Maharashtra Police Bharti 2024: पोलीस भरतीसाठी 5 मार्चपासून अर्ज भरण्यास सुरवात; गृह विभाग 17000 पदे भरणार

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 महाराष्ट्रात  सर्वच जिल्ह्यांच्या शहरी आणि ग्रामिण भागात वाढलेली लोकसंख्या आणि  गुन्हेगारीतील वाढ या सर्व गोष्टी लक्षात घेता अधीक पोलीस दलाची आवश्यकता भासत आहे. पोलीस ठाण्यांचे प्रलंबित प्रस्ताव आणि सध्याची सामाजिक स्थिती या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडील  अत्ता मनुष्यबळ कमी असून हे संख्याबळ वाढवण्याची गरज भासू लागली आहे. तर दुसरीकडेराज्यातील बहुतेक जिल्ह्यांनी जवळपास 300 नवीन पोलीस ठाण्यांच्या मागणीचे प्रस्ताव पोलीस महासंचालकांना पाठविले आहेत.  परंतु पुन्हा तोच विषय की, मनुष्यबळाअभावी त्यावर निर्णय झालेला नाही. Maharashtra Police Bharti 2024

म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 2023-24 मधील दुसरी मोठी पोलीस भरती आता जाहीर करण्यात आली आहे.  याआधी देखील  18 हजार पदांसाठी पोलीस भरती करण्यात आली होती, आणि  आता  परत 17 हजार पदांची भरती केली जात आहे. यावर्षीचा उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये सध्याच्या भरतीला सुरवात होईल. तोपर्यंत उच्छूक तरुण उमेदवारांकडून ३१ मार्चपर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहेत. पहिल्यांदा मैदानी व शेवटी लेखी परीक्षा होणार असून परीक्षेच्या निकालानंतर नोव्हेंबरमध्ये या निवड झालेल्या नवप्रविष्ठांचे प्रशिक्षण सुरु होईल.

मराठा आरक्षणाचा मराठी तरुणांना फायदा मिळेल का?

मराठा समाजाच्या 10% आरक्षणाचा शासन निर्णय  आत्ताच झाला. आणि गृह विभागाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांसाठी मिळून एकूण 17 हजार पोलीस पदांची भरती काढली आहे. भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. दिनांक 5 मार्च 2024 ला अर्ज प्रक्रिया सुरु होऊन  31 मार्च 2024 पर्यंत  उमेदवारांना  पोलीस भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत. या सर्व जाहिरातींमध्ये  Economically weaker section म्हणजेच EWS हा एक गट आरक्षीत करण्यात आला आहे. त्याअंतर्गत मराठा आरक्षण मिळालेल्यांना अर्ज करता येणे शक्य आहे. फक्त त्यासंदर्भातील कागदपत्रे त्या तरुणांकडे असणे आवश्यक आहे. Maharashtra Police Bharti 2024

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा Maharashtra Police Bharti 2024

2024 यावर्षी तब्बल 17000 पदांसाठी पोलीस भरती जाहीर करण्यात आली आहे. ही या वर्षीची  दुसरी भरती आहे. तरी यावेळी पोलीस भरतीसाठी  कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 28 वर्षे पूर्ण अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. तसेच मागासवर्गियांसाठी कमीत कमी 18 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त 33 वर्षे  इतकी वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे. Maharashtra Police Bharti 2024

कोणकोणत्या पदांवर भरती होणार आहे?

 • जेल शिपाई – 1900
 • एमआरपीएफ – 4800
 • पोलीस शिपाई – 10300

ही सर्व पदे मिळून एकूण 17000 पदांसाठी ही पोलीस भरती होणार आहे.

पोलीस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरु होईल?

दिनांक 5 मार्च 2024 पासून पोलीस भरती बाबातची अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.

तरी सर्व इच्छूक तरूणांनी https://www.mahapolice.gov.in/ अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये होणारी नियुक्ती आणि पदांची संख्या

पोलीस भरती अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची पदे आणि संख्या तपासून घ्या .

 • भारत राखीव बटालियन 03 कोल्हापूर अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई – 182 पदे
 • SRPF गोंदिया अंतर्गत पोलीस – 133 पदे
 • सोलापूर SRPF गट 10 सशस्त्र पोलीस शिपाई भरती – 240 पदे
 • राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३ गडचिरोली भरती – 189 पदे
 • SRPF दौंड ग्रुप- 7 पुणे – 224 पदे
 • भारत राखीव बटालीयन-4, SRPF गट क्र 17, जि. चंद्रपुर – 225 पदे
 • SRPF औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती – 173 पदे
 • SRPF ग्रुप 12 हिंगोली भरती – 222 पदे
 • SRPF ग्रुप क्र. 18 काटोल नागपूर – 86 पदे
 • SRPF गट क्र. 5, दौंड भरती – 230 पदे

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची अंतीम तारीख

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत अर्ज करण्याची अंतीम तारीख 31 मार्च 2024 असून. इच्छूक उमेद्वारांनी त्याआधी किंवा या तारीखपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. Maharashtra Police Bharti 2024