Find My KIDS location Tracker App: आता GPS चाईल्ड ट्रॅकिंग ऍपच्या मदतीने मुलांवर लक्ष ठेवणे होणार सोपे

Find my kids: Location Tracker सध्या डिजिटल क्रांतीमुळे अनेक गोष्टी सोप्या आणि सहज झाल्या आहेत. विविध ऍप्सच्या माध्यमातून आपण आपले जीवन सोपे आणि सहज करुन घेतले आहे. तसेच एक ऍप जे पालकांना शाश्वती देते की त्यांचे मुल कोणत्या वेळी कुठे आहे. Find my kids: Location Tracker हे एक असे ऍप आहे जे मुलांना ट्रॅक करते. त्याची वैशिष्टे आणि फायदे आणि अधिक माहिती आम्ही आज आपल्या या लेखाच्या माध्यमातून सविस्तरपणे मांडत आहोत. लेख शेवटपर्यंत जरुर वाचा आणि ही नवी माहिती कशी वाटली ते देखील आम्हाला कमेंट करुन कळवा.

फाईंड माय किड्स ऍप कसे काम करते

Find My Kids हे Android ऍप आहे. तसेच ते iOS सिस्टिममध्ये चालणारे आहे. हे ट्रेकिंग ऍप दर 15 मिनिटांनी फोनचे स्टेटस मुलांचे लोकेशन कळवते. त्यामुळे पालकांना आपले मुल कोणत्या वेळी कुठे आहे याची संपूर्ण माहिती मिळत राहते. ऍप कनेक्टर मुलांच्या कपड्यांमध्ये किंवा शाळेच्या बॅकमध्ये ठेवल्यास हे ऍप त्या कनेक्टरच्या मदतीने मुलांना ट्रॅक करते. त्यामुळे पालकांनी समजते की कोणत्यावेळी त्यांचे मुल कुठे आहे. त्यामुळे पालक देखील त्यांचे मुल सुरक्षित आहे याची खात्री बळगू शकतात. Find my kids: Location Tracker

मुले हरवण्याच्या वाढत्या प्रकरणांमुळे पालकांमध्ये चिंता

भारतातील विविध राज्यांमध्ये 3 ते 12 वयोगटातील मुले हरवल्याची प्रकरणे वाढत चालली आहेत. अनेकदा या लहान मुलांना चोरुन त्यांना विविध कामांसाठी वापरले जाते. या अशा प्रकरणांमुळे अनेकदा पालकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येते. मुल शाळेच्या बसमधून शाळेत जात असले तरी ते शाळेत गेल्यानंतर परत घरी येईपर्यंत पालकांना सतत चिंता सतावत असते. परंतु पालकांनी Find My KIDS location Tracker App वापरण्यास सुरुवात केल्यास नक्कीच त्यांची ही चिंता मिटू शकते. आणि सतत त्यांचे मुल कुठे आहे याची त्यांनी माहिती देखील मिळू शकते. पालकांसाठी अत्यंत उपयोगी असे हे ऍप असून परदेशात अनेक पालकांनी याचा वापर करण्यास सुरुवात देखील केली आहे.

ऍपबद्दल अधिक माहिती

Find my kids: Location Tracker हे ऍप GEO TRACK TECHNOLOGIES या कंपनीने तायर केले आहे. या कंपनीच्या माध्यमातून अनेक ऍप सध्या गुगल प्ले स्टोअरवर आहे. तसेच या ऍपला 50 मिलियन पेक्षाही जास्त लोकांनी डाऊनलोड केले असून या ऍपला 4.5 स्टारचे रेटिंग देण्यात आले आहे.  त्यामुळे आपण समजून शकतो की या ऍपची विश्वासार्हती किती चांगली आहे. असे अनेक ऍप बाजारात उपलब्ध आहेत. गुगल प्ले स्टोअरवर देखील असे अनेक ऍप आपल्याला दिसातत. बरेचदा ते ऍप मोफत देखील वापरता येतात परंतू त्यांची शाश्वती देता येत नाही. त्यांनी पुरविलेले लोकेशन बरोबर असेल की नाही याची खात्री बाळगता येत नाही.  परंतु 4.5 स्टार असलेले Find my kids: Location Tracker हे ऍप अत्यंत चांगले आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याचे सांगण्यात येते.

पैसे देऊन तुम्ही ही सुविधा अनुभवु शकता

गुगल प्लेवरील अनेक ऍप हे मोफत वापरता येतात. त्यामुळे अनेकजण सर्रास गुगल प्लेवरुन विविध प्रकारचे ऍप डाऊनलोड करुन वापरत असतात. परंतु काही ऍप्स असे असतात ज्यांचा वापर करण्यासाठी किंवा त्या ऍपच्या माध्यमातून सुविधा मिळविण्यासाठी आपल्याला त्याचे चार्जेच पे करावे लागतात. कधी मासिक सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून तर कधी ऍपमध्ये आपले नांव नोंद करताना काही पैसे भरावे लागतात. Find my kids: Location Tracker हे ऍप देखील तसेच आहे. या ऍपच्या सुविधांचा तुम्हाला वापर करायचा असेल तर तुम्ही त्याचे मासिक किंवा वार्षिक सबस्क्रिप्शन घेणे आवश्यक आहे.

Find My Kids App चे फायदे

  • Find My Kids App च्या मदतीने मुलाचे अचूक लोकेशन समजते.
  • Find My Kids App हे मुलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत उपयोगी आहे.
  • मुलांवर लक्ष ठेवता यावे यासाठी एकापेक्षा अनेक डिव्हाईसवर तुम्ही हे ऍप कनेक्ट करु शकतो.
  • या ऍप चा कंट्रोल तुमच्याच हातात असतो.