितीत ही बातमी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी आहे. शेतकरी आता बिनधास्त अशा गोष्टींची तक्रार करू शकतात.
राज्याचे नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, शेतकरी फसवणुकीची तक्रार थेट मोबाईलवरून करू शकतात. राज्य सरकारने आता एक व्हॉट्सॲप नंबरही जारी केला आहे जिथे शेतकरी तक्रार करू शकतात. हा व्हॉट्सॲप क्रमांक आहे: 9822446655
सरकार द्वारे देण्यात आलेल्या या व्हॉट्सॲप क्रमांकावर आता शेतकरी सहज तक्रार करू शकतात. या सोबतच याबाबत जो शेतकरी तक्रार करेल त्याचे नावही गुपित ठेवण्यात येणार आहे. 24 तास ही सेवा सुरू राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
लाभ मिळणारे बियाणे:- येथे तुम्ही सोयाबीन, तुर, मका, मूग, उडीद आणि खरीप ज्वारीच्या बियांसाठी अर्ज करू शकणार आहात.
जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या क्षेत्र मर्यादेपर्यंतच शेतकऱ्याला हा लाभ दिला जातो.
प्रात्यक्षिकासाठी बियाणे अनुदान 100% असेल.
प्रमाणित बियाण्यांना जास्तीत जास्त 50% पर्यंत अनुदान देण्यात येईल.
लाभार्थ्याने शेतकरीच असावे.
बियाणे अनुदान योजनेसाठी पात्रता | Maha DBT Seed Subsidy Scheme Eligibility criteria
लाभार्थी शेतकऱ्याने डाळी, कापूस, तांदूळ, गहू आणि ऊस या घटकांसाठी अर्ज केलेला असल्यास, वर नमूद केलेले जिल्हे या घटकांसाठी बंधनकारक राहतील.
प्रत्येक घटकासाठी अनुदान फक्त एका योजने मार्फत दिले जाऊ शकते.
लाभार्थी अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जातीचा असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
एखाद्या शेतकऱ्याला कडधान्य पिकवायचे असेल किंवा त्याचा फायदा घ्यायचा असेल तर त्याच्या शेतात आधीपासूनच कडधान्ये असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे | Important documents
8-अ प्रमाणपत्र
7/12 प्रमाणपत्र
साहित्यांचे कोटेशन/ (पंप, पाइपिंग, शेतातील इतर घटकांसाठी)
चाचणीचे प्रमाणपत्र (पंपाच्या घटकासाठी)
अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, लाभार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
पूर्व संमती पत्र
हमी पत्र
महा डीबीटी बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज करा | Apply online
ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे.
शेतकरी या योजनेसाठी त्यांच्या गावातील जवळच्या डेटा सेंटरला भेट देऊन अर्ज करू शकतात, अर्ज सबमिट करू शकतात आणि या अर्जाची मंजुरी सुद्धा मिळवू शकतात.
तुम्हाला या बाबत काही शंका असल्यास, तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्याशी बोलून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन अर्ज करू शकता.
या योजने अंतर्गत अर्ज करणारे शेतकरी/लाभार्थी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांमधून लॉटरीद्वारे निवडले जातील.
या लॉटरी पद्धतीद्वारे निवडलेल्या शेतकरी बांधव लाभार्थ्यांना अनुदान म्हणून बी-बियाणे दिले जातील.
ज्या बियाण्यांसाठी अर्ज केला आहे ते बियाणे आणि पीक हे उपलब्धतेवर अवलंबून असेल. Maha DBT Seed Subsidy Scheme