Maharashtra Assembly Budget 2024 for farmers: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आल्या महत्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र राज्य सरकारचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. महाआघाडीच्या या राज्यसरकारने जनतेसाठी आणि नागरिकांसाठी देखील विविध शासकीय योजना या अर्धसंकल्पात जाहीर केल्या. शेतकऱ्यांसाठी आधी सुरु असलेल्या योजना आणि त्यात भर घालत नव्याने जाहीर केलेल्या योजनांचा उहापोहा राज्याचे अर्थमंत्री अजीत पवार यांनी केला. चला तर मग या लेखाच्या माध्यमातून पाहू की राज्यातील शेतकऱ्यांसाठी यावर्षीच्या म्हणजेच 2024 च्या अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा करण्यात आल्या आहेत. Maharashtra Assembly Budget 2024 for farmers

केंद्रीय व राज्य स्तरीय योजना

  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या माध्यमातून 92 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबांना 5 हजार 318 कोटी 47 लाख रुपये अनुदान देण्यात आले.
  • ‘एक रुपयात पीक विमा योजने’ अंतर्गत 59 लाख 57 हजार शेतकऱ्यांना 3 हजार 504 कोटी 66 लाख रुपये रक्कम अदा
  • ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने’ अंतर्गत 2 हजार 694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वाटप
  • ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून  पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या एकूण 14 लाख 33 हजार शेतकऱ्यांना 5 हजार 190 कोटी रुपये पीक विम्याची रक्कम म्हणून देण्यात आले. Maharashtra Assembly Budget 2024 for farmers

दुधउत्पादकांसाठीच्या योजना

  • नोंदणीकृत 2 लाख 93 हजार  दूध उत्पादकांना प्रतिलिटर 5 रुपयांप्रमाणे 223 कोटी 83 लाख रुपये अनुदान वितरीत ,राहिलेले  अनुदानही त्वरित वितरीत करणार
  • जुलै, 2024 पासून राज्यातील दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरीता प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान योजना जाहीर.
  • पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करण्याकरीता नवीन ‘दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प’ Maharashtra Assembly Budget 2024 for farmers

मत्सव्यवसायिकांसाठी घोषणा

  • मासळी विक्री करणाऱ्या बांधवांसाठी मत्स्यबाजार स्थापना करुन विविध सोयी सुविधांसाठी  50 कोटी रुपयांचा निधी

बांबू लागवड योजना

  • अटल बांबू समृद्धी योजनेंतर्गत राज्यातील 10 हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड आणि प्रतिरोपांसाठी 175 रूपये अनुदान राज्य शासन देणार आहे.  
  • नंदुरबार जिल्ह्यामध्ये पडिक जमिनीवर तब्ब्ल 1 लाख 20 हजार एकर क्षेत्रावर बांबूची लागवड करुन राज्यातील इतर जिल्ह्यांमधील पडिक जमिनीवर बांबू लागवड करण्यासाठी अनुदान जाहीर.  Maharashtra Assembly Budget 2024 for farmers

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जिवीतहानीबाबत घोषणा

  • वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जिवीतहानी झाल्यास  नुकसान भरपाईच्या रकमेत 20 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये,  कायमचे अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांवरून 7 लाख 50 हजार रुपये,  गंभीर जखमी झाल्यास 1 लाख 25 हजारावरून 5 लाख रुपये, किरकोळ जखमी झाल्यास 20 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये अशी रक्कम वाढवून देण्यात येणार आहे. Maharashtra Assembly Budget 2024 for farmers

सिंचन प्रकल्प योजना

  • राज्यातील 108 सिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता दोन वर्षात 61 प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित-
  • महाराष्ट्र राज्यात 155 प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षात त्यामुळे सुमारे 4 लाख 28 हजार हेक्टर वाढीवक्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे.  Maharashtra Assembly Budget 2024 for farmers

सौर ऊर्जा प्रकल्प

  • सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी अंदाजे 1 हजार 594 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली,
  • स्वच्छ व हरित उर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी जनाई-शिरसाई, पुरंदर यासह सर्व शासकीय  उपसा जलसिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण -४ हजार 200 कोटी रुपये खर्च
  • राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा लोडशेडींग न करता वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. Maharashtra Assembly Budget 2024 for farmers

जलयुक्त शिवार योजना

  • जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसरा टप्प्यातील  मार्च 2024 पर्यंत 49 हजार 651 रुपयांची कामे पूर्ण करुन पुढील कामांसाठी 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
  • ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून 338 जलाशयातून 83 लाख 39 हजार 818 घनमीटर गाळ काढण्यात आला. याला जवळजवळ 6 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.  Maharashtra Assembly Budget 2024 for farmers