Maharashtra Jamin Kayda: महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असणाऱ्या सीलिंग कायद्याअंतर्गत किंवा कमाल धारणा कायद्याअंतर्गत (Maharashtra Jamin Kayda) एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 54 एकर एवढी शेतजमीन खरेदी करता येऊ शकणार आहे. मात्र याउलट पूर्णपणे कोरडवाहू असलेली जमीन जर असेल तर एका शेतकऱ्याला कमाल 54 एकर जमीन खरेदी करता येऊ शकणार आहे. Maharashtra Jamin Kayda
जर जमीन बारा महिने बागायती असेल तर मग एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 18 एकर जमीन खरेदी करता येऊ शकणार आहे. समजा जर वर्षाचे बाराही महिने पाण्याचा पुरवठा होत नसेल पण वर्षातून कमीत कमी एकदा तरी पीक घेता येत असेल, अशी जमीन असेल तर एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 27 एकर जमीनीची खरेदी करता येऊ शकणार आहे.
एका शेतकऱ्याला, जर तो विकत घेणारी जमीन हंगामी बागायती जमीन असेल तर जास्तीत जास्त 36 एकर जमीन खरेदी करता येऊ शकणार आहे. शेतकऱ्याच्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन ठेवू शकतो, महाराष्ट्रामधील कमाल जमीन धारणा कायदा याबाबतची माहिती देतो. Maharashtra Jamin Kayda
परंतु महाराष्ट्र राज्यात कमीत कमी किती शेतजमिनीची खरेदी करता येईल किंवा किती शेतजमीन विकता येऊ शकते?, त्यासोबतच, या बतीतला कोणता कायदा अस्तित्वात आहे की नाही? (Maharashtra Jamin Kayda) या बद्दलचे असे एक ना अनेक प्रश्न अनेकांकडून उपस्थित केले जात होते. तर आता आपण या लेखाद्वारे या व अशाच काही प्रश्नांची प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.
महाराष्ट्रात शेतकरी किमान किती जमीन खरेदी करू शकतो? Maharashtra Jamin Kayda
महाराष्ट्रा राज्यामध्ये सध्या तुकडेबंदी कायदा लागू झालेला आहे. याचा अर्थ जर सोप्या शब्दात सांगायचा झाला तर, कोणालाही जमिनीचे तुकडे करून, जमिनीची खरेदी-विक्री करता येणार नाही. महाराष्ट्रात लागू असणाऱ्या या तुकडेबंदी कायद्याच्या अंतर्गत एका शेतकऱ्याला कमीत कमी किती जमीन खरेदी करता येऊ शकते किंवा त्या शेतकऱ्याला किती शेतजमीची विक्री करता येऊ शकते, हे ठरविण्यात आले आहे. Maharashtra Jamin Kayda
महाराष्ट्र राज्यात एक शेतकरी जर कमी बागायती जमीन असेल तर ती 10 गुंठे आणि जर जमीन जिरायती असेल तर ती 20 गुंठे या प्रमाणे विकत घेऊ शकतो किंवा असलेल्या जमिनीची विक्री करू शकतो. या सगळ्या तरतुदी ह्या तुकडेबंदी अधिनियम 1947, या नुसार लागू केल्या गेल्या आहेत.
असे असले तरीही, तुकडेबंदी कायद्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या सरकार द्वारे नुकत्याच काही दिवसांपूर्वी बदल करण्यात आलेला आहे. या करण्यात आलेल्या बदलानुसार एक गुंठ्यापासून पाच गुंठ्यापर्यंतची शेतजमीन ही शेतातील रस्त्यांसाठी, विहिरींसाठी आणि राज्य शासनाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या घरकुलासाठीच विकत घेता येणार आहे. Maharashtra Jamin Kayda
परंतु यासाठी संबंधित शेतकऱ्याला जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणं आवश्यक असणारं आहे (Maharashtra Jamin Kayda) शिवाय, ती जमीन ज्या कारणासाठी खरेदी गेली असेल, ते कारण सोडून इतर कोणत्याही कारणासाठी त्या जमिनीचा वापर करता येणार नाहीये. फक्त ज्या कारणासाठी जमीन विकत घेतली गेली आहे त्याच कारणासाठी जमिनीचा योग्य प्रकारे वापर झाला पाहिजे.
म्हणजे कोणीही, ज्या कारणासाठी त्यांनी जमीन विकत घेतली आहे ते कारण सोडून, इतर कोणत्याही कारणासाठी त्या जमिनीचा वापर करू शकत नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की जिल्हाधिकारी महोदय यांच्याद्वारे देण्यात आलेली मंजुरी ही केवळ एका वर्षासाठीच लागू असणार आहे.
असे असले तरीही मात्र फक्त अर्जदाराने विनंती केल्यानंतरच त्याला यासाठी आणखी दोन वर्षासाठी मुदतवाढ दिली जाऊ शकते. नागरी प्रकल्पासाठी जमिनीचा वापर न केल्यास किंवा त्यावर अतिक्रमण झाल्यास, ही मान्यता रद्द केली जाऊ शकते. Maharashtra Jamin Kayda